Shree Datta Panchpadi Lyrics In Marathi : श्री दत्त पंचपदी
श्री दत्त पंचपदी
।।करुणात्रिपदी।।
(श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीमहाराजविरचित)
1 शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता
शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ।।धृ।।
तू केवळ माता जनिता । सर्वथा तू हितकर्ता ||
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ||
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ||
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ||
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।१।।
अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।।
तरि आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ।।
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ||
सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ||
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।२।।
तू नटसा होउनि कोपी । दंडिताहि आम्ही पापी ||
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरी न च संतापी ।।
गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच होऊ कोपी ||
निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।३।।
तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां ||
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा (दुसरा) त्राता ||
निजबिरुदा आणुनि चित्ता । तू पतितपावन दत्ता ||
वळे आतां आम्हांवरता | करुणाघन तू गुरुनाथा ||
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।४।।
सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार ||
तव पदी अर्पू असार । संसाराहित हा भार ||
परिहरिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबन्धो ||
आम्हां अघ लेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ।।
शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ।।५।।
2 श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता
श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।धृ।।
चोरे द्विजासी मारीता मन जे । कळवळले ते कळवळो आता ।।१।।
पोटशूळाने द्विज तडफडता । कळवळले ते कळवळो आता ।।२।।
द्विजसुत मरता वळले ते मन । हो की उदासीन न वळे आता।।३।।
सतिपति मरता काकुळती येता । वळले ते मन न वळे की आता।।४।।
श्रीगुरुदत्ता त्यजी निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आता।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ।।५।।
3 जय करुणाघन निजजनजीवन
जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्दन पाहि जनार्दन ।।धृ।।
निज-अपराधे उफराटी दृष्टी । होऊनि पोटी भय धरू पावन ।।१।।
तू करुणाकर कधी आम्हांवर । रुसशी न किंकर-वरद-कृपाघन।।२।।
वारी अपराध तू मायबाप । तव मनी कोप लेश न वामन ।।३।।
बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।।४।।
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव । पदी देवो ठाव देव अत्रिनन्दन।।
जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्दन पाहि जनार्दन।।५।।
4 उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया
उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||धृ||
जो अनसूयेच्या, भावाला, भुलूनिया सुत झाला,
दत्तात्रेय अशा, नामाला, मीरवी वंद्य सुरांला,
तो तू मुनीवर्या, निज पाया, स्मरता वारीसी माया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||१||
जो माहुरपूरी, शयन करी, सह्याद्रीचे शिखरी,
निवासे गंगेचे, स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी,
स्मरता दर्शन दे, वारी भया, तो तू आगमेया
उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||२||
तो तू वांझेसी, सुत देसी, सौभाग्या वाढविसी,
मरता प्रेतासी, जीववीसी, सत्वर-दाना देसी,
यास्तव वासुदेव, तव पाया, धरी त्या तारी सदया,
उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ||३||
5 सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,
सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,
कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे |
कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ||धृ||
या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी,
घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी,
केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ||१||
या रानी, माझी करुणावाणी, कायाकष्टी प्राणी,
ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी,
संकट येऊनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ||२||
त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा,
लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा,
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ||३||