ST Reservation Discount information in marathi : एसटी प्रवाशांसाठी खुशखबर

ST Reservation Discount : तिकीट दरात मिळणार 15 टक्के सूट

ST Reservation Discount : महाराष्ट्रातील सरकारी बस सेवा एसटी प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 टक्के सूट देण्याची योजना जाहीर केली आहे.

MSRTC 15 percent discount advance ticket booking ही योजना 1 जुलै 2025 पासून लागू झाली असून 150 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना सवलती धारक प्रवासी म्हणजेच जसे की, वृद्ध, विद्यार्थी किंवा इतर सवलतीचे पात्र असलेले प्रवासी वगळता तिकीट दरामध्ये 15 टक्के सूट मिळणार आहे.

MSRTC 15 percent discount advance ticket booking या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा आहे0 व त्याचबरोबर प्रवासाचा गडबरीत काळ वगळता वर्षभर हा लाभ देणे हा आहे. दिवाळी आणि उन्हाळी या सुट्ट्यांसारख्या गर्दीच्या हंगामात या सूट योजनेचा लाभ मिळणार नाही.

परिवहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या 70 व्या वर्धापन दिनी या योजनेची घोषणा केली होती. त्यांनी प्रवाशांना आवाहन केले की, गर्दी कमी असलेल्या काळात प्रवाशांना आगाऊ तिकीट बुकिंग करून योजनेचा लाभ घ्यावा. त्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होईल.

MSRTC advance booking discount मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रतिष्ठित शिवनेरी व एसटी बस साठीही ही योजना लागू करण्यात आली आहे. या बसच्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी शिवनेरी बस मधील प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास 15 टक्के सूट मिळेल.

तिकीट प्रवाशांनी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर msrtcors.com , मोबाईल ॲप martc Bus Reservation किंवा तिकीट काउंटरवरून आगाऊ आरक्षण करून सवलतीचा लाभ घेता येईल.

MSRTC advance booking discount या योजनेमुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास उपलब्ध होईल. आगाऊ आरक्षणामुळे प्रवास व्यवस्थापन अधिक सोयीस्कर होईल आणि गर्दीचे नियोजनही उत्तम होईल.