Pradhanmantri Matru Vandana Yojana 2024 in marathi प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

Table of Contents

Pradhanmantri Matru Vandana Yojana 2024 :

आपण पाहतो की, आपल्या देशात अशा बहुसंख्य महिला आहेत. ज्यांना त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल मजुरी करावी लागते. महिलांना गर्भावस्थेत त्यांचे पोट भरण्यासाठी मोल मजूरी करावे लागते, आणि त्यामुळे या गर्भवती महिलांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला पाहिजे तसा पौष्टिक आहार मिळत नाही. याचा परिणाम गर्भवती महिलेवर तर होतोच, पण त्याचा विपरीत परिणाम नवजात बालकावर होतो. आणि अशाच गर्भवती माता आणि त्यांचे नवजात बालक यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि महिलांना तिच्या गर्भावस्थेमध्ये सकस आहार मिळावा, उत्तम पोषण मिळावे, पोषक आहार मिळावा, आराम मिळावा, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, या सर्वांची काळजी घेऊन केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने आर्थिक सहायता म्हणून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना Pradhanmantri Matru Vandana Yojana ची सुरुवात केली. ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. चला तर मग, आपण बघूया या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती, या योजनेमुळे कोणाला लाभ होणार, त्यांची पात्रता काय असेल, त्यासाठीचा ऑनलाईन / ऑफलाइन अर्ज कसा करावा. याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखात मिळणार आहे.

Pradhanmantri Matru Vandana Yojana

ठळक मुद्दे :-

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 संपूर्ण माहिती

Pradhanmantri Matru Vandana Yojana information

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गतचे नवीन अपडेट

New update for Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची थोडक्यात माहिती

Pradhanmantri Matru Vandana Yojana in short

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्देश

Purpose of Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची वैशिष्ट्ये

Features of Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा कोणाला मिळणार लाभ

Benefits of Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत

कशी मिळेल आर्थिक मदत

How to get financial aid of Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे फायदे

Benefits of Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी पात्रता

Eligibility of Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नियम व अटी

Terms and conditions of Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Documents of Pradhanmantri Matru Vandana Yojana

मातृ वंदना योजनेचा लाभ कसा घ्यावा

उमंग ॲपद्वारे umang app ही करता येणार अर्ज

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धत

Pradhanmantri Matru Vandana Yojana offline application

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन पद्धत

Pradhanmantri Matru Vandana Yojana online application

FAQ’S

मुद्रा लोन योजनेच्या अधिक माहिती साठी पुढील वेबसाइटला भेट द्या. : https://yojanamazi.com/pm-mudra-loan-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अधिक माहिती साठी पुढील वेबसाईटला भेट द्या. : https://yojanamazi.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024/

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेच्या अधिक माहिती साठी पुढील वेबसाइटला भेट द्या. : https://yojanamazi.com/pradhanmantri-jeevan-jyoti-bima-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 संपूर्ण माहिती

Pradhanmantri Matru Vandana Yojana 2024 information  

Pradhanmantri Matru Vandana Yojana देशातील भरपूर अशा गरीब महिला आहेत. ज्यांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल मजुरी करावी लागते. अशा स्त्रिया गरोदर असताना देखील मोल मजूरी करतात, घरकाम करतात आणि अगदी त्यांच्या गरोदर पणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या काम करतात. परंतु याचा परिणाम त्यांच्यावर आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या नवजात बाळावर ही होतो. आणि बाळ जन्मल्यानंतर ही त्या लगेच कामाला सुरुवात करतात. या मुळे त्यांना पोषक आहार, सकस अन्न मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांचे बाळ कुपोषित होतात. आणि त्यांची शारीरिक क्षमता कमी होते. म्हणून पोटात असलेल्या बाळाची नीट वाढ होत नाही. आणि मग त्याच्या आरोग्यावर या सगळ्याचा परिणाम होतो आणि त्यांना मोठमोठ्या संकटांना सामोरे जावे लागते.

या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून केंद्र सरकारने गर्भवती महिला आणि नवजात बालक यांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना आवश्यक तो पुरेसा पोषक आहार घेऊन त्यांच्या होणाऱ्या बाळाचे आरोग्य सुधारून बाळ सुदृढ होण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकस मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची PM Matru Vandana Yojana सुरुवात संपूर्ण देशात सुरू केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजने Pradhanmantri Matru Vandana Yojana अंतर्गत गर्भवती महिलांना आणि स्तनपान मातांना तीन हप्त्यामध्ये सहा हजार (6000) रुपये आर्थिक मदत मिळते. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांच्या आत म्हणजेच 5 महिन्याच्या आत गर्भधारनेची नोंदणी केल्यानंतर 1000 रुपये रक्कम मिळते त्यानंतर गारोदरपणाच्या 6 व्या महिन्या नंतर एक प्रसूतिपूर्व तपासणी केली की 2000 रुपये रक्कम मिळते, आणि 2000 रुपयाचा तिसरा हप्ता हा बाळाच्या जन्म नोंदणी नंतर बाळाला जे बिसीजी, ओपिव्ही, डीपिटि आणि हीप्याटायटीस-बी ही लसीकरणाचे डोस द्यावे लागतात ते झाल्यानंतर ही रक्कम लाभार्थी च्या खात्यात जमा केली जाते. या नंतर जेंव्हा आई बाळाला रुग्णालयात जन्म देते त्या वेळी जननी सुरक्षा योजने अंतर्गत राहिलेली 1000 रुपये रक्कम महिलेला दिली जाते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गतचे नवीन अपडेट

गर्भवती महिला आणि नवजात बालक यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांना पोषक आहार मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची PM Matru Vandana Yojana सुरुवात केली. या योजनेत काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत ते बघू. या योजनेच्या नवीन नियमानुसार आता शासनाकडून पहिल्या आपत्त्याला 5000 रुपये देण्यात येणार आहेत. यात अजून एक आनंदाची बाब म्हणजे जर दुसरे आपत्य ही मुलगी झाली असेल तर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाअंतर्गत Pradhanmantri Matru Vandana Yojana सरकारकडून 6000 रुपये दिले जाणार आहेत. ज्या कुटुंबात दुसरे मूल ही मुलगी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. PMMVY या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आपत्त्याच्या जन्मा पासून 270 दिवसाच्या आत म्हणजेच 9 महिन्याच्या आत कधीही तुम्ही नोंदणी करू शकता. या शिवाय गर्भवती महिलांनी आता खासगी रुग्णालयात जरी बाळाला जन्म दिला तरीही त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. आरोग्य विभागाने या सूचना दिल्या आहेत की, खासगी रुग्णालयात पहिल्यांदा आई झालेल्या महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 PM Matru Vandana Yojana 2024 या योजनेचा लाभ देण्यात यावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खासगी रुग्णालयात येणाऱ्या महिलांना आधी शासकीय रुग्णालयात नोंदणी करावी लागणार आहे.      

Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची थोडक्यात माहिती

Pradhanmantri Matru Vandana Yojana in short

योजनेचे नावप्रधानमंत्री मातृ वंदना योजना
कोणी सुरू केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी
कधी सुरू झालीजानेवारी 2017
लाभार्थीदेशातील गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता
लाभाची रक्कम6000 रुपये
उद्देशगर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याच्या काळजी साठी आर्थिक मदत
विभागमहिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार
अर्ज प्रक्रियाऑनलाइन / ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://wcd.nice.in

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्देश

purpose of Pradhanmantri Matru Vandana Yojana

  • गर्भवती महिलांना पोषक आणि सकस आहार मिळून त्यांना आर्थिक मदत करणे आणि नवजात बालकाचे आरोग्य चांगले राहून बाळ सुदृढ जन्माला येणे हा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा Pradhanmantri Matru Vandana Yojana मुख्य उद्देश आहे.
  • महिला गर्भवती असताना देखील काम करतात त्यामुळे त्यांना आराम मिळत नाही. म्हणून त्यांना त्यांच्या वेतनेची नुकसान भरपाई दिली जाते जेणेकरून त्यांना आराम मिळेल.
  • गर्भवती महिला आणि नवजात बालक कुपोषित होऊ नये आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची वैशिष्ट्ये

Features of Pradhanmantri Matru Vandana Yojana

  • केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जानेवारी 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PM Matru Vandana Yojana सुरू केली आहे.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजने Pradhanmantri Matru Vandana Yojana अंतर्गत केंद्र शासनाचा तसेच राज्य शासनाचा सहभाग आहे. त्यात केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आहे तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा Pradhanmantri Matru Vandana Yojana ज्या गर्भवती महिलांना लाभ होतो त्यांना या लाभाची रक्कम महिलेच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा होते.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमुळे Pradhanmantri Matru Vandana Yojana गरोदर महिलांचे जीवनमान सुधारते आणि त्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा कोणाला मिळणार लाभ

Benefits of Pradhanmantri Matru Vandana Yojana

  • 1 जानेवारी 2017 नंतर पहिल्या आपत्यासाठी ज्या महिला गरोदर असतील त्यांना या Pradhanmantri Matru Vandana Yojana योजनेचा लाभ होईल. तसेच स्तनपान करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
  • Pradhanmantri Matru Vandana Yojana या योजनेचा लाभ हा दारिद्र रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील या दोन्ही गटातील गरोदर महिलांना होईल.
  • नैसर्गिक रित्या गर्भपात झालेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा जन्माला आलेल बाळ हे जन्मताच मृत झालेले असेल अशांना या योजनेचा लाभ होतो.
  • ज्या  महिला गरोदारपणात आणि स्तनपानात नोकरी करतात अशा महिलांना या योजनेचा लाभ होतो.
Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा pradhanmantri Matru Vandana Yojana लाभ हा गर्भवती  महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना होणार आहे. या योजनेअंतर्गत जी आर्थिक मदत सरकार करणार आहे. ती मदत मातेचे आणि तिच्या बाळाचे आरोग्य चांगले राहावे या साठी केली जाणार आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत Pradhanmantri Matru Vandana Yojana शासनाच्या नियमानुसार आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे केलेल्या शासकीय रुग्णालयात जर गर्भवती महिलांनी नोंदणी केली असेल तर, त्या महिलेला या योजनेअंतर्गत 3 हप्त्यामध्ये 6000 रुपये रक्कम मिळणार आहे. ही रक्कम डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थी च्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

कशी मिळेल आर्थिक मदत

पहिला हप्ता :- गरोदरपणाच्या नोंदणी वेळी 1000/- रुपये

दूसरा हप्ता :- गर्भधारनेच्या 6 महिन्यानंतर कमीत कमी एक वेळा प्रसूतिपूर्व तपासणी केली असेल त्या महिलेस 2000/- रुपये

तिसरा हप्ता :- बाळाच्या जन्माची नोंदणी केल्यावर आणि त्याला बीसीजी, ओपिव्ही, डीपिटि आणि हिप्याटायटीस-बी ही लस दिली जाते त्या नंतर 2000/- रुपये

आणि बाळाचा रुग्णालयात जन्म झाल्यावर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत राहिलेली 1000/- रुपये रक्कम महिलेला दिली जाते.

लखपति दीदी योजनेच्या अधिक माहितीसाठी पुढील वेबसाइटला भेट द्या. : https://yojanamazi.com/lakhapati-didi-yojana-2024-in-marathi/#more-258

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे फायदे

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा Pradhanmantri Matru Vandana Yojana लाभ हा दारिद्र रेषेखालील कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या गरोदर महिलांना होणार आहे. गरोदरपणात या महिला काम करतात यामुळे त्यांना आराम मिळत नाही. आणि त्यांना पौष्टिक अन्न मिळत नाही त्या मुळे त्या झालेल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 Pradhanmantri Matru Vandana Yojana 2024 या योजनेअंतर्गत लाभाची 6000 रुपये रक्कम ही गर्भवती महिलांच्या खात्यात जमा केली जाईल.

या योजणेमुळे महिलेला गर्भवस्थेत आराम मिळेल आणि त्यांना पौष्टिक आहार मिळेल. त्यामुळे जन्माला येणारे बाळ हे सुदृढ जन्माला येईल. आणि त्या नंतर झालेल्या बाळाची योग्य ती काळजी त्यांना घेता येईल. या योजनेअंतर्गत गर्भवती महिला आणि त्यांच्या प्रसूती दरम्यान होणाऱ्या बाळाचे मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमुळे महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी पात्रता

Eligibility of Pradhanmantri Matru Vandana Yojana

  • लाभार्थी महिला भारताची मूळ रहिवासी असावी.
  • ज्या महिला 1 जानेवारी 2017 नंतर गरोदर आहेत त्या या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
  • या योजनेचा लाभ हा एका महिलेला एकाच वेळी घेता येईल.
  • जर गरोदर महिलेला पहिला हप्ता मिळाला आणि त्या नंतर तिचा प्रसूती दरम्यान गर्भपात झाला असेल आणि नंतर ती लाभार्थी महिला भविष्यात गर्भवती राहिली तर राहिलेल्या हप्त्यासाठी ती पात्र असेल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नियम व अटी

Terms and conditions of Pradhanmantri Matru Vandana Yojana

  • या योजनेचा लाभ फक्त भारतीय महिलांनाच होणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 19 वर्ष पूर्ण असावे.
  • गर्भधारनेच्या वेळी नोकरी करणाऱ्या महिलेला वेतनासह मातृत्व रजा दिली गेली तर ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • गरोदर महिलेला पहिला हप्ता मिळाला आणि त्या नंतर तिचा प्रसूती दरम्यान गर्भपात झाला असेल आणि नंतर ती लाभार्थी महिला भविष्यात गर्भवती राहिली तर राहिलेल्या हप्त्यासाठी पात्र असेल.

मातृ वंदना योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Documents of Pradhanmantri Matru Vandana Yojana

  • महिला व पती दोघांचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाइल नंबर
  • बँक किंवा पोस्ट खाते पासबूक
  • माता बाळ संरक्षक कार्ड (MCP Card)

फॉर्म 1A भरल्यानंतर अर्जासोबत माता आणि बालसंरक्षण प्रमाणपत्र या बरोबरच तुम्हाला यासोबत खाते असलेल्या बँक किंवा पोस्ट खात्याची माहिती देणे गरजेचे आहे.

लाभाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एक प्रसूती पूर्व तपासणी केली असल्याचे 1B माता आणि बाल संरक्षण प्रमाणपत्रावर नोंदणी करणे आवयशक आहे.

लाभाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्र फॉर्म 1C प्रत आणि बाळाच्या लसीकरणाचा पहिला डोस दिल्याची नोंद माता आणि बाल संरक्षण प्रमाणपत्र (MCP कार्ड) सादर करणे आवश्यक आहे.

हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी केंद्र, आरोग्य संस्थेत मोफत मिळेल जर लाभार्थी कडे आधार कार्ड, बँक खाते पासबुक नसल्यास अंगणवाडी सेविका तुम्हाला एएनएम कार्ड व खाते काढून देण्यास संपूर्ण मदत करतील.

मातृ वंदना योजनेचा लाभ कसा घ्यावा

ग्रामीण क्षेत्र  : एएनएम पात्र महिलेला अर्ज 1A देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारेल आणि गट अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्याकडे पाठवले जातील. हा अर्ज भरण्याची जबाबदारी आरोग्य केंद्र सहाय्यकाची असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जावरील माहिती तपासणी करून तालुका अधिकाऱ्याकडे पाठवतील त्यानंतर तालुका आधीकाऱ्याद्वारे ही माहिती संकेतस्थळावर भरण्यात येईल राज्यस्तरावरून माहिती तपासून लाभ दिला जाईल. 

नगरपालिका क्षेत्र: प्राथमिक आरोग्य केंद्र पात्र महिलांना अर्ज देऊन त्यांच्या कडून भरून घेऊन अर्ज स्वीकारेल यानंतर वैद्यकीय आधिकाऱ्या मार्फत हा अर्ज मुख्य अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल मुख्य अधिकारी लाभार्थी महिलेची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइट वर भरतील.

महानगरपालिका क्षेत्र: महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्र सहाय्यक पात्र लाभार्थी महिलेला विहित नमुना फॉर्म 1A देऊन पूर्ण भरलेला अर्ज स्वीकारतील. भरलेला अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.

उमंग ॲपद्वारे ही करता येणार अर्ज

देशभरातील जास्तीत जास्त महिलांना मातृ वंदना योजनेचा Pradhanmantri Matru Vandana Yojana लाभ देण्यासाठी आणि महिलांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी, महिलाच्या आर्थिक विकासासाठी सरकार कडून नवनवीन योजना राबविण्यात येतात. या योजनांचे महत्व लक्षात घेऊन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने उमंग ॲप umang app द्वारेही प्रधानमंत्री मातृत्व वंदना PM Matru Vandana Yojana या योजनेची स्व-नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आत्ता महिलांना या ॲपद्वारे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घण्यासाठी अर्ज करता येतो.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धत

Pradhanmantri Matru Vandana Yojana offline application

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा Pradhanmantri Matru Vandana Yojana 2024 लाभ घेणाऱ्या महिलांनी सर्वप्रथम आपापल्या जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र, स्वयंसेविका, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जाऊन नाव नोंदणी करावी.

नोंदणीसाठी 1-A अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह अंगणवाडी सेविका आरोग्य अधिकारी कार्यालयात जमा करावा.

त्या नंतर लाभार्थ्याने अंगणवाडी सेविका, आशा, एएनयम आरोग्य अधिकारी यांच्याकडून पोचपावती घ्यावी.

सदर फॉर्म हा AWC माण्यताप्राप्त आरोग्य सुविधेतून मोफत मिळतात किंवा महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट (http://wcd.nic.in) वरूनही तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता.

Pradhanmantri Matru Vandana Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन पद्धत

Pradhanmantri Matru Vandana Yojana online application

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा PM Matru Vandana Yojana अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर (http://wcd.nic.in) जा.

नंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल. त्या होमपेजवरील महिती भरा. त्यात तुम्हाला तुमचा मेल आयडी पासवर्ड, क्यापच्या कोड अशी सर्व माहिती भरा.

त्या नंतर लॉगिन या बटनवर क्लिक करा.

नंतर तुमच्या समोर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा फॉर्म उघडेल.  

अर्ज काळजीपूर्वक वाचुन त्यात तुमची अचूक माहिती प्रवीष्ट करा.

नंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. आशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा PM Matru Vandana Yojana ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकता.

यासाठी हेल्पलाइन नंबर :- 104

FAQ’S

  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना म्हणजे काय ?
    • गर्भवती महिला आणि तिच्या नवजात बाळची काळजी घेणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाअंतर्गत किती रुपयाची रक्कम मिळते?
    • या योजनेअंतर्गत महिला गरोदर राहिल्यापासून 3 टप्प्यात 6000 रुपये रक्कम मिळते.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा कसा करावा अर्ज?
    • या योजनेचा अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करू शकता.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी काय आहे पात्रता?
    • 1 जानेवारी 2017 नंतर गर्भधारणा राहिलेल्या महिलेस या योजनेचा लाभ होतो
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी वयाची अट काय?
    • गर्भवती महिलेचे वय 19 वर्ष पूर्ण असावे.