Shasan Aplya Dari Maharashtra Sarkar Yojana : एकाच छताखाली सरकारी योजनांचा लाभ

Shasan Aplya Dari yojana 2024 in marathi Maharashtra Sarkar Yojana शासन आपल्या दारी योजना 2024

Shasan Aplya Dari राज्यातील नगरिकांसाठी सरकार नवनवीन कल्याणकारी योजना सुरू करत असते. परंतु असे भरपूर नागरिक आहेत ज्यांना या सुविधाची माहिती नाहीए. आणि त्यामुळे या विविध सुविधांचा त्यांना लाभही घेत येत नाही. हा विचर करूनच महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी योजना सुरू केली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील नागरिकांना या उपक्रमातून संबंधित योजनांचा लाभ घेता येईल. शासन आपल्या दारी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. यामुळे नागरिकांना सहज लाभ घेता येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी ही योजना 14 मे 2023 मध्ये सुरू केली आहे. ही योजना सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात म्हणजेच सातारा जिल्ह्यात सुरू झाली. शासन आपल्या दारी म्हणजे प्रत्येकाला घरोघरी सेवा मिळणार. नागरिकांच्या घरोघरी ही योजना पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘शासन आपल्या दारी’ ही योजना सुरू केली आहे.

Shasan Aplya Dari

शासन आपल्या दारी म्हणजे काय

What is Shasan Aplya Dari

Shasan Aplya Dari शासन आपल्या दारी म्हणजे काय तर याचा अर्थ असा होतो की, नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या. सरकारी सेवा तसेच त्यांना हक्क असलेल्या योजना या सर्व गोष्टी मिळण्यासाठी त्यांना भरपूर कार्यालयांना भेट द्यावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना प्रत्येकाच्या घरोघरी मिळावी आणि याचा सर्वाना पुरेपूर फायदा घेता यावा यासाठी सुरू केली आहे. नागरिकांना सरकरी सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात हाच या मागचा सरकारचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुरू केलेल्या योजनेचा लाभ सुमारे 75000 स्थानिकांना घेण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जिल्हा प्रशासनांना त्यांच्या संबंधित भागात 2 दिवसाचे शिबिर आयोजित करण्यास सांगितले आहे. याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या राहत्या जिल्ह्यात म्हणजेच सातारा जिल्ह्यात हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

Maharashtra Sarkar Yojana शासकीय योजनेचा लाभ जनतेला सहज उपलब्ध करून देणे हा या शासन आपल्या दरी योजनेचा सर्वात मोठा उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाकडून 75000 स्थानिकांना याचा लाभ मिळेल असे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. यासाठीचा जो निधी आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना  या शिबिराचे नियोजन करण्यासाठी वापरता येईल असे सांगण्यात आले.

Shasan Aplya Dari या उपक्रमातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लोकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा कक्ष काम करणार आहे. शासन आपल्या दारी या योजनेमार्फत राज्यातील नागरिकांना एका छताखाली राज्यासारकरच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्याना तहसील कार्यालय, पंचायत समितिचे आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, कृषि विभाग, पशुवैद्यकिय आदि विभागांतर्गत सरकारच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

शासन आपल्या दारी योजनेची Shasan Aplya Dari Yojana सुरुवात गृह जिल्ह्यात झाली म्हणजेच सातारा जिल्हयापासून झाली ती आत्तापर्यंत बुलढाणा, परभणी, शिर्डी, अहमदनगर, जेजुरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी एवढ्या जिल्ह्यांमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला.

Follow on Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

शासन आपल्या दारी Shasan Aplya Dari या उपक्रमा अंतर्गत 75 हजार रहिवाशांना लाभ देण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात देण्यात आली. या अभियानाअंतर्गत शिबिरासाठी कृषी, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, कौशल्य विकास, शालेय शिक्षण, आदी विभागांना दिलेला निधी खर्च करण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.

Shasan Aplya Dari

ठळक मुद्दे :

शासन आपल्या दारी म्हणजे काय

What is Shasan Aplya Dari

शासन आपल्या दारी योजनेबद्दल थोडक्यात माहिती

Shasan Aplya Dari in short

शासन आपल्या दारी योजनेचे उद्दिष्टे

Objectives of Shasan Aplya Dari

शासन आपल्या दारी योजनेची वैशिष्ट्ये

Purpose of Shasan Aplya Dari

शासन आपल्या दारी या अभियानांतर्गतचे विविध उपक्रम आणि कार्यक्रम

शासन आपल्या दरी योजनेचे लाभ

Benefits of Shasan Aplya Dari

शासन आपल्या दरी योजनेची अर्ज प्रक्रिया

Shasan Aplya Dari registration

FAQ

शासन आपल्या दारी योजनेबद्दल थोडक्यात माहिती

Shasan Aplya Dari in short

योजनेचे नावशासन आपल्या दारी
कधी सुरू झाली2023
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री
कुठे सुरू झालीमहाराष्ट्र
उद्देशसरकारच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे
लाभनागरिकांचा सामाजिक विकास करणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन / ऑफलाइन

शासन आपल्या दारी योजनेचे उद्दिष्टे

Objectices of Shasan Aplya Dari

महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ घेता यावा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

नागरिकाला शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी.

सरकारी योजनांच्या सेवेचा लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे.

शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या राज्यातील सर्व योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी मिळावी त्यासाठी त्यांना कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये हा उद्देश या योजनेचा आहे.

नागरिकांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे.  

एखाद्या व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असल्यास त्या व्यक्तीला बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि कार्यालयांना भेट द्यावी लागते त्यामध्ये भरपूर कालावधी जातो आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

सरकारी योजनेची माहिती आणि सर्व कागदपत्रे हे नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे.

सुमारे 75 हजार स्थानिकांना या योजनेअंतर्गत घेतलेल्या शिबिराचा लाभ होणार आहे.

पीएम स्वनिधी योजेनेची संपूर्ण माहिती इथे मिळेल.

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेची संपूर्ण माहिती इथे मिळेल.

शासन आपल्या दारी योजनेची वैशिष्ट्ये

Purpose of Shasan Aplya Dari

महाराष्ट्र शासनाद्वारे Shasan Aplya Dari Yojana ही योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेची सुरुवात सातारा जिल्हा पासून झाली.

सुमारे 5,457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या योजनेअंतर्गत झाले आहे.

या योजनेअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन केले.

एकाच ठिकाणी नागरिकांना सर्व योजनांची माहिती आणि लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

शासन आपल्या दारी या अभियानांतर्गतचे विविध उपक्रम आणि कार्यक्रम

Shasan Aplya Dari

रक्तदान शिबिर

आरोग्य शिबिर

रोजगार मिळावे

आधार कार्ड सुविधा

पॅन कार्ड सुविधा

पासपोर्ट

कृषी सेवा केंद्रचे परवाने

पीएम किसान योजना

सेवानिवृत्त लाभ

शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ

विवाह नोंदणी

भरती मेळावा

ई श्रम कार्ड

पीएम घरकुल योजना

कृषी प्रदर्शन

दिव्यांग साहित्य वाटप

मुलींना सायकल वाटप

सखी किट वाटप

मनरेगा

जॉब कार्ड

डिजिटल इंडिया

शिकाऊ चालक परवाना

शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ

Shasan Aplya Dari

शासन आपल्या दरी योजनेचे लाभ

Benefits of Shasan Aplya Dari

अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.  

राज्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व योजनांची माहिती उपलब्ध होईल ज्यामुळे नागरिक या योजनेचा सहजरीत्या लाभ घेतील.  

शासनाच्या विविध योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आणि त्यांचा वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही ते सहज रित्या मोबाईल व कम्प्युटरच्या मदतीने अर्ज करू शकतील.  

या योजनेमुळे राज्यातील नागरिक कोणत्याही योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आत्मनिर्भर होतील.  

शेतकरी, विद्यार्थी, महिला कामगार, कष्टकरी, दिव्यांग बांधव, आदिवासी बांधव आदी समाजातील घटकांना केंद्रबिंदू म्हणून ही योजना सुरू केली आहे.  

या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य, जिल्ह्यात, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले.

या योजनेचा लाभ देण्यासाठी कमी कालावधीत विविध योजना योजनांची कार्यपद्धती निश्चित केली आहे.  

या योजनेचा लाभ देण्यासाठी अभियान राबवण्यात आले आहे.  

काही सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील नसते अशांना या योजनेचा लाभ होतो.  

या अभियानाच्या माध्यमातून शासन थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दारी येत आहे.

जिल्ह्यात सुमारे 5,457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या योजनेअंतर्गत होणार आहे.

शासन आपल्या दरी योजनेची अर्ज प्रक्रिया

Shasan Aplya Dari registration

शासन आपल्या दारी योजनेचा Shasan Aplya Dari Yojana अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो. ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सर्वप्रथम महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. किंवा एमएससीआयटी केंद्रे, सीएससी केंद्रे, तसेच कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील स्वयंसेवकांच्या मदतीने नागरिकांना शासन आपल्या दारी या योजनेचा लाभ घेता येईल.

FAQ‘s शासन आपल्या दरी या योजनेअंतर्गत सतत विचारले जाणारे प्रश्न

शासन आपल्या दारी योजना Maharashtra Sarkar Yojana कधी आणि कोणी सुरू केली?

14 मे 2023 रोजी सातारा जिल्हयापासून शासन आपल्या दारी योजनेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

शासन आपल्या दारी योजनेचा Maharashtra Sarkar Yojana उद्देश काय आहे?

नागरिकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच सरकारी सेवा आणि योजनेचा लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

शासन आपल्या दारी योजनेचा Maharashtra Sarkar Yojana अर्ज नोंदणी कुठून करावी?

महालाभार्थी या पोर्टलवरून शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेता येईल.

शासन आपल्या दारी योजनेचा Maharashtra Sarkar Yojana अर्ज कसा करावा?

ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने शासन आपल्या दारी या योजनेचा अर्ज करता येईल.

शासन आपल्या दारी योजनेचा Maharashtra Sarkar Yojana लाभ घेण्यासाठी नोंदणी कुठे करावी?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सीएससी केंद्र, एमएससीआयटी केंद्र, कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील स्वयंसेवकांची मदत घेऊन या योजनेची नोंदणी करता येईल.