SSC Exam 2024 Rule : दहावीचे गणित विज्ञानाचे टेन्शन संपले

SSC Exam 2024 Rule : 20 गुण मिळाले तरी अकरावीत प्रवेश

SSC Exam शाळेत असल्यापासूनच विज्ञान आणि गणित या दोन विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. एकतर हे विषय कधीच आपले वाटत नाहीत आणि त्या विषयाचा पेपर म्हटलं की पोटात गोळा येतो. विज्ञान आणि गणित हा विषय घेतला की अनेकांच्या विकेट या विषयात पडतात. मात्र आता विद्यार्थ्यांना SSC Exam दहावीच्या बोर्डाच्या एसएससी परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा अधिक गुण मिळाले तरी अकरावी मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. नव्या अभ्यासक्रमात या संदर्भात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञानचे टेन्शन संपले आहे असे म्हणायला हरकत नाही. SSC Exam Rule

SSC Exam 2024 नवीन अभ्यासक्रमामध्ये बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा अधिक गुण मिळाले तरी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजेच अकरावी मध्ये प्रवेश दिला जाणार आहे, मात्र त्यांच्या मार्कशीटवर एक विशिष्ट प्रकारचा शेरा मारण्यात येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत एक म्हणजे प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देऊन अधिक गुण मिळवणे. SSC Exam Rule

SSC Exam 2024 Rule मात्र ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयावर आधारित नाही किंवा त्यांना यावर आधारित कोणते करिअर करायचे नाही यांच्यासाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना मात्र गणित आणि विज्ञान मध्ये पास होणे आवश्यक असणार आहे. याचा फायदा ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित या विषयावर पुढील उच्च शिक्षण घ्यायचे नाही अशांना होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञान विषयाचे टेन्शन कमी होणार आहे.

SSC Exam Rule मात्र अनेक शिक्षण तज्ञांकडून यावर चिंता व्यक्त केली जात आहे, कारण हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी घातक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारण यामुळे पदवीधरांची नुसती संख्या वाढेल मात्र शिक्षणाचे गुणवत्तेचे काय असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण होणार आहे. शिक्षणातील गणित आणि विज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे विषय आहेत त्यामुळे ह्या विषयांमध्ये पास करणे कितपत योग्य राहील याचाही शासनाने विचार करण्याची गरज असल्याची शिक्षण तज्ञ म्हणत आहेत. मात्र सरकारने विज्ञान आणि गणित हे विषय कशा सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येतील यावर विचार करण्याची वेळ आहे. कारण जर शिक्षणात गणित आणि विज्ञान मध्ये जर असेच विद्यार्थी पास होत राहिले तर त्यांच्या कौशल्याचे काय त्यांच्या करिअरचे काय असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे येणारा काळच सांगेल की हा निर्णय कितपत योग्य आहे ते..