Student Bus Pass Information In Marathi : एसटी पासचे नो टेन्शन

school students gets st bus pass in schools information marathi : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

Student Bus Pass : राज्यातील विद्यार्थ्यांना आता रांगेत लागून एसटी ची पास काढण्याची टेन्शन राहणार नाही. कारण राज्य सरकारने त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्येच त्यांना एसटीची पास उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Student Bus Pass : 16 जुन पासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तासंतास रांगेत उभे राहण्याचे विद्यार्थ्यांचे टेन्शन आता संपणार आहे. याबरोबर त्यांचा मोठा शैक्षणिक वेळही वाचणार आहे.

Student Bus Pass आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना एका गावाहून दुसऱ्या गावाला एसटीने ये जा करावी लागते. यासाठी त्यांना एसटीची पास काढावी लागते. मात्र एसटीची पास काढायची म्हटलं की पास केंद्रावर मोठी रांगच रांग विद्यार्थ्यांची पाहायला मिळायची.

Student Bus Pass Information In Marathi यामध्ये विद्यार्थ्यांचा अख्खा दिवस जायचा. त्यामुळे त्यांची त्या दिवसाची शाळा ही बुडायची ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने आता विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्येच एसटीची पास उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अशी माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे. याचा राज्यभरातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठा फायदा होणार आहे.

school students gets st bus pass in schools एसटी बसची पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता विद्यार्थी विद्यार्थ्यांना एसटीची पास मिळवण्यासाठी कुठल्याही आगारात किंवा बस स्टॉप ला जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

कारण राज्य सरकारने त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्यांना एसटीची पास उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Student Bus Pass Information In Marathi याचा फायदा राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिले आहेत.

school students gets st bus pass in schools विद्यार्थ्यांना त्यांचा एसटी पास थेट शाळा किंवा महाविद्यालयामध्ये दिला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना पास मिळणे अधिक सोपे होईल.

पासच्या रांगेतून सुटका

school students gets st bus pass in schools यंदाचे शैक्षणिक वर्ष 16 जून पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून शाळेपर्यंत ये जा करण्यासाठी सरकारी एसटीचा प्रवास करावा लागतो. सरकारकडून त्यांना एसटी प्रवासात 66.66% एवढी सवलत दिली जाते. या विद्यार्थी विद्यार्थ्यांना मासिक पास काढण्यासाठी 33.33% रक्कम भरावी लागते.

सरकारच्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास चे वितरण केले जाते.

पण आतापर्यंत विद्यार्थ्यांना या पाससाठी एसटीच्या पास केंद्रावर जाऊन पास काढावी लागत होती किंवा शाळेत गट करून आगारात जाऊन एकत्र पास काढली जात होती. मात्र आता त्रासातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

कारण त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जातो त्यांना एसटीची पास मिळणार आहे. त्यामुळे आता पास काढण्याचे टेन्शन संपणार आहे. शाळा, महाविद्यालयाने पुरवलेल्या यादीनुसार एसटीचे कर्मचारी थेट शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचे पास देतील यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचा शैक्षणिक वेळ वाचणार आहे असे सरनाईक यांनी स्पष्ट सांगितले आहे.

एसटी पास शाळेत

Student Bus Pass : 16 जून पासून एसटी महामंडळाकडून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही मोहीम राबवली जाणार आहे. याअंतर्गत एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी सर्व शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र पाठवून नवीन वर्षातील विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या योजनेचा लाभ राज्यातील शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थ्यांना होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली आहे.