Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 in marathi  प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 :

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. एका बाजूला अनेक जुन्या योजनांत सुधारणा करण्यात येत आहेत तर दुसऱ्याकडे विविध नव्या योजनाही सरकार सुरू करत आहे. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना Pradhanmantri Vishwakarma Yojana असून या योजनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरूवात केली आहे.

“प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” Pradhanmantri Vishwakarma Yojana या योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असताना घोषणा केली होती. देशभरातील कारागीर आणि शिल्पकार व इतर सर्व पात्र असलेल्या नागरिकांसाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे. या योजनेला केंद्रीय मंडळानेही मान्यता दिलेली आहे. लोकांना कर्ज देऊन व्यवसायसाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशाच प्रकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना PM Vishwakarma Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू केली. देशातील कारागिर आणि शिल्पकारांना या योजनेंतर्गत विविध लाभ सरकारच्या वतीने देण्यात येत आहेत.

Pradhanmantri Vishwakarma Yojana

pmvishwakarma.gov.in

दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्प सादर करताना देशातील कारागिर आणि शिल्पकारांसाठी विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी बोलताना सीतारामन यांनी सांगितले होते की, देशातील कोट्यावधी कारागिर आणि शिल्पकारांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. याद्वारे कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विश्वकर्मा जयंती’निमित्त ही योजनेची घोषणा केली होती. या योजनेमध्ये १८ व्यवसायांशी संबंधित असलेल्या कुशल, पारंपरिक कारागिरांना आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कुठल्याही हमी शिवाय बँकाकडून ३ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते आहे. 

सरकारच्या वतीने गरजूंना ३ लाख रूपयांपर्यंची मदत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने मार्फत मिळू शकते आणि विशेष बाब म्हणजे यासाठी कुठलीही हमी देण्याची आवश्यकता नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही नियम व अटी निश्चित केलेल्या आहेत. हमी मिळवण्यासाठी तुम्ही योजनेत समाविष्ट असलेल्या १८ व्यवसायपैकी एकातरी व्यवसायाशी संबंधित असणे गरजचे आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेद्वारे कारगीर व शिल्पकार यांची ओखळ पीएम विश्वकर्मा ओळखपत्र आणि प्रमाणपत्राने केली जाणार आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे ५ ते ७ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि यासाठी ५०० रूपये प्रतिदिन प्रमाणे स्टायपेंडही देण्यात येईल. सुरूवातीला कौशल्य प्रशिक्षणासाठी १५००० रूपयांपर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन ई-व्हाउचर स्वरूपात देण्यात येतील. कोणत्याही हमी शिवाय लाभार्थ्याला या योजनेंतर्गत ३ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. दोन हप्त्यात ही रक्कम दिली जाईल. अनुक्रमे १८ महिने आणि ३० महिन्यांच्या कालावधीसाठी १ लाख व २ लाख रूपयांची द्विसाप्ताहिक कर्ज ५ टक्के व्याजाने सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येईल. याचा व्यवसाय वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे.

Pradhanmantri Vishwakarma Yojana

ठळक मुद्दे:-

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत थोडक्यात माहिती

PM Vishwakarma Yojana Online Apply पीएम विश्वकर्मा योजनेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत यांना मिळेल कर्ज

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने साठी काय आहे पात्रता

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना म्हणजे काय

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे वैशिष्ट्ये

पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 साठी अपात्र कोण?

FAQ’s

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत थोडक्यात माहिती

योजनेचे नावप्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरू केली१७ सप्टेंबर २०२३
किती मिळणार कर्ज3 लाख रुपये  
किती व्ययसायांना मिळणार लाभ१८ व्यवसायांना मिळणार लाभ
उद्देशकारागिरांचे जीवनमान सुधारणे
लाभदेशातील पारंपारिक कारागीर व शिल्पकलाकार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटpmvishwakarma.gov.in 
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत यांना मिळेल कर्ज
सुतार, लोहार, कुंभार विविध प्रकारचे अवजारे बनवणारे लोहार, सोनार, शिल्पकार, चर्मकार, मिस्त्री, टोप्या, चटया, झाडू वायर साहित्य कारागीर, खेळण्या बनवणारे पांरपारिक कारागीर, न्हावी, फुलांचे हार बनवणारे कारागीर, शिंपी, मासेमारी आणि जाळी विणण्याचे काम करणारे कारागीर, कुलूप बनवणारे कारागीर आदींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे
Documents of Pradhanmantri Vishwakarma Yojana
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट साईज फोटो
सही किंवा अंगठा
शैक्षणिक सर्व कागदपत्रे
बँक पासबुक
वैध मोबाईल नंबर

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने साठी काय आहे पात्रता
Eligibility of PM Vishwakarma Yojana
अर्जदार भारताचा नागरिक असावा.
लाभार्थी विश्वकर्मा योजनेत असलेल्या १८ व्यवसायापैकी एकाचा असावा.
अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षा दरम्यान असावे
मान्यताप्राप्त संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे.
योजनेंतर्गत समाविष्ट केलेल्या १४० जातींपैकी एक असावा

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

PM Vishwakarma Yojana Online Apply

अधिकृत वेबसाइट : pmvishwakarma.gov.in  वर जा.

मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना दृश्यमान असेल.

Apply Online पर्यायावर क्लिक करा.

आता येथे तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.

नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.

यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा.

भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.

त्यानंतर फॉर्मवर भरलेली सर्व माहिती एकदा तपासून सबमिट बटनावर क्लिक करून तुमचं अर्ज  सबमिट करा.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योनजेंतर्गत PM Vishwakarma Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपारिक कारागिरांचे कौशल्य टिकून राहावे आणि याद्वारे त्यांचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी ही योजना सुरू केली आहे. याद्वारे देशभरातील ३० लाख कारागिरांना लाभ मिळणे अपेक्षित असून यात सुतार, लोहार, चर्मकार, नाभिक, कुंभार, शिंपी, धोबी अश्या १४० जाती समूहांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योनजनेचा PM Vishwakarma Yojana लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत कारागिरांना प्रशिक्षण आणि निधी नसलेल्यांना सरकारी आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण कारागिरांना एक लाख रूपयांचे स्वस्त दरात कर्ज मिळेल. पहिल्या एक लाख रूपयांची परतफेड कालावधी १८ महिन्यांचा आहे. तर दुसऱ्या दोन लाख रूपयांची परतफेड कालावधी ३० महिन्यांचा ठरवण्यात आली आहे. यामुळे कर्ज परत करण्यासाठी कारागिरांवर आर्थिक भार येणार नाही, याचीही काळजी सरकारच्या वतीने घेण्यात आलेली आहे.

सुतार, कुंभार, सोनार, शिल्पकार यासारख्या पारंपारिक कारागीर विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतो. सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर कुठे अधिकारागिरांना या योजनेचा लाभ मिळत आहे केंद्र सरकारने विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत छोट्या आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना आधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच ज्या कारागीरांकडे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक भांडवल नाहीये अशा कारागिरांना सरकार या योजनेअंतर्गत आर्थिक मदतही करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंती निमित्त घोषित केलेली विश्वकर्मा सन्मान योजना अंतर्गत कारागीर आणि छोट्या व्यावसायिकांना कौशल्य विकासासाठी पायाभूत सुविधा नव्या पद्धतीने तयार करण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने आजच्या कारागिरांना उद्याचे मोठे उद्योगपती बनवणे हे सरकारचे ध्येय असल्याचे मोदी म्हणाले होते. यासाठी या कारागीरांना उत्पादनाची पॅकेजिंग डिझाईनिंग यावर काम केले जात आहे. ग्राहकाची गरज ओळखून त्या अनुषंगाने व्यवसाय बदल करणे ही काळाची गरज आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेतही या कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या योजनेअंतर्गत देशातील 18 बलुदारांना या योजनेचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना ही सरकारने सुरू केलेली एक लोकप्रिय योजनांपैकी आहे. निर्मला सीतारामन यांनी 2003 च्या अर्थसंकल्पात या योजनाची घोषणा करून या योजनेसाठी मोठी तरतूद केली होती या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशभरातील पारंपारिक कारागीर शिल्प कलाकार यांना यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे

Pradhanmantri Vishwakarma Yojana

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना म्हणजे काय?

What is Pradhanmantri Vishwakarma Yojana?

केंद्र सरकारने देशातील पारंपारिक कलाकाराने शिल्प कलाकारांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना Pradhanmantri Vishwakarma Yojana सुरू केली आहे. ही योजना अर्थमंत्री सीतारामन यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पारंपारिक कौशल्यांना चालना दिली जाणार आहे.  या कारागिरांना प्रशिक्षण आर्थिक मदत तांत्रिक सुविधा आधी गोष्टी या योजनेद्वारे पुरवल्या जातील.

या योजनेला भगवान विश्वकर्मा यांचे नाव देण्यात आले आहे. विश्वकर्मा योजनेअंतर्गत 140 जाती येतात ज्या भारतातील विविध भागात राहतात यामुळे देशातील कारागिरांना त्यांचे कौशल्य वाढवण्याची संधी या योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्यांना तांत्रिक माहितीही या माध्यमातून दिली जाणार आहे. आर्थिक मदतही सरकार या योजनेअंतर्गत करणार आहे. यातून त्यांना व्यवसाय वाढीस फायदा होईल.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 चा मुख्य उद्देश म्हणजे पारंपारिक कारागीर, शिल्प कलाकार यांचे उत्पादन वाढवून त्यांना आर्थिक सहाय्य करणे. जेणेकरून त्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल तसेच त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होईल कुठलेही क्षेत्र असले तरी त्यामध्ये कौशल्य असणे अत्यावश्यक आहे. अनेक वेळा कारागिरांना योग्य प्रशिक्षण न मिळाल्यामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे ते आपल्या व्यवसाय वाढू शकलेले नाहीत. त्यामुळे या योजनेतून त्यांना प्रशिक्षण देऊन आर्थिक मदत करत त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मदत करणार येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व आर्थिक मदत मिळाल्यानंतर विश्वकर्मा समाजातील सर्व लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन समाज व देशाच्या प्रगतीत तिला हातभार लावतील असा मोदींनी विश्वास व्यक्त केला आहे. या माध्यमातून कारागिरांना भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत देशातील 140 हून अधिक जाती समुदाय यामध्ये येतात यामुळे मोठ्या प्रमाणात देशातील कारागिरांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत अनेक पारंपारिक कौशल्य असलेल्यांना सक्षम करण्यात येणार आहे. तसेच या कारागिरांना उत्पन्नाचा चांगला स्रोत सरकार उपलब्ध करून देणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार कारागिरांना त्यांच्या उत्पन्नाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनाचे विपण आणि वितरण डिजिटल पद्धतीने कसे करावे याचेही प्रशिक्षण देणार आहे. यामुळे व्यवसाय वाढीस चालना मिळेल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे वैशिष्ट्ये

  • आत्तापर्यंत पारंपारिक पद्धतीने आपल्या कौशल्यातून देशात विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
  • केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पारंपारिक कारागीर आणि शिल्प कलाकारांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
  • या योजनेअंतर्गत या पारंपरिक कारागिरांना अत्याधुनिक प्रशिक्षण व आपला व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • कौशल्य विकासातून त्यांच्या पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे यामुळे त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कारागिरांचे जीवनमान सुधारणे आणि या पारंपारिक कलाकारांना प्रोत्साहन देणे हा आहे.
https://yojanamazi.com/pradhanmantri-suryoday-yojana/

पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे

देशातील विश्वकर्मा समुदायातील 140 जातीतील कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत या समुदायातील लोकांना प्रशिक्षण दिले जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेमुळे या समुदायातील कारागिरांना रोजगार मिळेल आणि देशातील बेरोजगारीचे प्रमाण  होण्यासही मदत होईल.

प्रशिक्षण आणि आधुनिक तेची जोड मिळाल्यामुळे त्यांच्या व्यवसाय वाढीस फायदा होईल. आणि त्यांचे आर्थिक स्थिती ही सुधारण्यास मदत होईल.

या योजनेचा देशातील कारागीर शिल्प कलाकार व पारंपारिक कारागीर म्हणून काम करणाऱ्या सर्वांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत देशातील पारंपारिक कलाकार कारागिरांना आर्थिक मदत दिली जात आहे. जेणेकरून त्यांच्या कलागुणांना वाव मिळून जाईल या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे त्यांना व्यवसाय वाढीस मोठा फायदा होत आहे. यामुळे लाभार्थ्याचे जीवनमानही सुधारत आहे. या योजनेअंतर्गत कलाकारांचे ब्रँड प्रमोशनही केले जात आहे पारंपारिक कलाकारही या योजनेतून सक्षम आणि स्वावलंबी बनत आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 साठी अपात्र कोण?

विश्वकर्मा योजनेची क्षमता बद्दल बोलायचे झाल्यास सर्वात महत्त्वपूर्ण क्षमता असलेली ही एक योजना आहे. मागील पाच वर्षात तुम्ही पीएमईजीपी प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कुठलाही लाभ घेतला नसेल तर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत असू नये म्हणजेच सरकारी सेवेमध्ये कार्यरत असलेले व्यक्ती आणि त्यांच्या परिवाराचे सदस्य या योजनेसाठी पात्र नसतील

FAQs

1 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना म्हणजे देशातील पारंपारिक कारागीर शिल्पकलाकार यांच्या कलांना प्रोत्साहन देणे त्यांना आधुनिकतेची जोड देत आर्थिक मदत करत त्यांचा व्यवसाय वाढवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

2 विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना कधी सुरू झाली?

निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा आता मोठ्या प्रमाणात कारागिरांना लाभ होत आहे.

3 या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

देशातील पारंपारिक कारागीर व शिल्पकलाकार यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

4 या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता यासाठी pmvishwakarma.gov.in  वर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.