savitribai phule kishori samriddhi yojana 2025 In Marathi : मुलींच्या खात्यात जमा होणार 40,000 रुपये

savitribai phule kishori samriddhi yojana 2025 Information In Marathi : सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना 2025 संपूर्ण मराठी माहिती

savitribai phule kishori samriddhi yojana : झारखंड सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. काही योजना महिलांसाठी, तर काही योजना मुलींसाठी, काही योजना मुलांसाठी, तर काही योजना शेतकऱ्यांसाठी अशा अनेक प्रकारच्या योजना सरकार सतत राबवत असते. आज आपण लेखाच्या माध्यमातून झारखंड सरकारने मुलींच्या शिक्षणासाठीची एक योजना आणली आहे. त्याची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.  

savitribai phule kishori samriddhi yojana 2025 यामध्ये मुलींना शिकून मोठे होऊन त्यांना उच्चशिक्षित करण्यासाठी झारखंड सरकारने सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना सुरू केली आहे. सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेअंतर्गत 8 वी ते 12 वी मधील शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या खात्यात 40000 रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ 2024 मधील लाखो विद्यार्थिनींनी घेतला आहे तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या.

savitribai phule kishori samriddhi yojana 2025 आज या लेखाच्या माध्यमातून आपण सावित्रीबाई फुले समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, फायदे? या योजनेसाठी कोणत्या मुली आहेत पात्र? या योजनेसाठी कसा करावा अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

savitribai phule kishori samriddhi yojana 2025 In Marathi सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना ही अत्यंत महत्त्वकांविषयी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 37 लाख विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींच्या खात्यामध्ये 40 हजार रुपये रक्कम जमा केली जाणार आहे.

savitribai phule kishori samriddhi yojana यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे भविष्य उज्वल करू शकतील आणि पुढे त्यांचे शिक्षण त्यांच्या मनानुसार घेऊन उच्चशिक्षित होतील. या उद्देशाने सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे.

savitribai phule kishori samriddhi yojana या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही वेगवेगळ्या स्वरूपात मिळणार आहे. जसे की 8वी आणि 9वी मध्ये विद्यार्थ्यांना 2500 रुपये, 10वी 11वी व 12वी मध्ये मुलींना 5000 रुपये मिळणार आहे त्याचबरोबर मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर 20000 रुपये या योजनेअंतर्गत मुलीच्या खात्यात जमा केले जातील. यामुळे मुली त्यांचे पुढचे शिक्षण पूर्ण करू शकेल.

सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेची थोडक्यात माहिती

savitribai phule kishori samriddhi yojana In Short

योजनेचे नावसावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना
कोणी सुरू केलीझारखंड सरकार
विभागमहिला व बालविकास विभाग
राज्यझारखंड
लाभार्थीराज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी
उद्देशगरीब मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करणे
लाभाची रक्कम40000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://savitribaipksy.jharkhand.gov.in/

सावित्रीबाई फुले समृद्धी योजनेचा उद्देश

savitribai phule kishori samriddhi yojana Purpose

गरीब कुटुंबातील मुलींना आत्मनिर्भर करणे

बालविवाह थांबवणे

मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे

मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करणे

कशी मिळते लाभाची रक्कम

savitribai phule kishori samriddhi yojana

इयत्तारक्कम
आठवी2500
नववी2500
दहावी5000
अकरावी5000
बारावी5000
18 वर्षे पूर्ण20000

सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेची पात्रता

savitribai phule kishori samriddhi yojana Eligibility

अर्जदार विद्यार्थिनी झारखंड राज्याची मूळ रहिवासी असावी

अर्जदार विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील असावी

राज्यातील आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र असतील

ही योजना पूर्वी कुटुंबातील फक्त दोन मुलींसाठी होती परंतु आता सर्व मुलींसाठी आहे

अर्जदार विद्यार्थिनीचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत कार्यरत नसावे

अर्जदार मुलीचे बँक खाते असणे आवश्यक आहे

सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेची कागदपत्रे

savitribai phule kishori samriddhi yojana Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

अंत्योदय रेशन कार्ड

जन्म प्रमाणपत्र

शैक्षणिक प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

बँक खाते पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेची अर्ज प्रक्रिया

savitribai phule kishori samriddhi yojana Online Apply

सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत वापरावी लागेल

या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन यावर क्लिक करून बेनिफिशियरी लॉगिन करावे लागेल

त्यानंतर रजिस्टर नाऊ यावर क्लिक करून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल

तुमच्या रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, पासवर्ड टाकावे लागेल

त्यानंतर तुम्हाला रजिस्टर यावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या होम पेजवर यावे लागेल

तिथून तुम्हाला तुमचे लॉगिन करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड कॅपच्या टाकून लॉगिन करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Apply Now या पर्यायावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये संपूर्ण माहिती लक्षपूर्वक वाचून तुम्हाला चेक बॉक्स वर टिक करून एक्सेप्ट वर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेचा अर्ज उघडेल

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल

त्यानंतर अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील

त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल

अशा पद्धतीने तुम्ही सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजनेचे ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.