Shirdi Tirupati Weekly Espress Full Route In Marathi : शिर्डी-तिरुपती नवीन एक्सप्रेस सुरू या जिल्ह्यांना होणार फायदा

Shirdi Tirupati Weekly Espress Full Route : महाराष्ट्रात सुरू झाली आणखी एक एक्सप्रेस

Shirdi Tirupati Weekly Espress Full Route : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला अजून एक एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. शिर्डी ते तिरुपती ही साप्ताहिक एक्सप्रेस सुरू झाली आहे. ही एक्सप्रेस 4 राज्यातून धावणार आहे. 31 स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे.

Shirdi Tirupati Weekly Espress Full Route शिर्डी ते तिरुपती हा 31 तासांचा प्रवास असेल. केंद्रीय मंत्री व्ही. सोमन्ना यांनी तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आहे. या एक्सप्रेस रेल्वे चा सर्वात जास्त फायदा म्हणजे मराठवाड्यातील प्रवाशांना होणार आहे.

राज्यातील 11 स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे. यामध्ये बहुतांश स्थानकेही मराठवाड्यातीलच आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

त्याशिवाय शिर्डी आणि तिरुपती ही दोन देवस्थाने या ट्रेनमुळे जोडली जाणार आहेत. थेट तिरुपती ते शिर्डी रेल्वे असल्यामुळे प्रवाशांना जाणे येणे अगदी सोपे होणार झाले आहे. नव्या एक्सप्रेस ट्रेन मुळे तिरुपती आणि शिर्डी हे दोन तीर्थक्षेत्र एकमेकांशी जोडले गेले आहेत.

Shirdi Tirupati Weekly Espress या मार्गावर नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड त्याच बरोबर इतर महत्त्वाच्या 31 ठिकाणी या रेल्वेला थांबे देण्यात आले आहेत. या रेल्वेमुळे तीर्थक्षेत्र पर्यटन कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. त्याशिवाय मार्गाच्या आसपासच्या परिसरातल्या आर्थिक विकास वाढणार आहे.

Shirdi Tirupati Weekly Espress नवीन रेल्वे मुळे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि सिकंदराबाद या परिसरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच यामुळे परळी वैजनाथ हे तीर्थक्षेत्र देखील यामध्ये जोडले गेले आहे. त्यामुळे देखील प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे. आता महाराष्ट्रात ही एक्सप्रेस कुठे कुठे थांबणार हे आपण पाहू.

महाराष्ट्रात एक्सप्रेस कुठे थांबणार

maharashtra gets new shirdi tirupati weekly express full route timetable stations tickets

शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नागरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड आणि उदगीर या स्थानकावर शिर्डी – तिरुपती एक्सप्रेस रेल्वे थांबणार आहे.

New Shirdi Tirupati Weekly Espress तिरुपती – साईनगर शिर्डी एक्सप्रेस चा प्रारंभ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमधील रेल्वेचा प्रवास सुसाट होणार आहे.

आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टी भागापासून भाविकांना शिर्डीला घेऊन जाणारी पहिली थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. तिरुपती आणि शिर्डी या भारतातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांना थेट जोडणाऱ्या या रेल्वेच्या सेवेमुळे यात्रेकरूंना अधिक आनंद झाला आहे.

ट्रेनमध्ये 1 एसी 2 टीयर, 2 एसी 3 टीयर, 7 स्लीपर क्लास, 6 जनरल अनरिझर्व्ह आणि 2 कोच असतील.

New Shirdi Tirupati Weekly Espress या रेल्वेचा गाडी नंबर 17417 तिरुपती -शिर्डी एक्सप्रेस असेल. ही साप्ताहिक एक्सप्रेस आहे. ही रेल्वे मंगळवारी सकाळी 8:15 मिनिटांनी तिरुपती इथून निघेल आणि बुधवारी सकाळी 10:45 मिनिटाला शिर्डी येथे पोहोचेल. पूर्ण वेळ हा 26 घंटे 30 मिनिट एवढा आहे.

परत येण्यासाठी या ट्रेनचा नंबर 17418 असेल. शिर्डी -तिरुपती एक्सप्रेस मंगळवारी रात्री 7:35 मिनिटाला शिर्डी इथून निघून बुधवारी रात्री 10:45 मिनिटाला तिरुपती येथे पोहोचेल. एकूण प्रवास हा 1435 किलोमीटर असेल.