सुकन्या समृद्धी योजना 2024 Sukanya Samriddhi Yojana 2024 information
केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनामध्ये Sukanya Samriddhi Yojana 2024 SSY देण्यात येणाऱ्या व्याजामध्ये वाढ केली आहे. यापूर्वी या योजनेत गुंतवणूक केल्यास ग्राहकांना ८ टक्के वाढ देण्यात येत होती मात्र आता व्याजदरात वाढ केल्यानंतर यात ८.२ टक्के व्याज मिळणार आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे अधिक काळापर्यंत गुंतवणूकीमुळे या योजनेतून मोठा फंड बनवला जाऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा मुलीचे वय १० वर्ष होईपर्यंतच तुम्ही सुकन्या समृद्धी योजनामध्ये खाते उघडू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेलाच Sukanya wealth account म्हणजेच सुकन्या समृद्धी खाते असे देखील म्हणतात.
https://en.wikipedia.org/wiki/Sukanya_Samriddhi_Account
सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana खाते २१ व्या वर्षी मॅच्योर होते. मात्र मुलीचे वय १८ वर्ष झाल्यावर खात्यातून शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे काढता येतात. येथे आम्ही तुम्हाला एक विशेष कॅलकुलेशन बद्दल माहिती देत आहोत. या प्लानमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला ४ हजार रूपयांची बचत करावी लागेल. आणि ही रक्कम सुकन्या समृद्धी योजनेच्या Sukanya Samriddhi Yojana खात्यात टाकावी लागेल. ग्रहीत धरा की तुम्ही २०२४ मध्ये गुंतवणूक सुरू करत आहात आणि तुमच्या मुलीचे वय ५ वर्ष आहे. अशा स्थितीत कॅलकुलेशनचा संपूर्ण फंडा काय असेल, येथे समजून घ्या.
जसे की आम्ही तुम्हाला सांगितले की, खात्याचा मॅच्योरिटी पीरियड २१ वर्ष आहे म्हणजे २०२४ मध्ये गुंतवणूक सुरू केल्यावर तुम्ही २०४५ मध्ये रिटर्न मिळू शकाल. जर तुम्ही महिन्याला ४ हजार रूपयांची बचत करत आहात तर एका वर्षात ४८००० रूपयांची गुंतवणूक करू शकताल. खात्यात १५ वर्षांपर्यंत पैसे टाकावे लागतात. कॅलकुलेशनच्या हिशोबानुसार तुम्हाला ही गुंतवणूक २०४२ पर्यंत करावी लागेल. अशा पद्धतीने तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ७ लाख २० हजार रूपयांची गुंतवणूक (बचत) केलेली असेल. २१ वर्षांनंतर म्हणजे २०४५ मध्ये मॅच्योरिटीवर तुम्हाला १५ लाख १४ हजाराचे केवळ व्याज मिळू शकते. याचा अर्थ म्हणजे ७.२० लाख गुंतवणूकीवर तुम्ही १५.१४ लाख रूपयांचे व्याज मिळवू शकता. विशेष म्हणजे मॅच्युरिटीनंतर तुम्हाला गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम अशी एकूण रक्कम सोबत मिळेल, ती एकूण तब्बल २२ लाख ३४ हजार रूपये होते.
ठळक मुद्दे :-
सुकन्या समृद्धि योजनेबद्दल थोडक्यात माहिती
Sukanya Samriddhi Yojana in short
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
Benefits of Sukanya Samriddhi Yojana
या योजनेचे खाते उघडण्यासाठीच्या काही बँका
Some of Sukanya Samriddhi Yojana account opening
सुकन्या समृद्धी योजनेसाठी काय आहे वयोमर्यादा
सुकन्या समृद्धी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Documents of Sukanya Samriddhi Yojana
सुकन्या समृद्धि योजनेत खाते उघडण्याची प्रक्रिया
खात्यातील बॅलेन्स कसे बघावे
सुकन्या समृद्धी योजनेतील जमा रक्कम काढण्याचा नियम
कधी बंद करता येते सुकन्या समृद्धी योजनेचे खाते
सुकन्या समृद्धी योजनेत इन्कम टॅक्स मध्ये सूट
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
Sukanya Samriddhi Yojana application
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता
Eligibility of Sukanya Samriddhi Yojana
FAQ’S
सुकन्या समृद्धी योजनेबद्दल थोडक्यात माहिती
Sukanya Samriddhi Yojana in short
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धि योजना |
कोणाला मिळणार लाभ | 10 वर्षाच्या आतील मुली |
कधी सुरू झाली | 2015 साली |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
किती रुपयाची गुंतवणूक | 250 रुपयापासून ते 1.5 लाख रुपयापर्यंत |
खाते कुठे उघडले जाते | पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँक |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन प्रक्रिया |
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
Benefits of Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana SSY ही एक सरकारी सेविंग स्कीम आहे. केंद्र सरकारद्वारे मुलींचे भविष्य उज्ज्वल बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ही एक सरकारी योजना असल्याने यात आर्थिक नुकसानाची भिती नाही. म्हणजे गॅरंटीने तुमचे पैसे परत मिळतात.
सुकन्या समृद्धि योजना Sukanya Samriddhi Yojana ही दिर्घ काळासाठी सुरू केलेली छोटी बचत योजना आहे. यात वार्षिक कंपाउंडिंगचा लाभ मिळतो. म्हणजे गुंतवणूकीवरही चांगला परतावा मिळतो. विशेष म्हणजे दत्तक घेतलेल्या मुलींचाही यात समावेश करण्यात आलेला आहे.
कुटुंबातील केवळ दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.
सुकन्या समृद्धि योजना Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत गुंतवणूकदार आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक करू शकतात. यात एका आर्थिक वर्षात कमीत कमी २५० रूपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रूपयांची गुंतवणूक केली जावू शकते.
मुलीचे वय १८ वर्ष झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण केल्यानंतर खात्यातून काही रक्कम काढली जाऊ शकते. मात्र एका वर्षात तुम्ही केवळ एकाच खात्यातून रक्कम काढू शकता.
भारत सरकारने सुकन्या समृद्धि योजना Sukanya Samriddhi Yojana करमुक्त ठेवली आहे. यात गुंतवणूक केलेली रक्कम त्यावर प्राप्त झालेल्या व्याजासह म्यॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रक्कमही टॅक्स फ्री असते. म्हणजे सुकन्या समृद्धी योजना Sukanya wealth account गुंतवणूकदारांना बचतीसह टॅक्समध्येही सुट देण्यात आली आहे.
आवश्यकता निर्माण झाल्यास खाते एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहज ट्रांसफर केले जाऊ शकते. मात्र असे तेव्हाच केले जाते जेव्हा खातेदार मुळ ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जातो. या प्रकरणात कशामुळे जागा बदलत आहात याचे प्रुफ दाखवावे लागेल. त्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत Sukanya wealth account सुरू केलेले खाते ट्रांसफर होईल. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितिनुसार गुंतवणूक करू शकता गुंतवणूकदार १ वर्षात कमीत कमी २५० रुपये तर जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते या बँकेत उघडा
Some of Sukanya Samriddhi Yojana account opening
सुकन्या समृद्धी योजनेचे Sukanya Samriddhi Yojana खाते हे पोस्ट ऑफिस मध्ये उघडू शकता किंवा सरकारी बँकेत देखील ही खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी ज्या सरकारी बँकेत खाते उघडता येतील आशा काही बँकेची यादी खाली देत आहोत.
पोस्ट ऑफिस (post office)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
बँक ऑफ बडोदा (bank of baroda)
पंजाब नॅशनल बँक (PNB)
बँक ऑफ इंडिया (bank of india)
इंडियन बँक (Indian bank)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ही वाचा : https://yojanamazi.com/pradhanmantri-pik-vima-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ही वाचा : https://yojanamazi.com/pradhanmantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी ही वाचा : https://yojanamazi.com/pm-mudra-loan-yojana-2024-in-marathi/
सुकन्या समृद्धी योजनेसाठी काय आहे वयोमर्यादा
१० वर्षांखालील मुलीच्या नावावार आई-वडिल किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत Sukanya Samriddhi Yojana खाते उघडू शकतो. या योजनेअंतर्गत १५ वर्षापर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. याची परिपक्वता अवधी २१ वर्ष आहे.
सुकन्या समृद्धी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Documents of Sukanya Samriddhi Yojana
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- मुलीचे ओळखपत्र
- मुलीचे किंवा पालकाचे आधार कार्ड
- जुळ्या किंवा तिळ्या मुली असतील अशा वेळी पालकांचे प्रतिज्ञापत्र
- आई-वडिल किंवा पालकाचा पासपोर्ट साइज फोटो
- तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता
बँक किंवा पोस्ट ऑफिसने मागितलेले अन्य कागदपत्रे.
सुकन्या समृद्धि योजनेत खाते उघडण्याची प्रक्रिया
Account opening Process of Sukanya Samriddhi Yojana
मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana खाते उघडण्यासाठी आई वडील किंवा पालकांना बँक किंवा पोस्ट कार्यालयातून अर्ज घ्यावा लागेल.
अर्जावर विचारन्यात आलेली सर्व माहिती जसे की आई-वडील किंवा पालकाचे नाव, मुलीचे नाव, वय आदि माहिती अर्ज वाचून काळजीपूर्वक भरावी लागेल.
अर्ज सोबत अनेक कागदपत्रही जमा करावे लागतील यात आई वडीलचे उत्पनाचे प्रमाणपत्र, मुलीचे जन्म प्रमाणपत्र आदि.
ज्या बँक अथवा पोस्ट कार्यालयातून तुम्ही अर्ज घेतला आहे तेथेच जाऊन अर्ज जमा करावा लागेल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर सुकन्या समृद्धी योजनामध्ये म्हणजेच Sukanya wealth account अर्ज भरून पूर्ण होईल.
खात्यातील बॅलेन्स कसे बघावे
तुम्ही घरी बसून सुकन्या समृद्धी योजनेच्या Sukanya Samriddhi Yojana खात्यातील बॅलेन्स जाणून घेऊ शकता. मात्र त्यासाठी तुमचे लॉगिन क्रेडेंशीयल्स असणे आवश्यक आहे. लॉगिन क्रेडेंशीयल्स बँकेकडून दिले जाते पण सर्वच बँकेत ही सुविधा उपलब्ध नाही, यामुळे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यापूर्वीच लॉगिन क्रेडेंशीयल्स संदर्भात आधीच माहिती घ्या. बँकेकडून लॉगिन क्रेडेंशीयल्स घेतल्यानंतर बँकेच्या इंटरनेट बँकिंग पोर्टल वर जावे, याच्या होम पेजवरच बॅलेन्स पाहण्याचा पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करून सुकन्या समृद्धी खात्यातील रक्कम चेक करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेतील जमा रक्कम काढण्याचा नियम
Sukanya Samriddhi Yojana योजना परिपक्व होणे म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या 21 वर्षानंतर किंवा मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर रक्कम काढता येते. किंवा मुलगी 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढता येते. आपण ही रक्कम एकदाच किंवा टप्प्याटप्प्यानेही काढू शकतो. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जी शिल्लक रक्कम राहते त्यातील 50 टक्के रक्कम तुम्हाला काढता येते.
कधी बंद करता येते सुकन्या समृद्धी योजनेचे खाते
सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana SSY 15 वर्ष गुंतवणूक करणे आवश्यक आहे मात्र काही परिस्थितीत वेळेपूर्वी खाते बंद करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेच्या Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत ज्या मुलीच्या नावे खाते सुरू केले आहे त्या मुलीचा मृत्यू झाल्यास असे खाते बंद केले जाते.
पालकाचा मृत्यू झाल्यासही खाते बंद करता येते.
मुलीला एखादा गंभीर आजार झाल्यावरही असे खाते बंद करता येते.
विदेशात गेलेल्या मुलीचेही खाते बंद करण्यात येते. आर्थिक दृष्ट्या पालक सक्षम नसल्यासही खाते बंद करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेत इन्कम टॅक्स मध्ये सूट
मुलीसाठी सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana यासाठीही खास आहे कारण यामुळे गुंतवणूकदारास अनेक प्रकारचे फायदे होतात.
या Sukanya wealth account योजनेत गुंतवलेली रक्कम, मिळणारे व्याज आणि मॅच्युरीटी रक्कम कर मुक्त आहे. एवढेच नाही तर इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 चे कलम 80c अंतर्गत गुंतवणूक करण्यात आलेल्या मूळ रक्कमेवर गुंतवणूकदाराला 1.50 लाख रुपये पर्यंतचा फायदा मिळतो.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
Sukanya Samriddhi Yojana application
तुम्ही आरबीआय RBI ची वेबसाइट अथवा अन्य काही संस्थांच्या साईट वरूनही सुकन्या समृद्धी योजने Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत खाते उघडण्याचा अर्ज डाउनलोड करू शकता. भारतीय रीझर्व बँक, पोस्ट, एसबीआय, पिएनबी, axis बँक, आयसीआयसीआय बँक आदि बँकेच्या अधिकृत साईट वरूनही तुम्ही या योजनेचा अर्ज डाउनलोड करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता
Eligibility of Sukanya Samriddhi Yojana
- अर्जदार मुलगी भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
- सुकन्या समृद्धी योजनाखाते पालकांनी मुलीच्या नावाने उघडावे.
- मुलीचे वय १० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- एक कुटुंबातून फक्त दोन मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते.
- सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे दत्तक घेतलेल्या मुलीचे देखील काढता येते.
FAQ’S for Sukanya Samruddhi Yojana
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत विचारली जाणारी काही प्रश्न
सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana कमीत कमी किती रक्कम भरता येऊ शकते ?
या योजने अंतर्गत दरवर्षी कमी कमी २५०/- रुपये भरावे लागतात.
सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त किती रक्कम भरता येऊ शकते ?
या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये भरता येतात.
या योजनेत ठेविचा कालावधी किती ?
सुकन्या समृद्धी योजनेत २१ वर्षाचा कालावधी आहे.
सुकन्या समृद्धी योजनेच्या खत्यातून आपली जमा रक्कम कधी काढता येते?
मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय यातून पैसे काढता येत नाहीत मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा तिला जर कोणती आरोग्य समस्या निर्माण झाली असेल तर तुमच्या जमा रक्कमेतुन फक्त ५० टक्के रक्कम तुम्हाला काढता येते.
जर मधूनच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद पडले तर किती दंड भरावा लागतो ?
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद पडले तर तुम्हाला दरवर्षी ५०/- रुपये दंड आकरला जातो.