PM Mudra Loan Yojana Apply Online 2025 Information In Marathi : पीएम मुद्रा लोन योजना
PM Mudra Loan Yojana Apply Online : देशात सुरू असलेल्या सर्वच सरकारी कर्ज योजनेमध्ये प्रसिद्ध असलेली पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना खाजगी व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. याद्वारे व्यक्तीला लाखो रुपये पर्यंत कर्ज सहज उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून तो स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल यामुळे देशातील नागरिक आत्मनिर्भर होण्यास मदत होत आहे.
PM Mudra Loan Yojana Apply Online : आता मुद्रा योजना अंतर्गत 10 लाख रुपयापर्यंत कर्ज घेण्याची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील ज्या नागरिकांना मुद्रा योजना अंतर्गत आर्थिक मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे असे व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
PM Mudra Loan Yojana प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ची सुरुवात 18 एप्रिल 2015 मध्ये झाली होती. सरकार द्वारे पीएम मुद्रा लोन योजना मध्ये तीन प्रकार कर्ज दिले जाते. यामध्ये शिशू कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज चा समावेश आहे. ज्या व्यक्तीला आपल्या योग्यतेनुसार जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याचे काही नियम सरकारने घालून दिलेले आहेत त्याची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सहज उपलब्ध होते. या योजनेअंतर्गत कसे कर्ज मिळते याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.
Mudra Loan Yojana पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना देशात सुरू होऊन आता 10 वर्ष पूर्ण होणार आहेत. या अंतर्गत काळानुसार बदलही होणार आहेत. नागरिकांना अधिकाधिक लाभ कसे मिळते या दृष्टिकोनातून हे बदल असतील यामध्ये अनेक नियमही बदलण्यात आले आहेत तसेच जुन्या नियमांमध्ये संशोधनही करण्यात आले आहे.
PM Mudra Loan Yojana केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेअंतर्गत पुरुष आणि महिला अशा दोघांनाही स्वतःचा खाजगी व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे देशातील कुठलाही सामान्यातील सामान्य व्यक्ती ही या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतो. या योजनेअंतर्गत तुम्हाला संबंधित बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि या कर्जाच्या पैशातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.
पीएम मुद्रा लोन योजनेचे उद्देश
PM Mudra Loan Yojana Purpose
Mudra Loan Yojana ज्या व्यक्तीला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना आर्थिक मदत करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे. देशातील रोजगार वाढीसाठी प्रोत्साहन देणे आणि नागरिकांना व्यवसाय उद्योगाची जोडणे. या योजनेअंतर्गतअशी व्यक्ती जे छोटा व्यवसाय करत आहेत त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ही आर्थिक मदत करणे.
मुद्रा लोन योजनेसाठी काय आहेत आवश्यक बाबी
Importance of PM Mudra Loan Yojana
या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचा जामीन लागत नाही म्हणजेच हमीदार लागत नाही.
कोणत्याही प्रकारचे मॉर्गेज करावे लागत नाही.
तुमच्या स्वतःचे भाग भांडवल ठेवण्याची गरज नाही.
अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असले पाहिजेत.
या योजनेचा लाभ सरकारीबँकेतून घेता येईल.
कोणाला मिळतो मुद्रा लोन योजनेचा लाभ ?
PM Mudra Loan Yojana Benefits
PM Mudra loan Yojana देशातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, त्यांना PM Mudra Loan प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेत येते.
- प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तीन प्रकारचे कर्ज उपलब्ध केलेले आहेत.
- शिशु मुद्रा लोन :- या शिशु मुद्रा लोन अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
- किशोर मुद्रा लोन :- किशोर मुद्रा लोन या कर्ज प्रकारात 50000 ते 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते.
- तरुण मुद्रा लोन :- तरुण मुद्रा लोन या प्रकारात पाच लाखापासून ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.
मुद्रा लोन योजनेसाठीची पात्रता
Eligibility of PM Mudra Loan Yojana
ज्या नागरिकांना लहान व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा लहान व्यवसाय आहे तो वाढवायचा आहे ते या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2024 अंतर्गत अर्ज करू शकतात.
अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
तो कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
मुद्रा लोनसाठीची आवश्यक कागदपत्रे
Documents of PM Mudra Loan
- कर्जदाराचे आधार कार्ड
- कर्जदाराचे पॅन कार्ड
- कर्जदाराचा पत्ता
- व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
- मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- जातीचे प्रमाणपत्र
- शॉप अॅक्ट लायसन
- इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्री याचे कोटेशन आणि बिल
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Mudra Loan Online Application
सर्वप्रथम वरती दिलेल्या सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.mudra.org.in/ जाऊन मुद्रा लोन PM Mudra Loan Yojana अर्ज डाऊनलोड करा. हा डाऊनलोड केलेला अर्ज व्यवस्थित भरून घ्या. सोबत त्याला आवश्यक कागदपत्रे जोडा. रेफरन्स आयडी किंवा क्रमांक मिळवण्यासाठी अधिकृत बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सबमिट करा. संदर्भ आयडी म्हणजेच रेफरन्स आयडी हा तुमच्याजवळ जपून ठेवा. कारण कर्जाची पुढची प्रोसेस करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल कर्जाचा अर्ज आणि तुम्ही जोडलेली आवश्यक कागदपत्रे हे तपासून झाल्यानंतर कर्जाची रक्कम मंजूर होईल आणि बँकेद्वारे तुमच्या बँक खात्यात ती रक्कम जमा केली जाईल.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
PM Mudra Loan Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत तुम्हाला मुद्रा कर्ज घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सरकारी बँकेला भेट द्या. बँकेतून कर्जाचा अर्ज घ्या. तो काळजीपूर्वक वाचून भरा. आणि त्याला आवश्यक ते कागदपत्रे जोडून तो कर्जाचा अर्ज सबमिट करा. बँकेसोबत कर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करा. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.