Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024 Information In Marathi : पीएम पोषण शक्ती निर्माण अभियान 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana देशभरातील मुलांना पोषक आणि दर्जेदार भोजन मिळावे यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारने पीएम पोषण शक्ती निर्माण अभियान 2024 ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 2021 ते 2026 पर्यंत शाळेमध्ये मुलांना गरम जेवण पुरवले जात आहे. यापूर्वी ही योजना मध्यान भोजन योजना या नावाने ओळखली जात होती.
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana या योजनेचा लाभ सरकारी आणि अनुदानित शाळेतील 11 कोटीहून अधिक मुलांना होणार आहे. या योजनेसाठी 1,30,794 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून यात बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यापर्यंत त्याचा विस्तार करणे, विशेष आणि दर्जेदार जेवण पुरवणे, शालेय पोषण उद्यानांच्या वापरास प्रोत्साहन देणे आदीचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकरी व महिला बचत गटांच्या सहभागासाठी पाककला स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. काही जिल्ह्यांसाठी सोशल ऑडिट आणि विशेष तरतुदी देखील करण्यात आल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक आहार मिळेल आणि त्यांचा विकास होण्यास मदत होईल.
पीएम पोषण योजना म्हणजे काय?
What Is Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana
PM POSHAN या योजनेच्या माध्यमातून देशातील मुलांना सकस आहार मिळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावण्याची जबाबदारी शिक्षण आणि आरोग्य मंत्रालय शाळा प्रशासन स्थानिक समुदायासह विविध सरकारी विभाग भागधारक यांच्या जवळपास समन्वय आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून संसाधनाचा योग्य वापर करून यंत्रणा यशस्वी राबवणे हे उद्दिष्ट आहे.
PM POSHAN या योजनेच्या माध्यमातून अन्नपदार्थाच्या स्थानिक सोर्सिंग ला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधार देणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून ताजे आणि पौष्टिक अन्न उपलब्ध निश्चित केली जाते तसेच कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी देखील या योजनेचा योगदान आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना कुपोषणाचा सामना करावा लागू नये, म्हणून सरकारने पीएम पोषण योजनेची सुरुवात केली आहे.
PM POSHAN या योजनेच्या माध्यमातून शालेय मुलांना पौष्टिक अन्न पुरवले जाते. त्यामुळे त्यांचा सामाजिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे त्यांचे उज्वल भविष्याचा मार्ग सोपा होतो पंतप्रधान पोषण योजनेत मध्यान भोजन योजनेचा समावेश केल्याने कुपोषणाचा सामना करण्यासाठी सरकारचा सर्वांगी दृष्टिकोन दिसून येतो. या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून यातून विद्यार्थ्यांना सकस आणि पोषक असे जेवण पुरवणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे देशातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.
PM POSHAN पीएम पोषण शिक्षा मंत्रालयाद्वारे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे केंद्र प्रायोजित ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि निमसरकारी अनुदान प्राप्त सर्व शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना एक वेळचे गरम जेवण उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना देशभरात कुठलेही जात व धर्म असा भेदभाव न करता सर्व पात्र मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
PM POSHAN प्रधानमंत्री पोषण अभियानचा Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024 मुख्य उद्देश म्हणजे देशातील बहुसंख्य मुलांसमोरील दोन गंभीर समस्या अर्थातच धुक आणि शिक्षा याचे समाधान करणे हा आहे. यासाठी सरकारी मान्यता प्राप्त शाळेमध्ये पात्र मुलांना पोषण, शेतीमध्ये सुधारणा करणे हा योजनेचा उद्देश आहे. या सोबतच वंचित मागास वर्गातील गरीब मुलांनी नियमित शाळेमध्ये यावे यासाठी प्रोत्साहित करणे आणि शिक्षण घेण्यासाठी त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करणे.
PM POSHAN पोषण योजना अधिकृत बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस) च्या अंतर्गत येणाऱ्या अनेक योजनातील एक आहे. यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि तरुणींसाठीच्या योजनेचा समावेश आहे.
ठळक मुद्दे
पीएम पोषण शक्ती निर्माण अभियान 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024 Information In Marathi
पीएम पोषण योजना म्हणजे काय?
What Is Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana
पीएम पोषण शक्ती निर्माण अभियान योजनेची थोडक्यात माहिती
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana In Short
पीएम पोषण योजनेचे उद्दिष्ट
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Purpose
प्रधानमंत्री पोषण योजनेचे फायदे
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Benefits
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून नवीन पाककृती निश्चित
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024 In Marathi
पीएम पोषण योजनेची पात्रता
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Eligibility
पीएम पोषण शक्ती निर्माण योजनेची कागदपत्रे
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Documents
पीएम पोषण योजनेचे अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Apply
पीएम पोषण शक्ती निर्माण अभियान योजनेची थोडक्यात माहिती
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana In Short
योजनेचे नाव | पीएम पोषण योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
उद्घाटन कोणी केले | केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर |
उद्देश | देशातील कुपोषण कमी करणे |
लाभार्थी | देशातील सर्व विद्यार्थी |
अधिकृत वेबसाईट | https://pmposhan. education.gov.in/ |
पीएम पोषण योजनेचे उद्दिष्ट
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Purpose
- देशभरातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण पुरवले जाते जेणेकरून त्यांचे सामाजिक आणि मानसिक विकास होऊ शकेल. यामुळे मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते. त्यांच्या शरीराला आवश्यक पौष्टिक अन्न त्यातून मिळते.
- पीएम पोषण योजनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संख्या वाढण्यास मदत होईल यांचा उद्देश शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
- विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक प्रवासात यातून मदत केली जाते. या नवीन योजनेच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थाचा अविभाज्य भाग असलेल्या सध्याच्या मिड डे मिल कार्यक्रमाचा ही समावेश करण्यात येणार आहे.
- या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी 2021- 22 ते 2025- 26 या कालावधीत पाच वर्षासाठी 1.31 ट्रिलियन रुपयाचा भरे आर्थिक निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पोषण होण्यास मदत होईल.
- नुकतेच केंद्र सरकारने अन्न मंत्रालयाद्वारे अनुदानित अन्नधान्याच्या तरतुदीसाठी 45 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त खर्चाचे वाटप केले आहे. परिणामी एकूण खर्च 1.31 ट्रिलियन रुपये झाला आहे. 2020 -21 मध्ये सरकारने या उपक्रमात 24 हजार 400 कोटी रुपये अधिक गुंतवणूक केली होती. यात 11 हजार 500 कोटी रुपयांची विशेषतः अन्नासाठी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून मध्यान्न भोजनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची जागा घेतली आहे. यामध्ये पूर्वी विद्यार्थ्यांना गरम जेवण पुरवले जात होते आणि आता त्याचे नाव पीएम पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पोषण योजनेचे फायदे
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Benefits
- प्रति मूल प्रति दिन पोषण आहार
प्राथमिक : कॅलरी 450, प्रोटीन 12 ग्रॅम
उच्च प्राथमिक : कॅलरी 700. प्रोटीन 20 ग्रॅम
- प्रति मूल प्रति दिन भोजन
प्राथमिक : अन्नधान्य 100 ग्रॅम, दाळ 20 ग्रॅम, भाजी 50 ग्रॅम, तेल 5 ग्रॅम
उच्च प्राथमिक : अन्नधान्य 150 ग्रॅम, डाळी 30 ग्रॅम, भाजीपाला, तेल 7.5 ग्रॅम, मीठ आणि मसाले आवश्यकतेनुसार.
या योजनेच्या माध्यमातून 11.20 लाख शाळेमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवी पर्यंतच्या 11.80 कोटी मुलांना अतिरिक्त प्राथमिक शाळेमध्ये प्री स्कूल या बालवाडीच्या मुलांनाही गरम शिजलेले भोजन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून नवीन पाककृती निश्चित
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana 2024 In Marathi
केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून पाककृती सुधारणा समितीने खालील प्रमाणे 15 प्रकारच्या पाककृती स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता दिली आहे. या पाककृती तपशील माहिती खाली देत आहोत.
पाककृतीचे नावे
व्हेजिटेबल पुलाव
मसालेभात
मटार पुलाव
दाल खिचडी
चवळी खिचडी
चना पुलाव
सोयाबीन पुलाव
मसूरी पुलाव
अंडा पुलाव
मोड आलेल्या मटकीची उसळ
गोड खिचडी
मूग, शेवगा वरण भात
तांदळाची खीर
नाचणीचे सत्व
मोड आलेले कडधान्य
पीएम पोषण योजनेची पात्रता
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Eligibility
- अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा सरकारी किंवा सरकारी मान्यता प्राप्त शाळेमध्ये प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक पहिली ते आठवी मध्ये शिकत असणे आवश्यक आहे.
पीएम पोषण शक्ती निर्माण योजनेची कागदपत्रे
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Documents
आधार कार्ड
जातीचे प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
रेशन कार्ड
वयाचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबूक
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट फोटो
पीएम पोषण योजनेचे अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Apply
या योजनेसाठी कुठलीही अर्ज प्रक्रिया नाही. पीएम पोषण योजना सरकारी आणि निमसरकारी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांसाठी लागू आहे, त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA