Prakash Karkhanis Hanuman Temple History : दादर स्टेशन बाहेरच्या हनुमान मंदिराचा काय आहे इतिहास

Prakash Karkhanis Hanuman Temple History : 80 वर्षांपूर्वी झाडाखाली काय घडलं याचा इतिहास

Prakash Karkhanis Hanuman Temple History : दादर स्टेशन बाहेरच्या हनुमान मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानिस यांनी 80 वर्षांपूर्वी झाडाखाली काय घडलं याबद्दलचा इतिहास सांगितला आहे. 80 वर्ष जुने हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी रेल्वे कडून नोटीस बजावण्यात आली आहे. दादर पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 च्या बाहेर अनधिकृत मंदिर आहे. 7 दिवसांच्या आत या मंदिराच्या विश्वस्तांनी स्वतः पाडावं किंवा रेल्वे कडून काढण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल असं दिलेलं नोटीस मध्ये लिहिलेल आहे. या मंदिराच्या विश्वस्तांनी या हनुमान मंदिराचा इतिहास सांगितला आहे.

काय म्हणाले कारखानीस?

Dadar railway station hanuman temple demolition notice

Dadar railway station hanuman temple दादर मधील हे मंदिर खूप वर्षांपासून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी मंदिराची सेवा केली जाते. हे मंदिर दादर रेल्वे स्थानक होण्याच्या आधीपासून या ठिकाणी आहे. हे हनुमानाचे मंदिर या ठिकाणी असलेल्या हमालांचे आहे. आम्हाला या ठिकाणी एका झाडाखाली ही मूर्ती मिळाली होती. त्यानंतर त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं. गेल्या 80 वर्षांपासून या भागात हे मंदिर उभे आहे. असे प्रकाश कारखानीस म्हणाले. Dadar railway station hanuman temple demolition notice
या हनुमान मंदिराला नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु आम्ही कायदेशीर बाबी नंतर पाहू. त्याआधी हिंदू म्हणून या मंदिराला वाचवण्याचा प्रयत्न करू असे म्हणाले. त्यानंतर अनेक लोक यामध्ये आता राजकीय बोलत आहेत परंतु राजकीय न पाहता एक हिंदू म्हणून या ठिकाणी हे मंदिर वाचवण्यासाठी जे कोणी येत असतील त्यांचे मी स्वागत करतो असेही म्हणाले.