Pradhanmatri krushi sinchai yojana 2024 in marathi : कृषि सिंचन योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2024 Pradhanmatri krushi sinchai yojana information

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. आजही भारतातील 90% शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरवर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. भारत देश कृषी प्रधान असूनही देशात मुबलक प्रमाणात सिंचनाच्या सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नाहीयेत, ही गोष्ट लक्षात घेऊनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन  योजना Pradhanmatri krushi sinchai yojana सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे अनियमित पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान टाळता येऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना शेतात सिंचन करण्यासाठी आणि त्या संबंधित उपकरण खरेदी करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे Pradhanmatri krushi sinchai yojana अनुदान देण्यात येते. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानामार्फत त्या शेतकऱ्याला आपल्या शेतात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून घेता येतात. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. आणि देशातील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

जर तुम्ही शेतकरी असाल, आणि तुम्हालाही तुमच्या शेतात सिंचन करायचे असेल तर, ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज आपण या योजनेअंतर्गत काय लाभ मिळतात, या योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेसाठी कोण पात्र आहे, या सर्व विषयाची माहिती आपल्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Pradhanmatri krushi sinchai yojana

ठळक मुद्दे :

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना म्हणजे काय?

What is Pradhanmatri krushi sinchai yojana

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची थोडक्यात महिती

Pradhanmatri krushi sinchai yojana in short

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश काय?

Purpose of Pradhanmatri krushi sinchai yojana

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे वैशिष्ट्ये

Feature of Pradhanmatri krushi sinchai yojana

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदे

Benefits of Pradhanmatri krushi sinchai yojana

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेची पात्रता

Eligibility of Pradhanmatri krushi sinchai yojana

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Documents of Pradhanmatri krushi sinchai yojana

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Pradhanmatri krushi sinchai yojana online application

FAQ

अधिकृत वेबसाइट pmksy.gov.in

Pradhanmatri krushi sinchai yojana

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना म्हणजे काय?

Pradhanmatri krushi sinchai yojana 2024 शेतीला मुबलक पाणी आणि सिंचनाची योग्य सुविधा असेल तर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन उत्पादन होत असते. त्यासाठी सिंचन ही महत्त्वाची बाब आहे. पिकांना योग्य वेळी पाणी न मिळाल्यास पीक वाया जाते. आणि यातून शेतकऱ्याला मोठे नुकसानाला सामोरे जावे लागते. मात्र, या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचन सुविधाची सोय उपलब्ध करून घेता येणार आहे. त्यामुळे शेतातील पिकांना योग्य वेळी पाणी देऊन भरघोस उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन साठी अर्ज करता येणार आहे. तसेच याद्वारेच सिंचनाचे उपकरण खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी सुद्धा दिली जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी त्यांच्या शेतात सिंचनाचे उपकरण घेऊन योग्यरित्या सिंचन करू शकतील, आणि आपले उत्पादन वाढवून देशाच्या विकासात हातभार लावू शकते.

Pradhanmatri krushi sichai yojana या योजनेचा लाभ बचत गट, ट्रस्ट सहकारी संस्था निगमित कंपन्या, उत्पादक शेतकरी, गटाचे सदस्य व इतर सर्व पात्र संस्थांच्या सदस्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा PMKSY अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने तब्बल 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे या योजनेला कुठल्याही प्रकारचा निधी सरकारकडून कमी पडू दिल्या जाणार नसल्याचेही योजना सुरू करताना सांगण्यात आलेले आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची थोडक्यात महिती

योजनेचे नावप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरू झाली1 जुलै 2015
लाभार्थी कोणदेशातील सर्व शेतकरी
उद्दिष्टशेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटpmksy.gov.in
https://en.wikipedia.org/wiki/Pradhan_Mantri_Krishi_Sinchai_Yojana

सुकन्या समृद्धी योजनेच्या माहितीसाठी इथे क्लिक करा. https://yojanamazi.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माहितीसाठी इथे क्लिक करा. https://yojanamazi.com/pradhanmantri-pik-vima-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी इथे क्लिक करा. https://yojanamazi.com/pm-mudra-loan-yojana-2024-in-marathi/

Pradhanmatri krushi sichai yojana

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश काय?

Purpose of Pradhanmatri krushi sichai yojana

शेतातील पिकांना योग्य वेळी पाणी न मिळाल्यास पिकाचे अतोनात नुकसान होते. हे टाळण्यासाठी ही PMKSY योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान होते. पण जर सिंचन व्यवस्था असेल तर शेतकऱ्यांना या नुकसानीपासून बचाव होण्यास मदत होते, आणि उत्पादन वाढही मोठ्या प्रमाणात होते. अनेकदा काही कारणामुळे पाऊस पुरेसा प्रमाणात पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होते. ही शेतकऱ्यांची पाण्याची सिंचनाची समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना Pradhanmatri krushi sinchai yojana सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्याचा निर्धार केला आहे. या योजनेअंतर्गत नैसर्गिक गरजवंतांचा अधिकाधिक वापर करण्यावर सरकारने भर दिला आहे.

Pradhanmatri krushi sinchai yojana देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे, सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या महागड्या उपकरणाच्या खरेदीवर 80 ते 90% अनुदान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे

दुष्काळ आणि अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने कृषी सिंचन  योजना सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना भरगोस उत्पन्न मिळते, आणि त्यांच्या पिकांची नुकसान देखील होत नाही. त्यामुळे कृषी सिंचन योजना 2024 Pradhanmatri krushi sinchai yojana 2024 लाभदायी ठरत आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे वैशिष्ट्ये

आपण पाहत आहोत की, सरकार सध्या नवनवीन योजना राबवत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना सरकारमार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PM krushi sinchai yojana आहे.

लहरी पावसापासून शेतीचे नुकसान होण्यास वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी सिंचन  योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार जल संचय, भूजल विकास आदी जलस्रोत निर्माण करत आहे. याबरोबरच सरकार शेतकऱ्यांना सिंचनाचे साहित्य खरेदी केल्यावर त्यावरही मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे. या योजनेमुळे पिकांना योग्य वेळी पाणी देण्याची सुविधा उपलब्ध होते. यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्यात मोठे योगदान या योजनेचे आहे.

सरकारच्या वतीने ठिबक सिंचन, तुषार सिंचन आदि खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते.

Pradhanmatri krushi sinchai yojana या योजनेचा लाभ ज्यांच्याकडे स्वतःची जमीन व पाण्याचे स्त्रोत आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना घेता येतो. याशिवाय जे शेतकरी कंत्राटी पद्धतीने शेती करत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

बचत गटामार्फत करण्यात येणाऱ्या ग्रुप शेतीलाही सरकारच्या वतीने या योजनेचा लाभ दिला जातो.

Pradhanmatri krushi sinchai yojana या योजनेअंतर्गत सरकार सिंचन उपकरणे खरेदी करण्यावर शेतकऱ्यांना 80 ते 90 टक्के अनुदान देते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदे

Benefits of Pradhanmatri krushi sinchai yojana

या योजनेअंतर्गत PMKSY सिंचन सुविधांसह तुमचं उपकरणे खरेदीसाठी ही शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.

कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PM krushi sinchai yojana  सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य वेळी पाणी देता येते.

Pradhanmatri krushi sinchai yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जमीन आणि जल स्त्रोत म्हणजेच विहीर किंवा बोअरवेल अशा सुविधा असतील तरच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2024 Pradhanmatri krushi sinchai yojana 2024 च्या माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढवणे आणि यातून आर्थिक प्रगती करणे हा उद्देश सरकारने ठेवला आहे.

या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 75 टक्के अनुदान तर 25 टक्के खर्च राज्य सरकार मार्फत करण्यात येत आहे.

सिंचनाद्वारे शेतीला पाणी दिल्यामुळे पाणी वापरातही 40 ते 50 टक्के बचत होणार आहे, तसेच कृषी उत्पादन 40% पर्यंत वाढण्याची शक्यता ही आहे.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेची पात्रता

Eligibility of Pradhanmatri krushi sinchai yojana

Pradhanmatri krushi sinchai yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे.

शेतकरी भारताचा नागरिक असावा.

या योजनेचा बचत गट, सहकारी संस्था, अंतर्भूत कंपन्या व उत्पादक शेतकरी गटांचे सदस्य व इतर पात्र संस्थांच्या सदस्यांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.

त्या योजनेचा लाभ त्या संस्थांना होणार आहे ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी 60 वर्षासाठी भाडेपट्ट्यांनी करारानुसार असेल ही पात्रता कंत्राटी शेतीतूनही मिळवता येते.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Documents of Pradhanmatri krushi sinchai yojana

शेतकऱ्याचे आधार कार्ड

ओळखपत्र

जमिनीची कागदपत्र

बँकेचे पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

पॅन कार्ड नंबर

रहिवासी प्रमाणपत्र

घराची कागदपत्रे

मोबाईल नंबर आदी

Pradhanmatri krushi sinchai yojana

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Pradhanmatri krushi sinchai yojana online application

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारची अधिकृत साईट pmksy.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकता

कृषी सिंचन योजनेचा PM krushi sinchan yojana लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

तूमच्या समोर एक होम पेज ओपन होईल.

त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा होम पेजवर लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ईमेल आयडी किंवा तुमच्या नावाने लॉगिन करू शकता.

लॉग इन केल्यानंतर वेबसाईटच्या अबाउट सेक्शन मध्ये जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती भरू शकता.

याबरोबरच इंटरनेट कॅफे किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना संबंधित कार्यालयात जाऊनही तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

FAQ

काय आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना?

दुष्काळी परिस्थिती आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यापासून वाचवण्यासाठी सरकारने कृषी सिंचन योजना सुरू केली आहे या अंतर्गत शेतामध्ये सिंचन करून पिकांना योग्य वेळी पाणी उपलब्ध करून देण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे लाभार्थी कोण?

देशातील सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत त्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे याबरोबरच पाण्याची उपलब्धता ही असणे आवश्यक आहे त्याशिवाय कंपन्या, सहकारी समित्या, बचत गट, ट्रस्ट इत्यादींनाही या योजनेचा लाभ घेता येतो.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी कोण आहेत पात्र?

या योजनेसाठी ज्यांच्याकडे शेती आणि पाणी उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि ते या योजनेसाठी अर्ज करून आपल्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करू घेऊ शकतात त्यामुळे त्यांच्या पिकांना योग्य वेळी पाणी मिळेल आणि त्यांचे उत्पादन वाढण्यात मदत होईल.

प्रधानमंत्री कृषी सिंचन म्हणजे काय?

दुष्काळी परिस्थिती आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यापासून वाचवण्यासाठी सरकारने कृषी सिंचन योजना सुरू केली आहे

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करू शकता. त्या साठीची अधिकृत वेबसाइट pmksy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश?

देशातील शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे पानी उपलब्ध करून देणे. हा या योजणेचण मुख्य उद्देश आहे. तसेच महागड्या सिंचनाच्या उपकरणाच्या खरेदीवर 80 ते 90% अनुदान दिले जात आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

देशातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र त्यांच्याकडे स्वतःची जमीन आणि मुबलक पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.