special trains to pandharpur for ashadhi ekadashi : आषाढी निमित्त पंढरपूरसाठी 4 विशेष रेल्वे

special trains to pandharpur for ashadhi ekadashi जाणून घेऊ कोणत्या गाड्या कशा धावणार

special trains to pandharpur for ashadhi ekadashi पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची आस भाविकांना लागली आहे. या भाविकांसाठी रेल्वेने 4 विशेष गाड्या उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे सांगलीसह कोल्हापूर व कर्नाटकातील विठ्ठल भक्तांची सोय होणार आहे. ashadhi ekadashi

6 जुलैला ashadhi ekadashi आषाढी एकादशी असून यासाठी अनेक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तयार झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेही विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे.

special trains to pandharpur for ashadhi ekadashi आषाढी साठी पुणे- कुर्डूवाडी-पंढरपूर -मिरज, कोल्हापूर-पंढरपूर -कुर्डूवाडी, मिरज -पंढरपूर -सोलापूर -कलबुर्गी आणि नागपूर पंढरपूर मिरज पुणे कुर्डूवाडी पंढरपूर कोल्हापूर कुर्डूवाडी या चार विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत.

नागपूर-मिरज ही गाडी 4 व 5 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी पंढरपूर मिरज च्या दिशेने सुटणार आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता pandharpur पंढरपुरात, तर मिरजेत दुपारी 12 पोहोचेल. यानंतर मिरजेतून दुपारी 1 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी नागपूरला पोहोचणार आहे. ही गाडी मिरज ते पंढरपूर दरम्यान बेळंकी वगळता सर्व स्थानकावर थांबणार आहे.

पुणे-पंढरपूर-मिरज ही गाडी 3 ते 7 जुलै दरम्यान कुर्डूवाडी मार्गे धावेल. पुण्याहून सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुटून पंढरपूर येथे दुपारी 4 वाजता, तर मिरजेत सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात मिरजेतून रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी सुटून pandharpur पंढरपूर येथे रात्री 10 वाजता तर पुण्यात पहाटे 4.30 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी मिरज ते पंढरपूर दरम्यान सर्व स्थानकावर थांबणार आहे.

कोल्हापूर-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी 1 ते 10 जुलै दरम्यान धावणार आहे. कोल्हापूर येथून पहाटे 6 वाजून 10 मिनिटांनी सुटून मिरजेत सकाळी 7.30 तर पंढरपूर येथे दुपारी 12.15 तर कुर्डूवाडी येथे 1.30 वाजता पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी कुर्डूवाडी येथून दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी सुटेल, पंढरपूर येथे 5.30 मिरजेत रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी तर कोल्हापूरला रात्री 10.30 वाजता पोहोचणार आहे.

मिरज-कलबुर्गी गाडी 1 ते 10 जुलै दरम्यान मिरजेतून पहाटे 5 वाजता सुटेल ती पंढरपूरला 7 वाजून 40 मिनिटांनी सोलापूरला 11 वाजता तर कलबुर्गी येथे दुपारी 1.30 वाजता पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी कलबुर्गी येथून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल पंढरपूर येथे रात्री 8:55 वाजता तर मिरजेत रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे. ही गाडी मिरज पंढरपूर दरम्यान सर्व रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.