SBI Har Ghar Lakhpati Scheme 2025 In Marathi : महिन्याला फक्त 591 रुपये गुंतवून लाखोंचा फायदा
SBI Har Ghar Lakhpati Scheme 2025 In Marathi : जसे सरकार महिलांसाठी आणि प्रत्येक नागरिकांसाठी योजना राबवतात, तसेच बँक देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असतात. आपण आपल्या भविष्यासाठी आणि मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी आतापासून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो.
SBI Har Ghar Lakhpati Scheme 2025 या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला कोणती आर्थिक अडचण भासत नाही किंवा मुलांच्या शिक्षणासाठीचा देखील खर्च करण्याची अडचण येत नाही. दरम्यान यासाठीच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी कस्टमर रिपेरिंग डिपॉझिट प्रॉडक्ट देण्याची योजना सुरू केली आहे.
SBI Har Ghar Lakhpati Scheme या योजनेत ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार पैसे जमा करू शकता येतील. कमीत कमी रक्कम गुंतवण ते लखपती होऊ शकतात. ते कसे हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
स्टेट बँकेची हर घर लखपती योजना
SBI Har Ghar Lakhpati Scheme In Marathi
SBI Har Ghar Lakhpati Yojana स्टेट बँकेच्या हरघर लखपती योजनेअंतर्गत तुम्ही 1 लाखांपर्यंत पैसे जमा करू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मर्जीनुसार दर महिन्याला पैसे जमा करू शकतात. त्याचबरोबर हे पैसे किती कालावधीसाठी नोंदवायचे आहेत हे देखील तुम्हाला स्वतःला ठरवता येऊ शकते.
अशा प्रकारे कमीत कमी गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपयांचा परतावा या योजनेच्या अंतर्गत मिळवू शकता. हर घर लखपती योजनेअंतर्गत सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि वयाच्या 10 वर्षाच्या आतील मुलांचे देखील अकाउंट सुरू करता येते. या योजनेचा गुंतवणुकीचा कालावधी 3 ते 10 वर्षांचा असतो.
योजनेची व्याजदर किती
SBI Har Ghar Lakhpati Yojana
हर घर लखपती योजनेत अत्यंत चांगले व्याजदर मिळते. या योजनेत वर्षाला 6.50 ते 6.75 टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही दर महिन्याला 591 रुपये गुंतवले तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. या योजनेत जर तुम्ही सलग सहा हप्ते भरले नाही तर तुमचे अकाउंट बंद केले जाईल.
अनेकांना गुंतवणूक करताना कोणतीही रिस्क घ्यायची नसते त्यामुळे त्यांना लखपती होण्याची ही उत्तम संधी आहे. लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो आणि या योजनेतून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो.