Bal Sangopan Yojana 2024 In Marathi : अनाथ मुलांच्या कल्याणासाठी बाल संगोपन योजना

Table of Contents

Bal Sangopan Yojana 2024 Information In Marathi : बाल संगोपन योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Bal Sangopan Yojana 2024 In Marathi : राज्यभरातील अनाथ मुलांसाठी सुरू करण्यात आलेली बालसंगोपन योजना प्रभावी ठरली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेच्या नावात आता बदल करण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे नाव देण्यात आले आहे. मुलांची काळजी आणि सुरक्षाची गरज असलेल्या जवळपास 60,000 हून अधिक बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पूर्वी या योजनेसाठी असलेल्या मार्गदर्शक सूचना मध्ये एक सूत्रता आणण्यासाठी सरकारने सर्व समावेशक असा शासन निर्णय काढून बालसंगोपन योजनेच्या नावांमध्ये बदल केला आहे. आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेचा लाभ कोणाला मिळतो?, या योजनेची वैशिष्ट्य काय?, उद्देश काय आदींची सर्व माहिती आपण या माध्यमातून पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने 2008 रोजी बाल संगोपन योजना मुख्यत्व अनाथ मुलांसाठी सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत राज्यभरातील अनेक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या पालन घोषणासाठी योजनेअंतर्गत दरमहा अनुदान दिले जाते. या माध्यमातून त्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध होतात आणि ते आपल्या शिक्षण अगदी कमी खर्चात करू शकतात. या योजनेचा लाभ अनाथ मुले, घटस्फोटीत कुटुंबातील मुले, अचानक आलेल्या संकटात ज्यांनी आपले आई-वडील गमावले आहेत अशी मुले अशा प्रकारच्या मुलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ही मुले या योजनेसाठी पात्र आहेत.

Bal Sangopan Yojana

Bal Sangopan Yojana Maharashtra बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून मुलांना दरमहा चारशे रुपये दिले जातात. हे रक्कम सरकारच्या वतीने थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. एका कुटुंबात कितीही अनाथ मुले असले तरीही या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र केवळ नियमांच्या अटींमध्ये बसणारे व योजनेच्या पातळीतेनुसार या मुलांचा या योजनेत समावेश होत असेल तर या योजनेचा लाभ दिला जातो. तुमच्याही कोणी नातेवाईकात अनाथ असेल तर त्यांना बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ घेता येईल त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती मिळेल.

Bal Sangopan Yojana विशेष करून बाल संगोपन योजनेचा माध्यमातून अनाथ मुलांना व कोविड महामारीच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना या योजनेचा मोठा फायदा झालेला आहे. कोविड -19 काळात ज्यांचे आई-वडील आजारामुळे गमावले आणि असे जे मुलं अनाथ झाली आहेत या मुलांना या योजनेच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात 5 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. या रकमेच्या माध्यमातून त्यांचे उज्वल भविष्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

Bal Sangopan Yojana महाराष्ट्र सरकारने 2008 रोजी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ राज्यभरातील लाखो अनाथ मुलांना झाला आज त्यांचे भविष्य घडविण्यात या योजनेमुळे हातभार लागला आहे. या योजनेच्या लाभ मिळालेल्या अनेक मुलांनी आपले भविष्य घडविण्यासाठी उच्च शिक्षण घेतले आहे आणि या माध्यमातून त्या अनाथ मुलांना नोकरीही मिळालेली आहे. नोकरी मिळाल्यामुळे ही मुले आत्मनिर्भर झाली असून ते स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत.

Bal Sangopan Yojana बाल संगोपन योजना ही संस्था बाह्य योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनासाठी ठेवता येते. यामध्ये अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, दुर्धर, आजारी पालकांची मुले, कायद्यांची मुले यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्यक्ष जिल्हा व बालविकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी किंवा स्वयंसेवी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते हे ग्रह चौकशी करून संबंधित बाल कल्याण समितीस अहवाल सादर करतात. या अहवालाच्या आधारे बालकल्याण समितीकडून दाखल आदेश घेऊन लाभार्थ्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्फत बालसंगोपन योजनेचा लाभ दिला जातो.

Bal Sangopan Yojana In Marathi बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2(14) व व महाराष्ट्र सरकारचे बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) नियम 2018 नुसार अनाथ निराधार बेघर निराश्रीत संरक्षण आणि निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना संसद दाखल करण्याऐवजी पर्याय कुटुंब उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बालसंगोपन योजना सुरू केली आहे. ही बालसंगोपन योजना संस्था बाह्य असल्यामुळे याद्वारे 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनासाठी ठेवले जाऊ शकते.

Bal Sangopan Yojana In Marathi महाराष्ट्र सरकारचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून आई किंवा वडील गमावलेल्या बालकांना सरकारकडून 27 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेसाठी प्रस्ताव करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल. लाभार्थी कुटुंबातील बालकांचे संगोपन करणारी व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते.

ठळक मुद्दे :

बाल संगोपन योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Bal Sangopan Yojana 2024 Information In Marathi

बाल संगोपन योजनेची थोडक्यात माहिती

Bal Sangopan Yojana In Short

बाल संगोपन योजनेची उद्दिष्ट

Bal Sangopan Yojana Maharashtra Purpose

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची वैशिष्ट्ये

Bal Sangopan Yojana Features

बाल संगोपन योजनेचा लाभ या बालकांना घेता येईल

Bal Sangopan Yojana Maharashtra

बाल संगोपन योजनेअंतर्गत आर्थिक मदत किती मिळते

Bal Sangopan Yojana In Marathi

बाल संगोपन योजनेच्या लाभाचा कालावधी

Bal Sangopan Yojana In Marathi

बाल संगोपन योजनेसाठीची पात्रता

Bal Sangopan Yojana Maharashtra Eligibility

बाल संगोपन योजनेचे नियम अटी

Bal Sangopan Yojana In Marathi Conditions

बाल संगोपन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Bal Sangopan Yojana Documents

सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Bal Sangopan Yojana Maharashtra Apply

सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Bal Sangopan Yojana Maharashtra Apply Online

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

बाल संगोपन योजनेची थोडक्यात माहिती

Bal Sangopan Yojana In Short

योजनेचे नावक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थी कोणमहाराष्ट्रातील अनाथ मुलं-मुली
आर्थिक मदत किती2250 रुपये दरमहा
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://womenchild.maharashtra.gov.in
Bal Sangopan Yojana

बाल संगोपन योजनेची उद्दिष्ट

Bal Sangopan Yojana Maharashtra Purpose

  • Bal Sangopan Yojana Maharashtra बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, संरक्षण आणि निवाराची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे आणि संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन करणे व विकास घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश सरकारने ठेवला आहे.
  • या योजनेचा लाभ देऊन राज्यभरातील निराधार अनाथ मुला-मुलींचे जीवनमान सुधारणे हाही या योजनेचा उद्देश सरकारने निश्चित केला आहे.
  • राज्यातील अनाथ आणि निराधार मुला-मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे हा योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून ज्या मुलांचे पालक काही कारणामुळे जसे की विकार, दीर्घकालीन आजार मृत्यू, विभक्त होणे किंवा एका पालकांनी सोडून जाणे किंवा अनेक काही आपत्तीमुळे त्यांची काळजी घेण्यास समर्थ असतात. त्यांना तात्पुरते स्वरूपात दुसरे कुटुंब उपलब्ध करून देऊन त्यांची काळजी घेणे हा योजनेचा उद्देश आहे.
  • बालकाची कुटुंबाकडून काळजी घेतली जाणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार असतो. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून अशा मुलांना थोड्या कालावधीसाठी किंवा दीर्घ कालावधीसाठी कुटुंब उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची वैशिष्ट्ये

Bal Sangopan Yojana Features

  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येते.
  • काही कारणामुळे अनाथ झालेल्या किंवा कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना थेट ग्रहांमध्ये दाखल न करता अशा अनाथ मुलांना कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून करते आणि त्यांना पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करते जेणेकरून त्यांच्या सामाजिक विकास होण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबास प्राधान्य देण्यात येते.
  • Bal Sangopan Yojana बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम थेट मुलांचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • काही कारणामुळे छत्र हरपलेल्या राज्यातील मुला-मुलींचा विकास करण्याबरोबर त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा होत आहे आणि मुले उच्च शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत.
  • Bal Sangopan Yojana In Marathi या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया आहे राज्य सरकारने सोपी ठेवली आहे, त्यामुळे मुलांचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबांना अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागत नाही.
  • राज्यातील अनाथ, निराधार, अपंग मुला-मुलींचे जीवनमान सुधारण्यास या योजनेचा फायदा होत आहे. त्याबरोबरच त्यांचा सामाजिक विकास होण्यास व त्याच्या कुटुंबामध्ये पालन पोषण होण्यास बालसंगोपन योजना महत्त्वाची ठरत आहे.

बाल संगोपन योजनेचा लाभ या बालकांना घेता येईल

Bal Sangopan Yojana Maharashtra

राज्यातील अनाथ, निराधार किंवा त्यांचे पालकांची माहिती मिळत नाही, एक पालक असलेले बालक, मृत्यू, घटस्फोट, अविवाहित मात्र परित्याग विभक्तीकरण घटस्फोट, गंभीर आजार पालक, रुग्णालयात असणे इत्यादी कारणामुळे विघटित झालेल्या पालक असलेल्या कुटुंबातील कुष्ठरोग, जन्मठेप, शिक्षा भोगत असलेल्या कायद्यांची बालके, कोविड कालावधीमध्ये दोन किंवा एक पालक गमावलेली बालके, भाऊ विकलांग बालके, ज्या मुलांनी आई-वडील दोघेही गमावले आहेत अशी बालके, तीव्र मतिमंद, एच आय व्ही बाधित बालके, अपंग असतील अशा कुटुंबातील बालके, बाल कामगार विभागाने प्रमाणित केलेली बालके.

कुटुंबातील तणाव तंटेवादी व न्यायालयीन वादक सारखं कौटुंबिक संकटात बाधित झालेले बालके.

कुष्ठ रुग्णपालकांची बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची मुले, तुरुंगात असलेल्या बालकांची मुले, एचआयव्ही बाधितग्रस्त पालकांची मुले, कॅन्सरग्रस्त दुर्धर आजाराने बाधित असलेल्या पालकांची मुले, तीव्र मतिमंद बालके किंवा कॅन्सर बालके 40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली मुलं अंधदिव्यांग मुलं भिक्षा मागणारी मुलं.

पोक्सो अधिनियम अंतर्गत बळी पडलेले मुले, तीव्र उपस्थित बालके, सम बालके, दुर्धर आजार असलेली, व्यसनाधीन विविध प्रकारच्या दंगलीने प्रभावित झालेली मुले-मुली, सारख्या रोगांचा प्रादुर्भावाने दोन्ही किंवा एक पालक गमावलेली बालके, नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन्ही एक पालक गमावलेली बालके, बालविवाह बळी पडू शकणारी विधी संघर्ष ग्रस्त दोन्ही पालक दिव्यांग असलेली मुल-मुली, रस्त्यावर राहणारी शाळेत न जाणारी बाल कामगार.

बाल संगोपन योजनेअंतर्गत आर्थिक मदत किती मिळते

Bal Sangopan Yojana In Marathi

महाराष्ट्र सरकारच्या बाल संगोपन योजनेअंतर्गत आता नवीन सुधारणा शासन निर्णयानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत 2250 रुपये दर महिन्याला मुलाच्या किंवा पालकांच्या बॅक खात्यात जमा केली जातात 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालसंगोपन योजनेचा लाभ देणे बंद केला जातो.

कोविड मुळे अनाथ झालेल्या बालकांना मदत.

कोविड मुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या अनाथ बालकांना आधार देण्यासाठी त्यांच्या नावावर 5 लाख रुपयाची मुदत ठेव सरकारने ठेवली आहे. तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा संगोपन योजनेतून खर्च सरकारने उचलला आहे.

बाल संगोपन योजनेत 1 मार्च 2020 रोजी आणि त्यानंतर कोरोनामुळे दोन्ही पालक, आई-वडील मृत्यू पावलेले असतील किंवा एका पालकाचा कोविडमुळे व अन्य बालकाचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा एक मार्च 2020 पूर्वीच मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अशी 0 ते 18 वयोगटातील बालकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

कोविड महामारीमुळे आई आणि वडील अशा दोघांचाही मृत्यू झाला असल्यास अनाथ झालेल्या बालकांचे भविष्य अंधारमय होऊ नये यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून अशा बालकांना आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.

Bal Sangopan Yojana केंद्र सरकारच्या पीएम केअर योजनेअंतर्गत ही अशी योजना राबविण्यात येत आहे. पण त्या व्यतिरिक्तची योजना म्हणून महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवली आहे. या योजनेचा राज्यातील अनाथ बालकांना मोठा फायदा होत आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे.

Bal Sangopan Yojana या योजनेच्या माध्यमातून बालकांना बालगृहामध्ये दाखल करणे किंवा संबंधित बालकाच्या नातेवाईकाकडून संगोपन अशा दोन्ही पद्धतीत संबंधित बालकाच्या नावे 5 लाख रुपये ची मुदत ठेवण्यात येते ठेवीची ही रक्कम बालकांचे वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह दिली जाते. वर्गाची संगोपन करण्यास कुटुंबातील कोणी व्यक्ती नसल्यास त्याला बालगृहात दाखल करण्यात येते. त्याच्या नावे एक रकमी 5 लाख रुपये मुदत ठेव बँक खात्यात जमा केली जाते. बालकाचे संगोपन करण्यास नातेवाईक पुढे आल्यास त्यांना त्यांना महिला व बाल विकास विभागाच्या बालसंगोपन या योजनेतूनही वेगळे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय संबंधित बालकाच्या नावावर मुदत ठेव रक्कम ठेवली जाते. मुदत ठेव बालक व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त बँक खात्यावर ही रक्कम असते.

रोजगार हमी योजना

किशोरी शक्ति योजना

बाल संगोपन योजनेच्या लाभाचा कालावधी

Bal Sangopan Yojana In Marathi

राज्यातील अनाथ किंवा दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके, स्वतः किंवा पालक विग्रहस्त किंवा कॅन्सरग्रस्त असलेली बालके, कुष्ठरोग ग्रस्त पालकांची बालके, तीव्र मतिमंद बालके, असा बालकांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारच्या बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. कौटुंबिक कला सापडलेला बालकांना कौटुंबिक कलम संपुष्टात आल्याबाबतच्या न्यायालयाने आदेश निर्गमित झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत किंवा वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अधिकारी तोपर्यंत लाभ देण्यात येतो यासाठीचा सामाजिक तपासणी अहवालाच्या आधारे बाल कल्याण समिती वेळोवेळी निर्णय घेत असते. जन्मठेपेची शिक्षा किंवा अन्य शिक्षा भोगत असलेल्या तुरुंगातील पालकांच्या बालकांना पालकांचे शिक्षा संपेल यापासून महिन्यापर्यंत किंवा बालकाच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अधिक घडेल तोपर्यंत लाभ देण्यात येतो यासाठी सामाजिक तपासणी अहवालाच्या आधारे बालकल्याण समिती निर्णय घेते.

भिक्षेकरी ग्राहक दाखल झालेल्या पालकांच्या बालकांना पालक भिक्षेकरी ग्राहक मुक्त झालेल्या तारखेपासून 6 महिन्यापर्यंत किंवा बालकाच्या वयाच्या 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी होईल तोपर्यंत मदत केली जाते.

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेल्या पालकांच्या बालकांना प्रकरण निकाली लागल्यापासून सहा महिन्यापर्यंत किंवा बालकाची वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी होईल तोपर्यंत लाभ देण्यात येतो.

एखाद्या बालकाचा मृत्यू घातक घटस्फोट पालक, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणामुळे कुटुंब विघटित झाल्याने एक पालक असलेल्या बालकांना लाभ दिल्यानंतर त्यांच्या पालकांनी पुनर्विवाह केल्यास पुनर्विवाहाच्या तारखेपर्यंत किंवा बालकाच्या 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मदत केली जाते. मात्र पालकांनी पुनर्विवाह केल्याची योग्य पुरावे समाजसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते अथवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष मधील सामाजिक कार्यकर्ते हे ग्रह भेट करून सामाजिक तपासणी अहवाला सहभाग कल्याण समिती सादर करतील.

Bal Sangopan Yojana In Marathi बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठीचा कालावधी बालकल्याण समिती स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ता किंवा जिल्हा बाल संरक्षण विभाग भागातील सामाजिक कार्यकर्ता यांनी प्रत्यक्ष ग्रह भेट देऊन तयार केलेल्या सामाजिक तपासणी अहवाल विचारात घ्यावा लागतो त्यानंतर बाल कल्याण समिती समोर प्रकरण मांडून बालकास हजर करून अंतिम निर्णय घेतला जातो.

Bal Sangopan Yojana

बाल संगोपन योजनेसाठीची पात्रता

Bal Sangopan Yojana Maharashtra Eligibility

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

बाल संगोपन योजनेचे नियम अटी

Bal Sangopan Yojana In Marathi Conditions

महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

राज्याबाहेरील कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही.

सर्वसामान्य एका कुटुंबातील दोन बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच एका कुटुंबात दोनच बालकांना सांभाळ करण्यासाठी ठेवता येईल.

ज्या कुटुंबातील दोन्ही पालकांचा नैसर्गिक आपत्तीमुळे कोविडमुळे किंवा इतर काही कारणामुळे मृत्यू झाला असेल अशा कुटुंबात दोन पेक्षा अधिक होणार असली तरी त्या सर्व बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

नैसर्गिक आपत्ती किंवा कोविडमुळे किंवा आजारामुळे पालकाचा मृत्यू झाला असेल आणि मृत्यू दाखला मिळण्यास उशीर होत असल्यास अशा वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते.

अर्ज सादर करतेवेळी बालकाचे वय 18 वर्षे पूर्ण होण्यास कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी शिल्लक असणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

लाभार्थी मुलं मुलींचे 0 ते 18 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

18 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या मुला मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

बाल संगोपन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Bal Sangopan Yojana Documents

विद्यार्थ्याचे शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र

आई-वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र

लाभार्थी व पालकांचा आधार कार्ड

सांभाळ करणाऱ्या पालकांचे फिटनेस प्रमाणपत्र

पालकांचा संगोपन हमीपत्र

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

बालकाचा जन्माचा दाखला

बँक पासबुक लाभार्थी

बालकाचा पासपोर्ट फोटो

रहिवासी प्रमाणपत्र

Bal Sangopan Yojana

सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Bal Sangopan Yojana Maharashtra Apply

सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन बालसंगोपन अर्ज घ्याव्या लागेल.

या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.  

तसेच या अर्जासोबत जोडावयाची सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.  

त्यानंतर अर्ज एकदा संपूर्ण अचूक आहे त्याची खात्री करून तुम्ही हा अर्ज संबंधित कार्यालयात जमा करू शकता  

त्यानंतर बाल संरक्षण समिती तुमचा अर्ज पडताळून अंतिम मंजूरी देईल. .

त्यानंतर तुमच्या संबंधित बँक खात्यात दरमहा अनुदान जमा करण्यात येईल.

सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Bal Sangopan Yojana Maharashtra Apply Online

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमचा समोर वेबसाईटचे होम पेज उघडेल

यावर बालसंगोपन योजनेसाठी अर्ज करा हा पर्याय निवडा

आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा

माहिती भरून झाल्यानंतर विचारलेली जोडावयाची सर्व कागदपत्रे अपलोड करा

त्यानंतर सबमिट हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न

प्रश्न: सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

उत्तर: ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनाथ बालकांना घेता येतो.

प्रश्न: बाल संगोपन योजनेचा लाभ काय?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून अनाथ बालकांना दरमहा 2250 रुपयाची आर्थिक मदत सरकारच्या वतीने केली जाते.

प्रश्न: बाल संगोपन योजनेचे उद्देश काय?

उत्तर: राज्यातील अनाथ बालकांना पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रश्न: बाल संगोपन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय?

उत्तर: बाल संगोपन योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA