Shree Maruti Stotra 2024 : श्री मारुती स्तोत्र
Shree Maruti Stotra श्री मारुती स्तोत्र समर्थ रामदासांनी सतराव्या शतकात लिहिले आहे या स्तोत्रांमध्ये मारुतीच्या पराक्रमाचे चरित्राचे वर्णन केले आहे आज आपण भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती हे मारुती स्तोत्र Shree Maruti Stotra पाहणार आहोत मारुतीचे एकूण 11 स्त्रोत स्तोत्रे आहेत त्यापैकी हे आपण आज पाहू
Shree Maruti Stotra मारुती स्तोत्राचे पठण केल्याने मारुती प्रसन्न होतो, भक्ताच्या मनातील भीती नाहीशी होते, मारुतीचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहतो, भक्ताचे सर्व संकट दूर होतात, मारुती स्तोत्राचे पठण केल्यामुळे धनधान्याची वृद्धी वाढते, आपल्या सभोवतांच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात, सर्व रोग बरे होतात.
Shree Maruti Stotra श्री मारुती स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें ।
सौख्यकारी दु:खहारी, धूर्त वैष्णवगायका ॥२॥
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ॥४॥
ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं ।
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ॥७॥
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती ।
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ॥११॥
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें ।
तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
धन धान्य, पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥
भूतप्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तहीं ।
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ॥१५॥
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ॥१६॥
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ॥१७॥
॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मराठी