PM Yashasvi Scholarship Yojana 2024 in Marathi : अर्ज करा अन मिळवा 75000 ची स्कॉलरशिप

PM Yashasvi Scholarship Yojana 2024 Information पीएम यशस्वी योजना 2024 मराठी माहिती

PM Yashasvi Scholarship Yojana सरकार सर्व सामान्यांसाठी नवनवीन योजना देशभरात राबवत असते. शेतकरी, महिला, विद्यार्थी, मुली, गरीब, आर्थिक दृष्ट्या मागास आदींसाठी अशा नवनवीन योजना सरकार सतत राबवत असते. आज आम्ही तुमच्यासाठी या लेखाच्या माध्यमातून अशाच एका योजनेची माहिती घेऊन आलो आहोत, जी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्वाची योजना आहे. या योजनेचे नाव ‘पीएम यशस्वी योजना’ असे आहे. आज आपण या लेखात पीएम यशस्वी योजनाची PM Yashasvi Scholarship Yojana 2024 माहिती जाणून घेणार आहोत.

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना म्हणजे काय?

What is PM Yashasvi Scholarship Yojana

सध्याच्या युगात आपण पाहतो की, जसे माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा आता मूलभूत गरज झाली आहे. आपला संपूर्ण देश साक्षर व्हावा, यासाठी केंद्र सरकार शंभर टक्के प्रयत्न करत आहे आणि ते आता यशस्वी होण्याच्या मार्गावर देखील आहेत. परंतु भारत हा शंभर टक्के साक्षर होण्यासाठी एक अडचण येते ती म्हणजे पाचवीला पुजलेली गरीबी… यामुळे भारतातील जे दारिर्द्यरेषेखाली लोक आहेत, त्यांना त्यांच्या मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी सरकारने पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना  pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana सुरू केली आहे. यालाच PM YOUNG ACHIEVERS SCHOLARSHIP AWARD SCHEME FOR VIBRANT INDIA पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया असे हे नाव आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाने जारी केलेल्या निर्णयात पूर्व नियोजित गुणवत्ता चाचणी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करूनच आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन घेतला आहे.

या नियमानुसार आता इयत्ता आठवी, दहावी मधील मार्कचा ग्रेड या गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. या लेखात आपण पीएम यशस्वी योजना 2024 PM Yashasvi Scholarship Yojana 2024 म्हणजे काय आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत…

PM Yashasvi Scholarship Yojana

पीएम यशस्वी योजना PM Yashasvi Scholarship Yojana ही शिष्यवृत्ती ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थी यांसाठी मर्यादित आहे. या स्कॉलरशिपचा उद्देश विद्यार्थ्यांना भरपूर शिक्षण घेता यावे, पूर्व माध्यमिक शिक्षणाच्या पलीकडेही त्यांना शिक्षण घेता यावे. यासाठी या योजनेतून त्यांना मदत आहे. या योजनेअंतर्गत नववी आणि अकरावीमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा लाभ फक्त भारतीय विद्यार्थ्यांनाच मिळतो. शिष्यवृत्ती पुरस्कारसाठी अर्जदारांची निवड यशस्वी एंट्रन्स टेस्ट 2024 म्हणून ओळखली जाणारी लेखी परीक्षा होईल. यामुळे भारतातील विद्यार्थ्यांचे चांगले भविष्य घडेल.

या लेखात आपण पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना म्हणजे काय? त्याचे फायदे, उद्दिष्टे, लाभ, प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची पात्रता, या योजनेतून कोणाला मिळू शकते स्कॉलरशिप याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती योजना Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana अंतर्गत इयत्ता नववी, दहावी, अकरावी, बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये पासून ते 1 लाख 25 हजार रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती दिली जात आहे. जे विद्यार्थी 2024 मध्ये नववी, दहावी, अकरावी, बारावी, यापैकी एका वर्गात शिक्षण घेत आहेत त्यांना सरकारकडून ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण वार्षिक 15000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी निवडले जाते.

ठळक मुद्दे :

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची थोडक्यात माहिती

पीएम यशस्वी योजनेचे उद्दिष्टे

पीएम यशस्वी योजना 2024 लाभ

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची पात्रता

प्रधानमंत्री यशस्वी योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री यशस्वी योजना किती महत्त्वाची

पीएम यशस्वी योजना 2024 ऑनलाइन पद्धत

FAQ

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची थोडक्यात माहिती

PM Yashasvi Scholarship Yojana in short

योजनेचे नावप्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
परीक्षेची पद्धतलेखी
कोणाला मिळेल लाभनववी ते बारावीत शिकणारे विद्यार्थी

पीएम यशस्वी योजनेचे उद्दिष्टे

Purpose of PM Yashasvi Yojana

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा PM Yashasvi Scholarship Yojana  लाभ हा मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

या योजनेचा लाभ जे विद्यार्थी इयत्ता नववी ते बारावीमध्ये  शिक्षण घेत आहे, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपये पेक्षा कमी असावे.

जवळपास 385 कोटी रुपये इतकी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

एमएसजे अँड इ म्हणजे भारत सरकारच्या सामाजिक न्यायाने सक्षमीकरण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी स्कॉलरशिप अनुदान योजना तयार केली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना सतत अभ्यास सुरू राहणे आणि त्यांना उच्च शिक्षण घेता यावे हा आहे.

PM Yashasvi Scholarship Yojana

पीएम यशस्वी योजना 2024 लाभ

Benefits of PM Yashasvi Scholarship Yojana 2024

या योजनेचा लाभ फक्त इयत्ता नववी, दहावी, अकरावी, बारावी, या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच होईल.

या योजनेचा लाभ नववीतील विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये प्रति वर्ष तसेच इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये प्रति वर्ष अशी रक्कम मिळेल.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची वैशिष्ट्ये

pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana  Features

इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक लाभ देणे हे सरकारचे वैशिष्ट्ये आहेत.

या योजनेद्वारे आर्थिक लाभ देणे हे सरकारचे वैशिष्ट्य आहे.

या योजनेअंतर्गत ७५ हजार रुपये ते एक लाख 25 हजार रुपयेपर्यंतची आर्थिक मदत सरकार विद्यार्थ्यांना करत आहे.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे दोन भाग आहेत. Two parts of PM Yashasvi Scholarship Yojana 

पहिला भाग- नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तर दुसरा भाग- हा अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

जे विद्यार्थी पात्र असतात त्यांना नववीतील विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये तर अकरावीतील विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळते.

ही योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे, ज्यात ओबीसी, एबीसी हे विद्यार्थी येतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नववी आणि अकरावी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक स्कॉलरशिपची Scholarship परीक्षा द्यावी लागते.

त्या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.

परीक्षेचे स्वरूप कसे असेल

ही स्कॉलरशिपची Scholarship परीक्षा देण्यासाठी तुम्हाला एकूण चार विषय असतात ते खालीलप्रमाणे

परीक्षेचे विषयप्रश्नांची संख्याएकूण गुण
गणित30120
विज्ञान2080
सामाजिक शास्त्र25100
सामान्य ज्ञान25100
PM Yashasvi Scholarship Yojana

सुकन्या समृद्धी योजनेतून मुलीचे भविष्य करा उज्ज्वल https://yojanamazi.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजनेतून सरकार देणार मुलीला 50,000 रुपये https://yojanamazi.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024/

गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा सरकारचा निर्णय https://yojanamazi.com/lek-ladki-yojna-2024-in-marathi/

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची पात्रता

PM Yashasvi Scholarship Yojana  Eligibility

या योजनेच्या लाभ घेण्यासाठी काही पात्रता आहेत त्या खालीलप्रमाणे

लाभार्थी हा भारताचा रहिवासी असावा.

लाभार्थी हा ओबीसी एबीसीडी यापैकी एका श्रेणी त्याला असा असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असावे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा जन्म 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2008 या दरम्यान झालेला असावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगा आणि मुलगी हे दोघेही पात्र असतील.

या योजनेचा लाभ हा मोठ्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही घेता येतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा आठवी आणि दहावी तसेच दहावी उत्तीर्ण असावा.

आठवी आणि दहावी मध्ये कमीत कमी त्याला 60% गुण असायला हवेत.

प्रधानमंत्री यशस्वी योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

PM Yashasvi Scholarship Yojana  2024 Documents

लाभार्थ्याचे आधार कार्ड

उत्पन्न दाखला

जात प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

आठवी तसेच दहावी इयत्तेचे शैक्षणिक प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

प्रधानमंत्री यशस्वी योजना किती महत्त्वाची

PM Yashasvi Yojana importance

आपण पाहत आहोत की, सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू आहे. मोठमोठ्या प्रायव्हेट शाळा उघडत आहेत. ज्यांची फीस गरिबांना परवडत नाही. त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारी शाळेमध्ये जावे लागते आणि त्यांना दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन सारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांचा जो शैक्षणिक खर्च आहे तो खूप आहे. जसे की वह्या, पुस्तक, प्रोजेक्ट बूक यांचा खर्च हा गरीब कुटुंबाला परवडणारा नाही. त्यामुळे गरीब कुटुंबातील हुशार विद्यार्थी असून देखील ते आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. जे विद्यार्थी या गरीब कुटुंबातील आहे ज्यांच्या आर्थिक परिस्थिती खूप अडचणीची आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एक परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांना या स्कॉलरशिपचा लाभ होतो. सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळण्यासाठी भारत सरकारने शिक्षण अधिकाऱ्यांचा एक कायदाही आणला आहे. ज्यामध्ये असे आहे की, कितीही मोठी प्रायव्हेट शाळा असली तरी अशा शाळेमध्ये काही जागा असतात ज्या की गरीब विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवल्या जातात. आपण पाहतो की अन्न, वस्त्र, निवारा या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे आता या जगात शिक्षण ही देखील माणसाची एक मूलभूत गरज झाली आहे. शिक्षणाशिवाय माणूस हा अपूर्ण आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याची संधी ही मिळायला हवी त्यामुळे भारत सरकारने पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या स्कॉलरशिपचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा ज्यामुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकतील.

PM Yashasvi Scholarship Yojana

पीएम यशस्वी योजना 2024 ऑनलाइन पद्धत

PM Yashasvi Yojana 2024 Online apply

तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उमेदवाराची नोंदणी करणे आवश्यक आहे.

यासाठी तुम्हाला यशस्वी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, जी तुम्हाला NTA वेबसाईटवर https://scholarships.gov.in/ मिळेल, त्या वेबसाईटवर क्लिक करताच तुम्हाला मेन्यू मध्ये रजिस्टर हा पर्याय दिसेल.

त्या पर्यावरण क्लिक केल्यानंतर उमेदवार नोंदणी नावाचे नवीन होमपेज तुमच्यासमोर उघडेल.

उमेदवार नोंदणी यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल, आयडी, जन्मतारीख, पासवर्ड टाकावा टाकावा लागेल.

त्यानंतर खाते तयार करा. या बटन वर क्लिक करा, अशा पद्धतीने तुम्ही अर्जाची नोंदणी करू शकता.

आता अर्ज कसा करावा हे पाहू…

ही नोंदणी यशस्वीरित्या झाल्यानंतर तुम्ही कोणती शिष्यवृत्ती घेण्यासाठी पात्र आहात, तिथे ट्रस्ट थिंकसाठी उमेदवारांनी उपयुक्त लिंक्स मध्ये लॉगिन या बटनवर क्लिक करा.

त्यामध्ये तुम्हाला तुमचे लॉगिन करणे आवश्यक आहे. नंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल ज्यावर तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल.

त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करा अशा पद्धतीने तुम्हचे साइन इन होईर्र्ल.

त्यानंतर परीक्षेसाठी साइन इन करण्यासाठी पोर्टलच्या यशस्वी चाचणी नोंदणी पुरुषवर जा. तिथे मागितलेली संपूर्ण माहिती त्यामध्ये भरा.

FAQ

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिपद्वारे PM Yashasvi Yojana  विद्यार्थ्यांना किती लाभ मिळतो?

या योजनेतील विद्यार्थ्यांना सरकारकडून 75 हजार रुपये ते एक लाख 25 हजार रुपये पर्यंत आर्थिक लाभ मिळतो.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी PM Yashasvi Scholarship Yojana  विद्यार्थी कसे पात्र होतात?

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याला एक परीक्षा द्यावी लागते, ती परीक्षा पास झाल्यानंतर प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजनेचा लाभ दिला जातो.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana  कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्याला भाग घेता येतो का?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने देशभरातील काही शाळांची निवड केली आहे. या शाळेमधील विद्यार्थी या योजनेचा अर्ज करू शकतात.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना PM Yashasvi Yojana  ही कोणासाठी आहे?

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना ही मुलं आणि मुली या दोघांसाठी आहे.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठीची PM Yashasvi Yojana  पात्रता काय?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावे.

आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास नक्की फॉलो करा. Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA