Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 in Marathi : पीएम जीवन ज्योती विमा योजना बदलले भारताचे चित्र

Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana : 21 कोटी नागरिकांना मिळाले 2 लाख पेक्षा अधिक कव्हरेज

Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana : प्रधानमंत्री बीमन ज्योती बीमा योजना च्या अंतर्गत आतापर्यंत 21.67 कोटी नागरिकांनी नावनोंदणी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपये च्या जीवन विमा कवरेजच्या माध्यमातून 21 कोटी पेक्षा अधिक कुटुंबांना मदत मिळाली आहे. चला तर मग अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या पूर्ण रिपोर्टवर एक नजर टाकूया.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना PMJJBY प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना PMSBY आणि प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना PMJDY ने सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षा आणि समावेशकतेच्या दिशेने मोठी उपलब्धता मिळवली आहे. वित्त मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले की या योजना ने कोट्यावधी लोकांना फायदा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता आणि सुरक्षा आली आहे.

Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana : आपण पाहतो की आजच्या काळात पैसा कमवणे हे किती महत्त्वाचं आहे. आणि तसेच तो पैसा भविष्यासाठी गुंतवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारावे आपल्या पैशाने त्यांच्या आयुष्यात हात भार लागावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठीच जीवन विमा आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आज आपण याच एका जीवन विमा योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. लोकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने भरपूर योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana ही योजना सरकारी विमा योजना आहे. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2015 मध्ये केली होती. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी विमाधारकाला फक्त 436 रुपयांचा वार्षिक हप्ता भरावा लागतो. चला तर मग पाहूया जीवन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana योजनेबद्दलची संपूर्ण माहिती.

PMJJDY ची विशेषता

Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 21.67 कोटी नागरिकांची नाव नोंदणी झाली आहे. या योजनेतून 2 लाख रुपये जीवन विमा कवरेज च्या माध्यमातून 21 कोटी पेक्षा अधिक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 8 लाख 60 हजार 575 दावे प्राप्त झाले होते. ज्याची किंमत 17211.50 रुपये होती. या योजनेचा मुख्य उद्देश नागरिकांना अनिश्चितेच्या वेळी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे.

PMSBY चा प्रभाव

Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana 2024 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून अपघात विमा कवरेज मध्ये 47.59 कोटी लोकांची नाव नोंदणी झाली आहे. आत्तापर्यंत 1 लाख 93 हजार 964 दावे नोंदणी झाले आहेत. यातील 1 लाख 47 हजार 641 दावे वितरीत पण झाले आहेत. ही योजना मात्र 12 रुपये वार्षिक प्रीमियम वर 2 लाख रुपयाचा विमा कव्हरेज प्रदान करते. यातून निम्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा लाभ होत आहे.

PMJDY मुळे लोकांना झाला फायदा

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून 53.13 कोटी खाते उघडण्यात आले आहेत. यातील 55.6% खातेधारक महिला आहेत आणि 66.6% खाते ग्रामीण आणि अर्ध शहरी क्षेत्रामधील आहेत. या योजनेने आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या वर्गांना बँकिंग सेवा ची जोडणे मध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. जनधन खाते मधील एकूण जमा रक्कम 2,31,236 कोटी रुपये आहे. 15 ऑगस्ट 2024 पर्यंत खात्यामध्ये 3.6 टक्के आणि जमा रक्कम 15 टक्के नोंद करण्यात आली आहे.

या योजनेच्या यशस्वीते मुळे देशांमध्ये आर्थिक समावेशन आणि सुरक्षितता मजबूत केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी च्या या योजना चा मुख्य उद्देश गरीब आणि वंचित वर्गातील नागरिकांना आर्थिक मजबुती प्रदान करणे आहे. वित्त मंत्रालया नुसार, या योजना समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत आणि आर्थिक जागरूकता वाढवण्यासाठी मदतगार ठरत आहेत.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना म्हणजे काय?

What is Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PM Jeevan Jyoti Bima Yojana ही सरकारी जीवन विमा योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये विमाधारकांना दोन लाख रुपयांचा विमा मिळतो. म्हणजेच याचाच अर्थ ही विमा पॉलिसी असलेल्या व्यक्तीला एक जर एखादा आजार झाला त्यांचा अपघात झाला किंवा इतर कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये चा विमा मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. ज्यांचे वय 18 वर्षे ते 50 वर्ष च्या दरम्यान आहे. या योजनेसाठी तुम्ही कोणत्याही बँकेत नोंदणी करू शकता. या योजनेसाठी तुम्हाला फक्त 436 रुपये वर्षाला एक वर्षाला असा हप्ता जमा करायचा आहे. आणि या योजनेचा फायदा घ्यायचा आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्यात नोंदणी कशी करावी?

Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana : ज्या व्यक्तीचे बँकेत खाते आहेत त्यांनी आपले नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदवावे ही नोंदणी बँकेद्वारेच केली जाते आणि तुमच्या खात्यातून दरवर्षाला 436 रुपये कापण्याची परवानगी बँकेला तुम्हाला द्यावी लागते. हे 436 रुपये दर वर्षाला कटतात 25 मे ते 30 जून या दरम्यान हे पैसे कपात केले जातात. नांदणी फॉर्मवर तुमची संमती मिळाल्या नंतर हे पैसे दरवर्षी तुमच्या खात्यातून कापले जातात. आणि तुमची ही विमा योजना सुरू राहते. त्यानंतर तुम्हाला ते सोडवायचे असेल तेव्हा तुम्ही ते सोडवू शकता.