Post Office Dak Seva 2.0 App In Marathi : पार्सल पासून अकाउंट पर्यंतची कामे करता येणार ऑनलाइन

Post Office Dak Seva 2.0 App To Do Post Office Related Works Know Details : पोस्ट ऑफिसचे Dak Seva 2.0 अँप लाँच

Post Office Dak Seva 2.0 App भारतीय पोस्ट ऑफिस कार्यालयाद्वारे लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. आता भारतीय पोस्ट ऑफिस ने आपल्या ग्राहकांपर्यंत या सेवा पोहोचवण्यासाठी एक नवीन ॲप लॉन्च केले आहे. त्याचे नाव डाक सेवा 2.0 (dak seva 2.0) आहे. चला जाणून घेऊ या बद्दलची संपूर्ण माहिती.

Post Office Dak Seva 2.0 App In Marathi : भारतीय पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाकघर द्वारे लोकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पार्सल मनी ऑर्डर पासून ते पोस्ट ऑफिस अकाउंट पर्यंत च्या सुविधांचा समावेश आहे. आता भारतीय पोस्ट ऑफिस ने आपल्या ग्राहकांपर्यंत या सुविधा पोहोचवण्यासाठी एक नवीन ॲप लॉन्च केले आहे. त्याचे नाव डाक सेवा 2.0 ठेवण्यात आले आहे. या नवीन ॲपच्या माध्यमातून आता लोक भारतीय पोस्ट ऑफिसच्या सर्व सुविधेचा लाभ ऑनलाइन घेऊ शकणार आहेत.

पोस्ट ऑफिस

Dak Seva 2.0 App

Dak Seva 2.0 App भारतीय पोस्ट ऑफिस कार्यालयाने नुकतेच आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंट वरून आपल्या नवीन ॲप डाक सेवा 2.0 सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. या ॲपच्या माध्यमातून आता लोक पोस्ट ऑफिस संदर्भातील सर्व सुविधांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकणार आहे. यामध्ये पार्सल पाठवणे, स्पीड पोस्ट, पैसे ट्रान्सफर करणे यासारखे अनेक कामे आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहेत.

डाक सेवा 2.0 ॲप द्वारे तुम्ही काय काय करू शकता?

Post Office Dak Seva 2.0 App 

Dak Seva 2.0 App पोस्ट ऑफिसच्या डाक सेवा 2.0 ॲपच्या माध्यमातून तुम्ही पार्सल ट्रेकिंग करू शकता आणि पार्सल ची डिलिव्हरी स्थिती ट्रॅक करू शकता. या ॲपच्या माध्यमातून लोक पैसे पाठवू शकतात.

याबरोबरच स्पीड पोस्ट, रजिस्ट्री किंवा अन्य सेवांची फिश कॅल्क्युलेट ही या ॲपच्या द्वारे करू शकणार आहेत. डाक सेवा 2.0 च्या माध्यमातून लोक आपले पोस्ट लाईफ इन्शुरन्स प्रीमियम ही भरू शकणार आहेत.

ज्या लोकांचे पोस्ट कार्यालयामध्ये अकाउंट आहेत ते लोक आपल्या बँक अकाउंट ची डिटेल्स पण या ॲपच्या माध्यमातून चेक करू शकणार आहेत. यामध्ये तुम्ही अकाउंट मधील बॅलन्स व्यवहार सारखे काम करू शकणार आहात.

नवीन Dak Seva 2.0 App डाक सेवा 2.0 च्या माध्यमातून लोक कुठल्याही डाक सेवा संदर्भात तक्रारही करू शकणार आहेत आणि आपल्या तक्रारीला ट्रॅकही करू शकणार आहोत.

डाक सेवा 2.0 ॲप केवळ ॲप नाही तर तब्बल 23 भारतीय भाषांमध्ये वापरले जाऊ शकणार आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ, गुजराती यासारख्या भाषांचा समावेश आहे. हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध असणार आहे.