Mahila Samridhi Yojana Update News In Marathi : महिला समृद्धी योजना
Mahila Samridhi Yojana महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी आम्ही फुलप्रूफ नितीनुसार काम करत आहोत. ही योजना लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली आहे.
Mahila Samridhi Yojana 2025 आमचे सरकार महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी काम करत आहे आणि लवकरच शहरातील पात्र महिलांना 2500 रुपये प्रति महिना दिला जाईल. यामध्ये समस्या ही आहे की मागील बारा-चौदा वर्षांमध्ये दिल्लीमध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन रेशन कार्ड देण्यात आले नाही.
Mahila Samridhi Yojana In Marathi : यामुळे कुठलीही कल्याणकारी योजनांमध्ये नवीन लाभार्थी जोडला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही यावर काम करत असल्याची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री गुप्ता यांनी दिली.
Mahila Samridhi Yojana आम्हाला ही योजना पूर्ण शक्तीनिशी सुरू करायची आहे. जेणेकरून ज्या पात्र लोकांकडे रेशन कार्ड नाही, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल. आम्ही ही योजना लागू करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी काम करत आहोत. ही योजना लवकरच सुरू करण्यात येईल.
Mahila Samridhi Yojana 2025 दरम्यान यावर्षीच्या फेब्रुवारी मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने आश्वासन दिले होते की, जर आमचे सरकार दिल्लीमध्ये स्थापन झाले तर आम्ही आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गातील महिलांना 2500 रुपये महिना देऊ.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, आमच्या सरकारने बजेट 2025 26 मध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5100 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
150 इलेक्ट्रिक बस सुरू
दिल्लीमधील वायु प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आमच्या सरकारने वाहनापासून होणारे प्रदूषण आणि धूळ प्राथमिक कारण आहे हे लक्षात घेत शुक्रवारी 150 नवीन इलेक्ट्रिक बसला हिरवा झेंडा दाखवला.
या वर्षाच्या शेवटपर्यंत इलेक्ट्रिक बसची संख्या 2000 केली जाईल तसेच संपूर्ण सार्वजनिक परिवहन बस इलेक्ट्रिक मध्ये बदलण्यासाठी एक ते दीड वर्ष लागले.
पुढील 50 वर्ष सत्तेत राहू?
Mahila Samridhi Yojana Update News भाजप 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये सत्तेत आली आहे, आम्ही 27 वर्षात जे थांबलेली कामे होते त्यावर काम करत आहोत. तसेच भविष्यातील 27 वर्षासाठी तयारी करत आहोत जेणेकरून भाजप लोकांची अशी सेवा करेल की पुढील पन्नास वर्षांपर्यंत आम्ही सत्तेत राहू.
पूर्ण राज्याचा दर्जा
Mahila Samridhi Yojana News या दरम्यान बोलताना रेखा गुप्ता म्हणाल्या की सध्याच्या स्थितीमध्ये आम्हाला वाटत नाही की दिल्लीसाठी पूर्ण राज्याचा दर्जा हा मुद्दा महत्त्वाचा असेल कारण अन्य महत्वाची अनेक मुद्दे आहेत, ज्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.