PM Shram Yogi Mandhan Yojana 2024 In Marathi : नागरिकांना मिळणार 3000 रुपये दरमहा पेन्शन

PM Shram Yogi Mandhan Yojana 2024 Information In Marathi : पीएम श्रमयोगी मानधन योजना 2024 मराठी माहिती

PM Shram Yogi Mandhan Yojana 2024 : नमस्कार वाचकहो, आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पीएम श्रमयोगी मानधन योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पीएम श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजने अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या उतार वयात या योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये प्रति महा पेन्शन रक्कम दिली जाणार आहे.

PM Shram Yogi Mandhan Yojanaपीएम श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे काही असे क्षेत्र जे सरकारसोबत रजिस्टर नसतात त्यामध्ये जसे कामगार रस्त्यावरील धंदे करणारे वेंडर्स, रिक्षावाले, घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया यांचा समावेश होतो. असंघटित क्षेत्रामध्ये व संघटित क्षेत्रामध्ये कोण कोण येतात याची संपूर्ण यादी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टलमध्ये दिलेली आहे. पीएम श्रमयोगी मानधन योजने मधून केंद्र सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित कायदा सामाजिक सुरक्षा कायदा 2008 नुसार या क्षेत्रातील नागरिकांना समाज सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे.

PM Shram Yogi Mandhan Yojana

PM Shram Yogi Mandhan Yojanaया क्षेत्रातील लोकांकडे कोणत्याही प्रकारचे सुविधा उपलब्ध नसतात. त्यांच्या उतार वयात त्यांना कोणतीही पेन्शन रक्कम मिळत नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या उतार वयात इतरांवर अवलंबून राहावे लागते. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार मार्फत कामगारांना लाइफ इन्शुरन्स काही हेल्थ समस्या झाल्या तर मेडिकल इन्शुरन्स यांसारख्या समस्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कामगार वर्गातील नागरिकांना निवृत्तीनंतर आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

PM Shram Yogi Mandhan Yojanaआज आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी काय आहे उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, फायदे?, या योजनेच्या काय आहेत पात्रता?, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे?, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा कसा करावा अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

PM Shram Yogi Mandhan Yojanaप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 रोजी असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी केली होती. या योजनेमध्ये होणाऱ्या संपूर्ण कामाची देखरेख ही मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट विभाग करते. या योजनेमधून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी LIC व CSC सेंटर अमलबजावणी करते. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील नागरिकांना महिन्याला काही छोटीशी रक्कम भरून वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती रक्कम पेन्शन स्वरूपात कमीत कमी 3 हजार रुपये प्रतिमहा केंद्र सरकार मार्फत दिले जाते. PIB च्या माहितीनुसार 22 जुलै 2024 पर्यंत असंघटित क्षेत्रातील 29.82 कोटी नागरिकांनी विश्राम पोर्टलवर नोंदणी केली आहे. तरी सर्वांनी आपणही लवकरात लवकर या योजनेचा अर्ज करून सदर योजनेचा लाभ घेऊ शकता.

ठळक मुद्दे

पीएम श्रमयोगी मानधन योजना 2024 मराठी माहिती

PM Shram Yogi Mandhan Yojana 2024 Information In Marathi

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची थोडक्यात माहिती

PM Shram Yogi Mandhan Yojana In Short

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे फायदे

PM Shram Yogi Mandhan Yojana Benefits

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची पात्रता

PM Shram Yogi Mandhan Yojana Eligibility

पीएम शर्मा योगी मानधन योजनेचे लाभार्थी

PM Shram Yogi Mandhan Yojana Benefisiors

पीएम श्रम योगी मानधन योजनेची आवश्यक कागदपत्रे

PM Shram Yogi Mandhan Yojana Documents

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची अर्ज प्रक्रिया

PM Shram Yogi Mandhan Yojana Apply

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

PM Shram Yogi Mandhan Yojana Online Apply

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची थोडक्यात माहिती

PM Shram Yogi Mandhan Yojana In Short

योजनेचे नावप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू झाली1 फेब्रुवारी 2019
कोणी सुरू केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी
विभागश्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार
उद्देशनागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा
लाभार्थीभारतातील असंघटित क्षेत्रातील कामगार
लाभ3000 रुपये प्रतिमहा पेन्शन
अर्ज प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटmaandhan.in
PM Shram Yogi Mandhan Yojana

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे फायदे

PM Shram Yogi Mandhan Yojana Benefits

PMSYM प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा फायदा असंघटित क्षेत्रातील कामगारांना यांनी होतो

PMSYM या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पेन्शन सुविधा उपलब्ध केली आहे

लाभार्थ्यांना या योजनेमध्ये महिन्याला फक्त 55 रुपये गुंतवण वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये प्रतिमा पेन्शन स्वरूपात रक्कम मिळते

PMSYM ही योजना केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे

PMSYM या योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शनची रक्कम ही लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाते

लाभार्थ्यांकडून जेवढी रक्कम गुंतवणूक केली जाते तेवढेच रक्कम केंद्र सरकार मार्फत आर्थिक स्वरूपात देण्यात येते

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही योजना सेंट्रल सेक्टर स्कीम आहे यामध्ये केंद्र सरकार संपूर्ण आर्थिक मदत करते

PMSYM या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींचे 60 वर्षा अगोदर निधन झाल्यास त्यांचे जोडीदार गुंतवणूक चालू ठेवू शकतात किंवा अकाउंट बंद करून जेवढी रक्कम भरली आहे त्यानुसार सेविंग बँक व्याजदर लागू होऊन रक्कम दिली जाते

अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय कमी असेल तर कमी प्रीमियम भरावा लागतो जास्त वय असेल तर जास्त प्रीमियम भरावा लागतो

वय 18 वर्ष वय असलेल्या नागरिकांना प्रत्येक महिन्याला 55 रुपये भरावे लागतात जर नागरिकांचे वय 40 असेल तर 200 रुपये पर्यंतची रक्कम प्रति महा भरावी लागते

लाभार्थीचे 60 वर्षानंतर निधन झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडीदाराला 50 टक्के प्रमाणे देण्यात येते

PMSYM या योजनेअंतर्गत भरला जाणारा प्रीमियम हा लाभार्थ्याच्या बँक खात्यातून डेबिट करून घेतला जातो त्यामुळे कोणताही प्रीमियम चुकत नाही.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची पात्रता

PM Shram Yogi Mandhan Yojana Eligibility

अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे

अर्जदार हा असंघटित क्षेत्रातील नागरिक असावा

अर्जदार आयकर दाता नसावा

अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असावे

अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्ष दरम्यान असावे

अर्जदाराच्या महिन्याचा पगार हा 15000 रुपयांपेक्षा कमी असावा

अर्जदाराकडे ही श्रम कार्ड असणे आवश्यक आहे

पीएम शर्मा योगी मानधन योजनेचे लाभार्थी

PM Shram Yogi Mandhan Yojana Benefisiors

सफाई कामगार

लहान व मध्यम शेतकरी

पशुपालन

मासेमारी करणारे नागरिक

जमीन नसलेले शेतकरी

चमड्याची कारागिरी करणारे कामगार

भाजी व फळे विकणारा वेंडर

रिक्षावाले

पॅकिंगचे काम करणारे नागरिक

एका राज्यातून दुसरा राज्यात कामासाठी आलेले नागरिक

घरगुती काम करणारे

बांधकाम कामगार

वीट, भट्टी व दगड खाणीमध्ये लेबलिंग व पॅकिंग करणारे कर्मचारी

विणकाम करणारे कर्मचारी

कचरा गोळा करणारे

डोक्यावर ओझे उचलणारे

धोबी

पीएम श्रम योगी मानधन योजनेची आवश्यक कागदपत्रे

PM Shram Yogi Mandhan Yojana Documents

आधार कार्ड

पॅन कार्ड

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

वयाचे प्रमाणपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

श्रम कार्ड

बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट टाकायचा फोटो

PM Shram Yogi Mandhan Yojana

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची अर्ज प्रक्रिया

PM Shram Yogi Mandhan Yojana Apply

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला एलआयसी ऑफिस, कॉमन सर्विस सेंटर, सीएससी, जिल्ह्यामधील कामगार विभाग यामध्ये जावे लागेल

त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी एलआयसी एजन्टची सुद्धा निवड करून शकता

त्यानंतर सीएससी सेंटर मध्ये जाऊन तिथून तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल

त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील

त्यानंतर सामान्य सेवा केंद्र मधील अधिकारी जवळ अर्ज जमा करावा लागेल

केंद्रामधील अधिकारी तुम्हाला अर्जाची प्रिंट देतील ती सांभाळून ठेवावी लागेल

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

PM Shram Yogi Mandhan Yojana Online Apply

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल

तेथे तुम्हाला वेबसाईटचे डॅशबोर्ड दिसेल उघडेल त्या होम पेज मध्ये तुम्हाला क्लिक हेअर टू अप्लाय नाऊ या पर्यावर जावे लागेल

तेथे गेल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सेल्फ इनरोलमेंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड या बटनवर क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरावी लागेल

त्यानंतर कॅपच्या कोड टाकून ओटीपी वर क्लिक करा

त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय झाल्या नंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज उघडेल

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा

त्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा

त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024

आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 

पोस्ट ऑफिस स्कीम इन मराठी

महावितरण गो ग्रीन योजना 2024