Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 Information In Marathi : रोजगार हमी योजना मराठी माहिती
Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 In Marathi : ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरू केली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीची Rojgar Hami Yojana Maharashtra रोजगार हमी योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यात ग्रामीण भागातील नागरिकांना मजुरी मिळवण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो. खूप कष्ट घ्यावे लागतात. परंतु एवढे करूनही त्यांना त्यांच्या कामाची मजुरी वेळेवर मिळत नाही. पावसाळ्यात मजुरी उपलब्ध नसतात. मजुरांना रोजगार मिळत नाही. त्यांचे दैनंदिन जीवनात हे हालकीचे होते. त्यांच्यासमोर पैशांचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील मजुरांचा रोजगाराच्या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने एकत्रित येऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रोजगार मिळतो. Rojgar Hami Yojana Maharashtra या योजना अंतर्गत 100 दिवसापर्यंत रोजगाराची हमी केंद्र सरकारची देते व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक कामे देखील घेता येतात. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मजुरीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेअंतर्गत सर्व कामकाज हे पारदर्शक पद्धतीने केले जातात. ग्रामीण भागातील व्यक्तींना कुशल कामाची मागणी केल्यावर कामे उपलब्ध करून देणे. कायमस्वरूपी भत्ता निर्माण करून देणे. हा रोजगार हमी योजनेचा मुख्य उद्देश आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण रोजगार हमी योजना म्हणजे काय?, रोजगार हमी योजनेचे फायदे, लाभ, उद्दिष्टय, पात्रता काय आहेत? रोजगार हमी योजनेचा अर्ज कसा करावा?, रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत? या सर्व गोष्टींची माहिती आजच्या लेखातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. Rojgar Hami Yojana Maharashtra
ठळक मुद्दे :
रोजगार हमी योजना मराठी माहिती
Rojgar Hami Yojana Maharashtra 2024 Information In Marathi
रोजगार हमी योजनेची थोडक्यात माहिती
Maharashtra Gramin Rojgar Hami Yojana In Short
रोजगार हमी योजनेची उद्दिष्ट
Maharashtra Gramin Rojgar Hami Yojana Purpose
रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये
Maharashtra Gramin Rojgar Hami Yojana Features
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कशी मिळते मजुरी
Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Maharashtra
रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा
Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Maharashtra
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे देताना पुढील प्रवर्गातील कुटुंबाच्या मतांबाबत कामांना प्राधान्य देण्यात येते
Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Maharashtra
रोजगार हमी योजनेचे फायदे
Maharashtra Rojgar Hami Yojana Benefits
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या अटी
Maharashtra Rojgar Hami Yojana Conditions
रोजगार हमी योजनेच्या कामाची यादी
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra
महात्मा गांधी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra Documents
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत जॉब कार्ड काढण्याची पद्धत
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra
रोजगार हमी योजना अंतर्गत कसा मिळेल रोजगार
Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Maharashtra
FAQ’s रोजगार हमी योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
रोजगार हमी योजनेची थोडक्यात माहिती
Maharashtra Gramin Rojgar Hami Yojana In Short
योजनेचे नाव | रोजगार हमी योजना |
कोणी सुरू केली | केंद्र व राज्य सरकार |
कधी सुरू झाली | 1977 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | नियोजन विभाग |
लाभार्थी | राज्यातील ग्रामीण भागातील नागरीक |
उद्देश | राज्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
रोजगार हमी योजनेची उद्दिष्ट
Maharashtra Gramin Rojgar Hami Yojana Purpose
- ग्रामीण भागातील नागरिकांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे आहे.
- गरीब कुटुंबाचा आर्थिक विकास करणे.
- ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
- ग्रामीण भागातील नागरिकांची बेरोजगारी कमी करणे.
- ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे.
- ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार मिळवून देणे.
- ग्रामीण भागातील मजुरांना आर्थिक अडचणी करावा लागू नये या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे.
- रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करणे.
रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये
Maharashtra Gramin Rojgar Hami Yojana Features
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना Rojgar Hami Yojana Maharashtra केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून सुरु केलेली महत्वकांशी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
या योजनेअंतर्गत 100 दिवसापर्यंत केंद्र सरकार मार्फत रोजगार उपलब्ध करून दिला जातो तर शंभर दिवसानंतर राज्य शासनामार्फत रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या नागरिकांना कुशल रोजगार पुरविला जातो.
रोजगार हमी योजनेचा संपूर्ण कामकाज हा अत्यंत पारदर्शक पद्धतीने केला जातो कारण या योजनेचा कामकाज हा संगणकीय झालेला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कशी मिळते मजुरी
Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Maharashtra
रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी मजुराने जॉब कार्ड काढणे आवश्यक आहे.
हे जॉब कार्ड काढताना तुमचे आधारला लिंक असलेले बँक खाते पासबुक झेरॉक्स देणे आवश्यक आहे कारण त्याच बेस्ट पेमेंट मार्फत बँक मध्ये ही मास्टर चा कालावधी संपल्यानंतर 8 दिवसात लाभार्थी मजुराची मजुरी ही त्याच्यात बँक खात्यात जमा केली जाते.
वैयक्तिक कामाबाबत कुशलचे पेमेंट उदाहरणार्थ फळबाग, लागवड, रोपे खरेदी, पिशव्या खरेदी, खते इत्यादी हे देखील खात्यात जमा केले जाते.
सार्वजनिक कामांचे कुशल पेमेंट हे त्या संबंधित यंत्रणाच्या खात्यात जमा होऊन नंतर लाभार्थी मजूराला देण्यात येते.
रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा
Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Maharashtra
मजूर ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी मजुरांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे.
मजुरांसाठी प्रथमोपचार उपलब्ध करून देणे.
मजुरांच्या कामातील थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी शेड उपलब्ध करून देणे.
पाच पेक्षा जास्त मुले असतील तर त्यासाठी दाईची सोय करून देणे.
जर एखाद्या मजुराला किंवा त्याच्या मुलाला दुखापत झाली असेल तर दवाखान्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार मार्फत केला जातो तसेच मजुरांना 50 टक्के वेतन देखील दिले जाते.
जर एखादा मजुर काम करताना अपंग झाला किंवा मृत्यू पावला तर या अवस्थेमध्ये 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
जर लाभार्थी मजुराला त्याच्या कामाचा रोजगार मिळाला नाही तर या परिस्थितीमध्ये मजुरांच्या दैनंदिन मजुरीचा 25% हिस्सा बेरोजगारी भत्ता म्हणून दिला जातो.
मजुरांना वेतन चिट्ठी वाटपाच्या कामाचे ठिकाण पाच किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर प्रवास भाडे म्हणून किंवा मजुरी दर म्हणून 10 टक्के वाढवा दिला जातो.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे देताना पुढील प्रवर्गातील कुटुंबाच्या मतांबाबत कामांना प्राधान्य देण्यात येते
Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Maharashtra
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र रेषेखालील ईतर कुटुंब, कर्तव्य कुटुंबातील करता व्यक्ती स्त्री, शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेले कुटुंबे, जमीन सुधारणांची लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखाली लाभार्थी, अनुसूचित जाती व इतर पारंपारिक वनवासी.
रोजगार हमी योजनेचे फायदे
Maharashtra Rojgar Hami Yojana Benefits
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना Rojgar Hami Yojana Maharashtra अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील मजुरांना 100 दिवसांनी रोजगार उपलब्ध करून दिला जातो
Rojgar Hami Yojana Maharashtra योजनेअंतर्गत नागरिकांना रोजगार मिळवण्यासाठी कुठल्याही अडचणी करावा लागत नाही
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल
ग्रामीण भागातील रोजगारांना नवीन संधी उपलब्ध होतील
ग्रामीण भागाचा आर्थिक विकास होईल.
ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल
ग्रामीण भागातील मजूर या योजनेअंतर्गत रोजगार मिळवण्यासाठी सशक्त बनतील
ग्रामीण भागातील मजूर या योजनेअंतर्गत आत्मनिर्भर बनतील
Rojgar Hami Yojana Maharashtra योजनेअंतर्गत कामाची मागणी केल्यानंतर जर एखाद्या मजुराला 15 दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला नाही, तर त्याला रोजगार भत्ता दिला जाईल
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मजुरांना कुठल्याही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जॉब कार्ड काढण्यासाठीची पात्रता
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
महाराष्ट्र राज्य बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
अर्जदार व्यक्तीचे वय हे 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे
अंगमेहणतीचे कामे करण्यासाठी अर्जदार अर्जदाराची तयारी असावी
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या अटी
Maharashtra Rojgar Hami Yojana Conditions
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येईल
रोजगार हमी योजना अंतर्गत लाभार्थी मजुराला कमीत कमी 14 दिवस काम करावे लागेल
14 दिवसांच्या आत जर मजुराने त्याचा रोजगार सोडून दिला तर त्याला त्याची मजुरीची रक्कम मिळणार नाही
अर्जदार मजूर हा शारीरिक दृष्ट्या कणखर असावा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांना त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रोजगार मिळविण्यासाठी अर्जदाराकडे जॉब कार्ड आवश्यक आहे
रोजगार हमी योजनेच्या कामाची यादी
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra
शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम
शाळेकरीता साखळी कुंपण
शालेय स्वयंपाक गृह निवारा
अंगणवाडी बांधकाम
ग्रामपंचायत भवन
सार्वजनिक जागेवर गोदाम
स्मशानभूमी शेड बांधकाम
बचत गटाच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे
छतासह बाजार ओठा
सामूहिक मत्स्यतळे
सिमेंट रस्ता
डांबर रस्ता
पेविंग ब्लॉक रस्ता
नालामोरी बांधकाम
सिमेंट नाला बांध
RCC मुख्य निचरा प्रणाली
भूमिगत बंधारा
मत्स्यपालनाचे तलाव बांधणे
मत्स्यपालन तलावाची दुरुस्ती
मत्स्य पालनाचे तलाव नुतनीकरण
किरकोळ कालवा बांधणे
जल कोर्स बांधणे
पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्याच्या अस्तरीकरण
वितरण करणाऱ्या कालव्याच्या अस्तरीकरण
छोट्या कालव्याचे अस्तरीकरण
पाणीपुरवठा नूतनीकरण
वितरण करणाऱ्या कालव्याचे नूतनीकरण
किरकोळ कालव्यातील नूतनीकरण
उपक्रम कालव्यातील नूतनीकरण
पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्याचे नूतनीकरण
बांधण्यात आलेल्या तळ्याचे मजबुतीकरण
भूमिगत बंधाऱ्याचे बांधकाम
वैयक्तिक सिंचन विहिरीची कामे
सिंचन विहिरीसाठी कठडा बांधणे व दुरुस्ती करणे
लहान पाझर तलाव बांधणे
बंधारा पाणथळ जमिनीमध्ये गटार खोदणे
धान्य साठवण इमारत बांधणे
धान्य साठवण इमारतीची दुरुस्ती
कृषी उत्पादने साठवण इमारत बांधकाम
माती पासून शेत बांधबंधिस्ती
गारगोटी पासून शेत बांधबंधिस्ती
दगडापासून समोरचे बांध तयार करणे
माती पासून बांध तयार करणे
गारगोटी पासून बांध तयार करणे
दगडा पासून बांध तयार करणे
शेततळे बांधणे
शेततळे दुरुस्ती कामे
शेततळे नूतनीकरण करणे
महात्मा गांधी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra Documents
आधार कार्ड
रेशन कार्ड
ग्रामीण रहिवासी दाखला
ग्रामसभेची मान्यता
जॉब कार्ड माहिती
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत जॉब कार्ड काढण्याची पद्धत
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra
महात्मा गांधी रोजगार हमी जॉब कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल
त्यांच्याकडून ग्रामसेवकाकडून रोजगार हमी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
तो अर्ज घेऊन त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल
अर्ज सोबत आवश्यकती कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल
त्यानंतर अर्जदाराची सर्व माहिती ग्रामसेवक त्याच्या रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भरेल
त्यानंतर अर्जदाराला जॉब कार्ड देण्यात येईल
रोजगार हमी योजना अंतर्गत कसा मिळेल रोजगार
Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Maharashtra
ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल तिथून ग्रामसेवकाकडून रोजगार हमी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती आजूकपणे भरावी लागेल
त्याच बरोबर जॉब कार्ड ची माहिती देखील त्या अर्जासोबत भरावी लागेल
त्यानंतर ग्रामसेवकाकडे तो अर्ज जमा करावा लागेल
ग्रामसेवक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल
त्यानंतर अर्जदार मजुराच्या अर्जाची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भरेल
त्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्जदार मुजरास पंधरा दिवसाच्या आत रोजगार मिळेल
FAQ’s रोजगार हमी योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: रोजगार हमी योजनेची सुरुवात कधी झाली?
उत्तर: रोजगार हमी योजना 1977 रोजी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
प्रश्न: रोजगार हमी योजनेचा उद्देश?
उत्तर: ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या नवनवीन संगीत उपलब्ध करून देणे हा रोजगार हमी योजनेचा उद्देश आहे.
प्रश्न: रोजगार हमी योजना कसा करावा अर्ज?
उत्तर: आपल्या जवळील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन रोजगार हमी योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA