Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana 2024 Information In Marathi : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 मराठी माहिती
Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana 2024 : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 सरकारने पुनः सुरू केली. या योजनेअंतर्गत एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास राज्य सरकारच्या वतीने दीड लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे यासंबंधीची सुधारित योजना राज्य सरकारने लागू केली आहे. महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलामुलींसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती त्या वेळेच्या शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली. यापूर्वी विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपयाची मदत करण्यात येत होती, मात्र आता सुधारित योजनेअंतर्गत एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसेच अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व, दोन अवयव, दोन डोळे किंवा एक अवयव, एक डोळा निकामी झाल्यास एक लाख रुपयांची मदत मिळते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व, एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी झाल्यास 75 हजार रुपयांचे अनुदान विद्यार्थ्यास मिळते. अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास रुग्णालयाचा खर्च किंवा एक लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयाची मदत सरकारचे मार्फत देण्यात येणार आहे. याबरोबरच पहिली ते बारावी मधील शिक्षण घेणारा कोणताही विद्यार्थी अन्य कुठल्याही कारणाने जखमी झाल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा एक लाख रुपयाची आर्थिक मदत सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana
Rajiv Gandhi Student Accident Insurance Yojana राज्य सरकारच्या वतीने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास व त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यातील पहिली ते बारावीपर्यंत सर्व विद्यार्थी पात्र आहेत.
एखाद्या कारणाने अपघात झाल्यास विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी 1 आक्टोंबर 2013 रोजी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना Rajiv Gandhi Accident Insurance Scheme सुरू करण्यात आली होती. त्यात 21 जून 2022 रोजी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेसह राज्यात ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्याचा राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सुरक्षा कवच Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana 2024 या योजनेतून मिळते.
Rajiv Gandhi Apghat Vima 2024 In Marathi राज्य सरकार राज्यातील विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना सतत राबवत असते. त्या योजनेचा भाग म्हणूनच शासनाने आता विद्यार्थ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024 Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana 2024 असे आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचा अचानक अपघात झाला या अपघातात तो जखमी झाला तर त्या विद्यार्थ्याला अपघातामुळे काही प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी सरकारने केली आहे. किंवा अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याला आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून दिली जाते. Vidyarthi Apghat Vima Yojana काय आहे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना?, कोणते विद्यार्थी आहेत यासाठी पात्र?, यासाठी अर्ज कसा करावा?, या योजनेचे उद्दिष्टय फायदे काय आहेत?, कोणाला मिळणार या योजनेचा लाभ? या सर्वांची माहिती आपण आज या योजनेच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती पाहूया त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. Vidyarthi Apghat Vima Yojana
राजीव गांधी अपघात विमा योजना म्हणजे काय
Rajiv Gandhi Accident Insurance Scheme In Marathi
राज्य सरकारने राजीव गांधी अपघात विमा योजना Rajiv Gandhi Apghat Vima Yojana इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघातामुळे जखमी झाल्यास किंवा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास काही प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळावी व विद्यार्थ्याला सुरक्षा कवच मिळावे. या उद्देशाने ही योजना सरकारने सुरू केली आहे. एखाद्या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्यास या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.
विद्यार्थी अपघात विमा योजनेच्या Vidyarthi Apghat Vima Yojana माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारच्या वतीने दीड लाखापर्यंतची आर्थिक मदत देण्यात येते. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मुलाचा औषधी उपचार करण्यासाठी मदत होत आहे. अपघात झाल्यानंतर अनेक कुटुंबांकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.
Rajiv Gandhi Apghat Vima 2024 In Marathi राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना विद्यार्थ्यांसाठी राबवत असते, यामध्ये विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी उच्च शिक्षण योजना अशा प्रकारच्या योजना राबवत असते. त्या योजनेचा भाग म्हणून राज्य सरकारने आता एक नवीन योजना सुरू केली आहे, तिचे नाव राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana आहे. विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या उद्देशाने राज्यातील इयत्ता पहिली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपनी मार्फत शासन निर्णय 20 ऑगस्ट 2000 पासून राबविण्यात येत होती. यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विम्याचे हप्ते एकत्रित रित्या सरकारच्या वतीने भरण्यात येत होते. या योजनेचा उद्देश जरी चांगला असला तरी पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता. विमा कंपन्यांच्या वर्तनामुळे शासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबद्दल टाळाटाळ करत होत्या. विद्यार्थ्यांचे अपघाताचे दावे लवकर निकाली लावत नसल्यामुळे विधिमंडळात तारांकित प्रश्नच अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने विमा कंपन्या मार्फत योजना बंद करून त्याऐवजी सानुग्रह अनुदान योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा सरकारने निर्णय 11 जुलै 2011 ला घेतला होता. ही योजना 27 ऑगस्ट 2010 ते 26 ऑगस्ट 2012 पर्यंत राबविण्यात आली व नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली.
सरकारकडून सानुग्रह अनुदानांतर्गत वितरित केलेली रक्कम
वर्ष | लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या | सानुग्रह अनुदानाची रक्कम |
2011-12 | 403 विद्यार्थी | 2,72,60,000 |
2012-13 | 329 विद्यार्थी | 2,38,43,000 |
2013-14 | —— | 5,00,00,000 |
ठळक मुद्दे :
राजीव गांधी अपघात विमा Rajiv Gandhi Apghat Vima 2024 In Marathi योजना म्हणजे काय
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची थोडक्यात माहिती
राजीव गांधी अपघात विमा Rajiv Gandhi Apghat Vima 2024 In Marathi योजनेचा उद्देश
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची वैशिष्ट्ये
या कारणामुळे मृत्यू झाल्यास मदत मिळणार नाही
विद्यार्थी अपघात विमा योजनेचे लाभार्थी
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी पात्रता
विमा योजना अंतर्गत दिले जाणारे लाभ
विद्यार्थी अपघात विमा योजनेचे फायदे
विद्यार्थी अपघात विमा योजनेचे नियम व अटी
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना साठीची कागदपत्रे
विद्यार्थी अपघात विमा योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची अंमलबजावणी
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
FAQ’s
Rajiv Gandhi Apghat Vima 2024 In Marathi या योजनेची फलश्रुती लक्षात घेऊन 27 ऑगस्ट 2012 पासून ही योजना नियमित स्वरूपात सुरू ठेवण्याबाबत सरकार विचाराधीन होते. सर्व बाबींचा विचार करून सरकारने 2012 पर्यंत राबवलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नियमित करण्याचा निर्णय घेतला आणि ही योजना आतापर्यंत सुरू आहे.
या योजनेसाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुला मुलींना ही योजना लागू आहे. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास मदत करण्यात येते.
यापूर्वी ही योजना राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana या नावाने विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत होती. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या विम्याचे हप्ते राज्य सरकारकडून अदा करूनही विमा कंपन्या विविध कारणे देऊन विद्यार्थ्यांचे अपघात दावे ताटकळत ठेवत होते आणि त्यांना उशिराने मदत देत होते. त्यामुळे राज्य सरकारने ही विमा कंपन्या मार्फत चालू जाणारी योजना बंद केली व सदर योजना सहानुग्रह अनुदान योजना Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana या नावाने राबविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील बहुतांश कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील आहेत. तसेच त्यांचा रोजगार कायमस्वरूपी नाही, त्यामुळे आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक अडचण येते. त्यांना विम्याचे महत्त्व माहीत असून सुद्धा आर्थिक अडचणीमुळे ते विम्याचे हप्ते भरू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विमा ते काढत नाहीत. त्यामुळे मुलाचा अपघात झाल्यास उपचारासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात अशावेळी त्यांना मुलाच्या उपचारासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खाजगी सावकाराकडून व्याजाने कर्ज घेऊन मुलावर उपचार करण्याची वेळ त्यांच्यावरील येते अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी राज्य सरकारने विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्यांना विमा संरक्षण देणे हा आहे.
Rajiv Gandhi Apghat Vima 2024 In Marathi राज्यातील अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत त्यांच्या पालकांना विम्याचे महत्त्व माहीत असूनही विम्याचे हप्ता भरण्याचा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो म्हणून ते विमा कवच घेत नाहीत मात्र एखाद्या वेळी मुलाचा अपघात झाला तर त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसतात. मुलाच्या उपचारासाठी पैसे कुठून आणावे हा त्यांच्यासमोर मोठा ग्रहण प्रश्न निर्माण होतो. ही परिस्थिती लक्षात घेता. राज्य सरकारने 26 ऑक्टोबर 2000 पासून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना पुन्हा एकदा राज्यात सुरू केली आहे.
यापूर्वी ही योजना विमा कंपन्यामार्फत चालवली जात होती. पण त्या विमा कंपन्या विद्यार्थ्यांना वेळेवर मदत करत नसल्यामुळे राज्य सरकारने ही योजना सानुग्रह अनुदान योजनेच्या नावाने स्वतःच राबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वो पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. Rajiv Gandhi Student Accident Insurance Yojana एखादा विद्यार्थी अपघातामुळे जखमी झाल्यास किंवा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. यापूर्वी अपघातात एखाद्या मृत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 75 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. मात्र आता वाढलेली महागाई आणि विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारचे अपघात या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या निर्णयात बदल केले आहेत त्यावेळच्या शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी यात सुधारणा केल्या आहेत. या सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघातू मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांपर्यंतच्या अनुदान आणि अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचे अनुदान सरकारच्या माध्यमातून देण्यात येते.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची थोडक्यात माहिती
Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana In Short
योजनेचे नाव | राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना |
कोणी सुरू केली | राज्य सरकार |
लाभार्थी कोण | इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी |
लाभ किती | दीड लाखापर्यंत आर्थिक मदत |
उद्देश काय | विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणे |
विभाग | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र सरकार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
राजीव गांधी अपघात विमा योजनेचा उद्देश
Rajiv Gandhi Accident Insurance Scheme Purpose
- राजीव गांधी अपघात विमा योजनेचा Rajiv Gandhi Accident Insurance Scheme मुख्य उद्देश म्हणजे एखाद्या विद्यार्थी अपघातात जखमी झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे आणि त्यांना विमा संरक्षण देणे.
- एखाद्या विद्यार्थ्यांचा अचानक अपघात झाल्यानंतर पालकांना विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी कर्ज काढावे लागू नये म्हणून सरकारच्या वतीने ही आर्थिक मदत करण्यात येते.
- सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी सरकारने पुढाकार घेऊन विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे.
- मुलाच्या अपघाताच्या वेळी पालकांचा समोर निर्माण होणारी आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा उद्देश सरकारचा आहे. Rajiv Gandhi Accident Insurance Scheme
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची वैशिष्ट्ये
Rajiv Gandhi Student Accident Insurance Yojana Feature
- विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची विमा योजना आहे. यामुळे अपघातात जखमी झालेल्या आणि मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना दीड लाखापर्यंतची आर्थिक मदत सरकारच्या वतीने करण्यात येते.
- राज्यातील पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विमा संरक्षण या योजनेच्या माध्यमातून दिले जाते.
- राज्यातील मुला-मुलींना या योजनेच्या माध्यमातून अपघात झाल्यास सानुग्रह अनुदान मिळते.
- या योजनेसाठी कुठल्याही जाती धर्माची अट नाही राज्यातील प्रत्येक पहिले ते बारावी मध्ये शिकणारा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे.
- हे विमा संरक्षण घेण्यासाठीचे हप्ते सरकार भरत असल्यामुळे पालकावर याची आर्थिक भार पडणार नाही.
- Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana या योजनेमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर उपचार करताना पालकांना इतर कोणावर आर्थिक मदतीसाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पालकांसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे.
- या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.
- राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे विद्यार्थी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे.
- राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
- राजीव गांधी अपघात विमा योजना सानुग्रह अनुदान योजना Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana या नावाने देखील ओळखली जाते.
तुम्ही या योजनेचा घेतलाय का लाभ?
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024
या कारणामुळे मृत्यू झाल्यास मदत मिळणार नाही
Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana
आत्महत्येचा प्रयत्न करणे
आत्महत्या किंवा जाणून जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे
गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
अमली पदार्थाच्या अंमल अमलाखाली असताना झालेला अपघात
नैसर्गिक मृत्यू
मोटार शर्यतीतील अपघात
योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा करण्यात येते.
- विद्यार्थ्यांची आई
- आई हयात नसल्यास वडील
- विद्यार्थ्याचे आई-वडील हयात नसल्यास अठरा वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक
विद्यार्थी अपघात विमा योजनेचे लाभार्थी
Rajiv Gandhi Accident Insurance Scheme Beneficiary
राज्यातील पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे सर्व मुलं-मुली या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी पात्रता
Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana Eligibility
विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
तो विद्यार्थी पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असावा.
विमा योजना अंतर्गत दिले जाणारे लाभ
Rajiv Gandhi Accident Insurance Scheme Benefits
राज्यातील पहिली ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी एखादा अपघातामुळे जखमी झाल्यास किंवा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्यासाठी विद्यार्थ्याला सुरक्षा कवच देण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दीड लाख पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
विद्यार्थी अपघात विमा योजनेचे फायदे
- Rajiv Gandhi Accident Insurance Scheme या योजनेच्या माध्यमातून पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमा संरक्षण कवच मिळते.
- विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास कुटुंबीयांना रुग्णालयात लागणारा खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता राहत नाही.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला सुरक्षा कवच देण्यात आल्यामुळे त्याच्यावर मोफत उपचार करण्यात येतो.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा एक उद्देश यामागे आहे.
- मुलाचा अपघात झाल्यास पालकांना पैशासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता या योजनेमुळे राहत नाही आणि ते आपल्या मुलावर योग्य वेळी रुग्णालयात उपचार करू शकतील
- आपल्या मुलावर मोफत उपचार होत असल्यामुळे पालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
विद्यार्थी अपघात विमा योजनेचे नियम व अटी
Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana Terms & Conditions
- केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- राज्य बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
- या योजनेचा लाभ पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींनाच मिळतो.
- विद्यार्थ्याने काही कारणामुळे शाळा सोडली असल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थ्याने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या अन्य कोणत्या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाचा लाभ घेतला असल्यास तो या योजनेसाठी पात्र नसेल.
- विद्यार्थ्याचे आई-वडील दोघांपैकी कोणी सरकारी नोकरीत असल्यासही या योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना साठीची कागदपत्रे
Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana Documents
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते
- ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- डॉक्टरांचे प्रमाणपत्र
तुम्ही हे वाचलय का?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
विद्यार्थी अपघात विमा योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी नसताना अर्ज केल्यास तो अर्ज रद्द होईल.
- विद्यार्थी पहिली ते बारावी शिक्षण न घेता उच्च शिक्षण घेत असेल अशावेळी ही अर्ज रद्द केला जाईल.
- विद्यार्थ्याने केंद्र किंवा राज्य सरकारच्या अन्य योजनेअंतर्गत सहानुग्रह अनुदानाचा लाभ घेतला असल्यासही तो या योजनेसाठी पात्र नसेल.
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची अंमलबजावणी
Rajiv Gandhi Vidyarthi Apghat Sanugrah Anudan Yojana
राज्यातील विद्यार्थ्यांचे सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांच्या पालकांची व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांच्यावर आहे त्यामुळे पालकांनी यात लक्ष घालून प्रस्ताव पाठवला पाहिजे.
Rajiv Gandhi Student Accident Insurance Yojana या योजनेतील प्रस्तावाला अंतिम रूप देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पहिली ते आठवी आणि नववी ते बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला – मुलींचे प्रस्ताव अनुक्रमे या समितीसमोर सादर करण्यास शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनाही जबाबदारी दिली आहे. पण बृहन्मुंबई सारख्या शहराचे संबंधित शिक्षण निरीक्षक या प्रस्तावाची छाननी करून प्रत्यक्ष समिति समोर सादर करू शकतात, या समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावाची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षण निरीक्षक यांच्या माध्यमातून संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापका द्वारे लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात चेक द्वारे जमा केली जाते.
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
Rajiv Gandhi Accident Insurance Scheme Apply
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला आपल्या शाळेतील शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जाऊन राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरून लागणारे आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडावी लागतील.
भरलेला संपूर्ण अर्ज तपासून आपल्या शाळेच्या कार्यालयात जमा करावा लागेल.
त्यानंतर संबंधित अर्जाची यांनी करण्यात येईल आणि लाभाची रक्कम विद्यार्थी किंवा पालकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
FAQ’s
प्रश्न: राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना काय आहे?
उत्तर: महाराष्ट्रातील पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात जखमी किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
प्रश्न: राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ काय?
उत्तर: पहिली ते बारावी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात होऊन तो जखमी किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दीड लाखापर्यंत आर्थिक मदत सरकारच्या वतीने दिले जाते.
प्रश्न: राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामग्री योजनेचा लाभार्थी कोण?
उत्तर: पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील सर्व मुले – मुली या योजनेसाठी पात्र आहेत.
प्रश्न: राजीव गांधी अपघात विमा योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय?
उत्तर: राज्यातील पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुला मुलींना अपघात विमा संरक्षण पुरवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA