Skip to content
yojanamazi.com
  • Home
  • Daily Updates
  • योजना बातम्या
  • सरकारी योजना
    • केंद्र सरकार योजना
    • महाराष्ट्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • अध्यात्म
  • Webstories
  • मनोरंजन
  • उखाणे
  • बातम्या
  • बोधकथा
Rojgar Sangam Yojana Maharashtra

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 in Marathi : तरुणांना मिळतोय 5000 रुपये मासिक भत्ता

14 April 2024 by yojanamazi.com

Table of Contents

Toggle
  • Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 Information : रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्र म्हणजे काय
  • ठळक मुद्दे:-
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्राची थोडक्यात माहिती
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्राची उद्दिष्टे
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्राची वैशिष्ट्ये
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्राचे फायदे
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठीची पात्रता
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रासाठीची आवश्यक कागदपत्रे
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठी लॉगिन कसे करावे
  • अर्जाची स्थिती कशी तपासावी
  • FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 Information : रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने रोजगार संगम योजना 2024 सुरू केली आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवाराने पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यापूर्वी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील. या योजनेसाठी कोण पात्र आहे. या योजनेसाठी काय नियम आणि अटी आहेत. ही संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Rojgar Sangam Yojana Maharashtra

रोजगार संगम योजना महाराष्ट्र म्हणजे काय

What is Rojgar Sangam Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासन हे नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. त्यापैकीच एक आज पाहणार आहोत ती म्हणजे रोजगार संगम योजना. महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी तसेच जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी रोजगार संगम योजना ही सुरू केली आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांना या योजनेअंतर्गत मासिक वेतन स्वरूपात काहीशी रक्कम प्रदान करण्यात येईल. आपण पाहतो की, सध्या पूर्ण जगभरात जशा अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत, तशीच आता शिक्षण ही देखील मूलभूत गरज झालेली आहे. त्यासाठी आपल्या राज्यामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. परंतु त्यांच्या काही आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण घेऊनही ते बेरोजगार आहेत. त्यांच्याकडे कोणताही कमाईचा स्त्रोत नाही किंवा त्यांच्याकडे कुठलीही नोकरी नाही. अशा बेरोजगार नागरिकांचा विचार करून शासनाने रोजगार संगम योजना RojgarSangam Yojanaसुरू केली आहे. पण ज्या नागरिकांकडे कमाईचे कोणतेही साधन नाही अशांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय किंवा एखादा छोटासा उद्योग करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेसाठी राज्यातील कोणताही बेरोजगार नागरिक हा अर्ज करू शकतो. या योजनेतून दरमहा 5000 रुपये रक्कम लाभार्थ्याला देण्यात येणार आहे. ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. या योजनेमुळे दरमहा मिळालेल्या रकमेतून लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार व्यवसाय करू शकतो, त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, आणि तसेच कुटुंबाला हातभार लावू शकतो. त्यामुळे प्रत्येक बेरोजगार नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यात असे भरपूर तरुण विद्यार्थी वर्ग आहे की, ज्यांचे शिक्षण पूर्ण झालेले असून त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी उपलब्ध नाहीये त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती काही खूप गरिबीची आहे. व्यवसाय करायचा असल्यास भांडवलाची आवश्यकता असते, परंतु ह्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय करता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अशा तरुणांसाठी आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईपर्यंत या योजनेअंतर्गत दर महिन्याला पाच हजार रुपये अशी आर्थिक मदत मिळणार आहे आणि ही मदत अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल. रोजगार संगम योजना Rojgar Sangam Yojanaतरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.

राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 Rojgar Sangam Yojana 2024 मदत मधून राज्य सरकार मदत करणार आहे. अंतिम मुदतीपूर्वी राज्यातील कोणताही उमेदवार रोजगार संगम योजनेसाठी अर्ज करू शकतो. यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो. यातून काम सुरू करण्यापूर्वी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. अर्जदाराच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा केला जातो. या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते, त्यात त्यांना व्यवसाय कौशल्याचे ज्ञान दिले जाते. याबरोबरच त्यांना ऑनलाईन द्वारे कौशल्य सुधारणा प्रशिक्षणही दिले जाते.

ज्यातील बेरोजगार असलेल्या सर्व तरुणांना रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 Rojgar Sangam YojanaMaharashtra 2024 ची आपल्या पायावर उभारण्यासाठी मदत होईल, यासाठी सरकारने ठरवलेली पात्रता आणि निकष पूर्ण करणारे सर्व अर्जदार शेवटच्या तारखेपर्यंत अधिकृत वेबसाईटवर रोजगार संगम योजना साठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळे पर्यंत दरमहा 5000 रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. Maharashtra Rojgar Sangam Yojana

महाराष्ट्र सरकारने रोजगार संगम योजना सुरू केली असून, रोजगार संगम योजना महाराष्ट्र Rojgar Sangam Yojana Maharashtra  अंतर्गत पदवी पदविका असलेल्या सर्व बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून राज्यातील बेरोजगारांना काम शोधण्यास मदत होईल. या योजनेसाठी निवडलेल्या सर्व अर्जदारांना राज्य सरकार आर्थिक मदतही करते, ज्यामुळे त्यांना रोजगार नोकरी शोधण्यापूर्वी आर्थिक अडचणीला सामना करावा लागत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. चला तर मग आपण पाहू या महाराष्ट्र संगम योजनेचा काय आहे लाभ, या योजनेचा कसा करावा अर्ज, रोजगार संगम योजना महाराष्ट्रचे फायदे, उद्दिष्टे, पात्रता, वैशिष्ट्ये, रोजगार संगम योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या लेखातून मिळतील. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. Maharashtra Rojgar Sangam Yojana 2024

ठळक मुद्दे:-

  • रोजगार संगम योजना महाराष्ट्र म्हणजे काय
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रची थोडक्यात माहिती
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रची उद्दिष्टे
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रचे फायदे
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठीची पात्रता
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठीची आवश्यक कागदपत्रे
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्र रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया.
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठी लॉगिन कसे करावे
  • अर्जाची स्थिती तपासा
  • FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

रोजगार संगम योजना महाराष्ट्राची थोडक्यात माहिती

Rojgar Sangam Yojana Maharashtra in Short

योजनेचे नावरोजगार संगम योजना
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुण
उद्देशतरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://rojgar.mahaswayam.gov.in/
हेल्पलाइन नंबर1800-233-0066
Rojgar Sangam Yojana Maharashtra

रोजगार संगम योजना महाराष्ट्राची उद्दिष्टे

Rojgar Sangam Yojana Maharashtra Purpose

राज्य सरकारने सुरू केलेल्या रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.

या योजनेसाठी पदवी पदविका डिप्लोमा असलेले सर्व बेरोजगार विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

या योजनेतून तरुणांना नोकरी मिळणे सोपे होते. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळेपर्यंत आर्थिक सहाय्यही केले जाते. विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन नोकरी मिळून कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात.

राज्य सरकारच्या कुठल्याही विभागात रिक्त जागा असल्यास रोजगार संगम योजनेसाठी निवडलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे नोकरी मिळण्यास मदत होते.

रोजगार संगम योजना महाराष्ट्राची वैशिष्ट्ये

Rojgar Sangam Yojana Maharashtra Features

रोजगार संगम योजनेमुळे बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत होणार आहे.

या योजनेमुळे राज्यातील बेरोजगार नागरिकांना जास्तीत जास्त रोजगार कसा प्राप्त होईल अशा तरतुदी केले करण्यात आल्या आहेत.

या योजनेअंतर्गत जर एखादा व्यक्ती पूर्णपणे बेरोजगार आहे असे आढळून आल्यास त्याला सलग 5000 रुपये दरमहा रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.

रोजगार संगम योजनेअंतर्गत जी तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे ती तुमच्या थेट बँक खात्यामध्ये दरमहा जमा होणार आहे.

या योजनेमुळे नागरिकांची सकारात्मकता वाढेल आणि ते अगदी जोमाने कामाला लागतील.

बचत गटातील महिलांना मिळणार 20 लाखापर्यंत कर्ज

बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी

रोजगार संगम योजना महाराष्ट्राचे फायदे

Rojgar Sangam Yojana Maharashtra Benefits

रोजगार संगम योजना अंतर्गत निवडलेल्या बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते.

बेरोजगार तरुणांना यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

निवड झालेल्या उमेदवाराला या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये मासिक आर्थिक मदत मिळते, जर त्यांना सुरक्षित रोजगार नसेल तर

उमेदवाराच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येते.

उमेदवारांचा कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण दिल्यामुळे रोजगार मिळतो. तसेच ते आपला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकता.

रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठीची पात्रता

Rojgar Sangam Yojana Maharashtra Eligibility

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

उमेदवाराला इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नोंद करता येणार नाही.

उमेदवाराकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे वय 18 ते 40 वयोगटातील असावे.

उमेदवार हा बेरोजगार असावा.  

उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर असावा.  

उमेदवाराला या योजनेअंतर्गत जर नोकरी मिळाली तर त्याची दरमहा मिळणारी रक्कम बंद करण्यात येईल.  

उमेदवाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे कारण ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल इतर कोणाच्याही बँक खात्यात ही रक्कम जमा होणार नाही.  

उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असावे.

रोजगार संगम योजना महाराष्ट्रासाठीची आवश्यक कागदपत्रे

Rojgar Sangam Yojana Maharashtra Documents

अर्जदाराचे शैक्षणिक कागदपत्रे याव्यतिरिक्त डिप्लोमा प्रमाणपत्र.

आधार कार्ड.

बँक पासबुक.

पदवीधर शिक्षणाचा पुरावा

रहिवासी प्रमाणपत्र.

उत्पन्न प्रमाणपत्र

रेशन कार्ड.

पासपोर्ट आकाराचा फोटो.

जातीचे प्रमाणपत्र.

मोबाईल नंबर

ईमेल आयडी.

अर्जदारची सही

बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र

Rojgar Sangam Yojana Maharashtra

रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

Rojgar Sangam Yojana Maharashtra Online Apply

रोजगार संगम योजनेच्या Rojgar Sangam Yojana  उमेदवारांना आपली नोंदणी करण्यासाठी प्रथम सरकारच्या  अधिकृत साईडला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

प्रथम होम पेजवर नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी फॉर्म Apply Online दिसेल त्यावर क्लिक करा.

त्या नंतर sign up या पर्यायावर क्लिक करा.

विचारलेली सर्व माहिती भरा पुढील पर्यायावर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन फॉर्मवर इतर सर्व माहिती भरा.

त्यानंतर आपल्याला एक OTP लागेल म्हणून तूमच्याजवळ तोच मोबईल असावा जो आधार कार्ड ला नंबर लिंक झालेला असेल.

शेवटी तुमचा अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट करा या  पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज सबमिट होईल.

सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरा जर एखादी चूक झाली असेल तर लगेच दुरुस्त करून घ्या कारण की हा फॉर्म एकदा सबमिट झाला तर पुन्हा edit करता येत नाही.

आशाप्रकारे तुमचे रोजगार संगम योजना महाराष्ट्र Rojgar Sangam Yojana maharasahra या फॉर्मचे रेजीस्ट्रेशन होईल 

रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठी लॉगिन कसे करावे

Maharashtra Rojgar Sangam Yojana Login

योजनेसाठी लॉगिन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत साइटवर https://rojgar.mahaswayam.gov.in/

 जावे लागेल.

मुख्यपृष्ठावर लोगिन पर्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन आयडी आणि तुमचा पासवर्ड तयार करावा लागेल. तुमची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लॉगिन पर्यावर क्लिक करा.

अर्जाची स्थिती कशी तपासावी

Rojgar Sangam YojanaMaharashtra 2024 या साठी सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत साइटवर जाऊन लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या. यशस्वीरित्या लॉगिन झाल्यानंतर अर्जदार चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करून नोंदणीची तपशील तुम्ही तपासू शकता.

रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना आर्थिक मदतीस सोबतच नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय त्यांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यातून तरुणांना आर्थिक मदत झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न : रोजगार संगम योजना 2024 साठी कोण आहे पात्र?

उत्तर : राज्यातील बेरोजगार तरुण या योजनेसाठी पात्र आहे. मात्र यासाठी तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

प्रश्न : या योजने अंतर्गत किती पैसे दिले जातात?

उत्तर : निवड झालेल्या उमेदवारांना रोजगार हमी योजनेअंतर्गत 5000 रुपये महिना आर्थिक मदत केली जाते.

प्रश्न : 2024 मध्ये या योजनेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना काय फायदे आहेत?

उत्तर : यावर्षी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. याबरोबरच ते स्वतःचा छोटा व्यवसायही सुरू करू शकू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभे

 राहण्यास मदत होईल.

प्रश्न : रोजगार संगम योजनेसाठी वयाची अट काय?

उत्तर : 18 ते 40 या वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News  https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

Post Views: 875
Categories Daily Updates, सरकारी योजना Tags Maharashtra Rojgar Sangam Yojana Login, Rojgar Sangam, Rojgar Sangam Yojana, Rojgar Sangam Yojana Maharashtra, Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 in Marathi, Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 Information, Rojgar Sangam Yojana Maharashtra Benefits, Rojgar Sangam Yojana Maharashtra Documents, Rojgar Sangam Yojana Maharashtra Eligibility, Rojgar Sangam Yojana Maharashtra Features, Rojgar Sangam Yojana Maharashtra Online Apply, Rojgar Sangam Yojana Maharashtra Purpose, What is Rojgar Sangam Yojana Maharashtra
Mahila Bachat Gat Loan Yojana 2024 in Marathi : बचत गटातील महिलांना मिळणार 20 लाखापर्यंतचे कर्ज
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana in Marathi : 85 लाख शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेचा लाभ

Recent Post

  • lic scheme securing children future know lic amrit bal plan benefits high return
    lic scheme securing children future know lic amrit bal plan benefits high return in marathi : एलआयसीच्या अमृतबाल पॉलिसीच्या पुढे एफडी-आरडी फेल27 October 2025
  • ladki bahin yojana October installment update 1500 rupees come in 8-days
    ladki bahin yojana October installment update 1500 rupees come in 8 days : 8 दिवसात जमा होणार लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये27 October 2025
  • pm kisan 21st installment release date will rs 2000 credit in farmers accounts in marathi
    pm kisan 21st installment release date will rs 2000 credit in farmers accounts in marathi : PM किसान योजनेचा 21 वा हप्ता या दिवशी होणार जमा?27 October 2025
  • day nulm national urban livelihood mission benefits
    day nulm national urban livelihood mission benefits in marathi : रोजगार- व्यवसायासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज26 October 2025
  • Zoho Arattai
    Zoho Arattai : सोशल मीडिया वापरा स्वदेशी, तर सुरुवात आहे25 October 2025

Yojana Mazi

महाराष्ट्रातील जनतेला शासकीय योजना आणि भरती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कृषी धोरण, कायदे आणि इतर अनेक गोष्टींची माहिती

Facebook Twitter Youtube Instagram

Categories

  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या
  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या

Site Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
© 2025 yojanamazi.com