Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 in Marathi : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेद्वारे कुटुंबाला मिळणार 20 हजारांचे अर्थसहाय

Table of Contents

Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 in Marathi : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 2024 मराठी माहिती

Rashtriya Kutumb Labh Yojana : नमस्कार वाचकहो, महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. काही योजना महिलांसाठी, तर काही योजना विद्यार्थ्यांसाठी, तर काही योजना शेतकऱ्यांसाठी, तर काही योजना वृद्धांसाठी म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी, अशाच आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील स्त्री अथवा पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आजच्या लेखामध्ये आपण राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या विषयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना म्हणजे काय?, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा कोणाला होतो फायदा?, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे काय आहेत उद्दिष्टे, वैशिष्ट्ये या योजनेचा अर्ज करण्यासाठी काय आहे प्रक्रिया?, या योजनेसाठीची काय आहे पात्रता? या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Rashtriya Kutumb Labh Yojana

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची संपूर्ण माहिती

Rashtriya Kutumb Labh Yojana Information

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील स्त्री अथवा पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला सरकारमार्फत आर्थिक मदत करण्यात येणार आहे. आपण पाहतो की देशभरात असे अनेक कुटुंब आहेत जे की आजही दारिद्र्य रेषेखालील कौटुंबिक जीवन जगत आहेत. प्रत्येक कुटुंबामध्ये कर्ता व्यक्ती असतो. त्या व्यक्तीवर सर्व कुटुंबाची जबाबदारी असते त्यामुळे अशा कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. त्यांचे आर्थिक उलाढाल बंद होते. यामुळे त्यांना भरपूर समस्या निर्माण होतात. या सर्व गोष्टी विचारात घेऊन राज्य सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कुटुंबाला आर्थिक सहाय्य होणार आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कर्ता पुरुषाचा किंवा स्त्रीचा अपघाती मृत्यू किंवा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबाला राज्य सरकार मार्फत 20 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना Rastriya Kutumb Arthsahayya Yojana ही महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या स्त्री अथवा पुरुषाचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार मार्फत 20 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्तीचे वय हे 18 ते 59 वर्ष यादरम्यान असल्यास त्या कुटुंबाला राज्य सरकार मार्फत आर्थिक मदत केली जाणार आहे.

ठळक मुद्दे :

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची संपूर्ण माहिती

Rashtriya Kutumb Labh Yojana Information

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची थोडक्यात माहिती

Rastriya Kutumb Arthsahayya Yojana In Short

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची उद्दिष्ट

Rastriya Kutumb Labh Yojana Purpose

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची वैशिष्ट्ये

Rashtriya Kutumb Labh Yojana Features

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे फायदे

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Benefits

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची पात्रता

Rashtriya Kutumb Labh Yojana Eligibility

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत

National Family Benefit Scheme

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अटी

Rashtriya Kutumb Labh Yojana Conditions

राष्ट्रीय कुटुंब योजनेचा यांना लाभ घेता येणार नाही

National Family Benefit Scheme

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Documents

राष्ट्रीय कुटुंब योजनेची अर्ज प्रक्रिया

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Application Process

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची थोडक्यात माहिती

Rastriya Kutumb Arthsahayya Yojana In Short

योजनेचे नावराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभ रक्कम20 हजार रुपये
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
Rashtriya Kutumb Labh Yojana

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची उद्दिष्ट

Rastriya Kutumb Labh Yojana Purpose

  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.  
  • Rastriya Kutumb Arthsahayya Yojana या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आत्मनिर्भर बनवणे व त्यांचे जीवनमान सुधारणे.  
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाला उदरनिर्वाहाच्या समस्येचा सामना करावा लागू नये या उद्देशाने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरच्या कुटुंबाला दैनंदिन गरजांसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.  
  • Rastriya Kutumb Arthsahayya Yojana या योजनेमुळे गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारेल.  
  • कुटुंबातील कर्ता व्यक्तीच्या मृत्यू नंतर कुटुंबातील सदस्यांना त्वरित आर्थिक मदत मिळणे हा या योजनेचा उद्देश आहे.  

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची वैशिष्ट्ये

Rashtriya Kutumb Labh Yojana Features

  • राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.  
  • Rashtriya Kutumb Labh Yojana या योजनेमुळे कुटुंबाचा आर्थिक विकास होईल व त्यांचे जीवनमान सुधारेल.  
  • Rashtriya Kutumb Labh Yojana या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागा अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.  
  • Rashtriya Kutumb Labh Yojana Maharahtra या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाची लाभ रक्कम ही त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.  
  • या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी 45 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करते.  
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही.  

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे फायदे

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Benefits

  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.  
  • कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना उदरनिर्वाह साठी सरकार मार्फत आर्थिक मदत केली जाणार असल्यामुळे त्या कुटुंबाला कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.  
  • या योजनेमुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारेल व ते आत्मनिर्भर बनतील.  
  • या योजनेअंतर्गत कर्ता व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य सरकार मार्फत एकरकमी 20,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.  
Rashtriya Kutumb Labh Yojana

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची पात्रता

Rashtriya Kutumb Labh Yojana Eligibility

अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय हे 18 ते 59 वयोगटातील असावे

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत

National Family Benefit Scheme

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत कुटुंबातील कर्ता व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला 20 हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत केली जाते.  

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अटी

Rashtriya Kutumb Labh Yojana Conditions

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांनाच मिळेल.  
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंब असणे आवश्यक आहे.  
  • या योजनेचा लाभ फक्त 18 ते 59 वयोगटातील नागरिकांनाच घेण्यात येईल.   
  • या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम ही लाभार्थीच्या थेट बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केली जाईल.  
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता स्त्री अथवा पुरुष मृत्यू पावल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना मृत्यूच्या तारखेपासून 3 वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे.  
  • जर कर्ता व्यक्तीच्या मृत्यूच्या 3 वर्षाच्या आत जर अर्ज केला नाही तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार.  
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती हिचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झालेला असावा.  
  • जर कुटुंबातील व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.  
  • अर्जदार कुटुंबाचे नाव दारिद्र्यरेषेखाली यादीत असावे.

निर्धुर चूल योजना

बाल संगोपन योजना

राष्ट्रीय कुटुंब योजनेचा यांना लाभ घेता येणार नाही

National Family Benefit Scheme

आत्महत्या

आत्महत्याचा प्रयत्न

अमली पदार्थांच्या सेवनामुळे झालेला अपघात

स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे

मोटार शर्यतीतील अपघात

गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात

जवळच्या व्यक्तीकडून किंवा वारसाकडून झालेला खून

युद्ध

बाळंतपणातील मृत्यू

सैन्यातील नोकरी

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवाशी प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

प्रतिज्ञापत्र

मृत्युपत्र

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट आकाराचा फोटो

Rashtriya Kutumb Labh Yojana

राष्ट्रीय कुटुंब योजनेची अर्ज प्रक्रिया

Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Application Process

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला त्याच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जावे लागेल.

त्यानंतर तेथील कार्यालयातून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

त्यानंतर अर्ज काळजीपूर्वक वाचून अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता, व्यवसाय, मोबाईल नंबर इत्यादी संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.

त्यानंतर अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.

त्यानंतर हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय तलाठी किंवा तलाठी कार्यालय यांच्या जवळ जमा करावा लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

प्रश्न: राष्ट्रीय कुटुंब ला योजना कोणत्या राज्यासाठी आहे?  

उत्तर: Rastriya Kutumb Arthsahayya Yojana राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.

प्रश्न: राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत किती मिळते लाभ रक्कम?

उत्तर: Rastriya Kutumb Arthsahayya Yojana राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत कर्ता व्यक्तीच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूनंतर 20 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.  

प्रश्न: राष्ट्रीय कुटुंबाला योजनेचा कसा करावा अर्ज?  

उत्तर: Rastriya Kutumb Arthsahayya Yojana राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA