Udyogini Yojana : केंद्र सरकारची उद्योगिनी योजना
Udyogini Yojana in marathi : सरकारने महिलांना व्यवसाय क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कुठल्याही गॅरेंटी शिवाय 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. याद्वारे महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
महिलांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून विविध जनकल्याणकारी योजना राबवत आहेत. यामधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे उद्योगिनी योजना. या अंतर्गत केंद्र सरकारद्वारे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 ते 3 लाख रुपये पर्यंतचे विना गॅरंटी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. चला जाणून घेऊया.. या योजनेचा लाभ कुठल्या महिलांना मिळतो? यासाठी कुठल्या महिला पात्र आहेत? आणि अर्ज प्रक्रिया काय आहे?
उद्योगिनी योजना म्हणजे काय?
ही योजना प्रथम कर्नाटक सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने पण ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक आत्मनिर्भर बनवण्यासाठी 1 ते 3 लाख रुपये पर्यंतचे विना गॅरंटी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. याद्वारे महिला ब्युटी पार्लर, शिलाई किंवा अन्य कुठलाही व्यवसाय सुरू करू शकतात.
काय आहे पात्रता?
18 ते 55 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला कुठल्याही बँकेची कर्ज डिफॉल्टर नसली पाहिजे.
महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा कमी असावे.
जर महिला विधवा किंवा अपंग असेल तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाहिले जाणार नाही.
किती मिळते कर्ज?
उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी 1 ते 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिले जाते. यामुळे महिला आत्मनिर्भर होण्यास मदत होते. जर तुम्हीही या योजनेअंतर्गत लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर तुम्हीही उद्योगिनी योजनेअंतर्गत अर्ज करून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा असलेला व्यवसाय वाढवू शकता.
उद्योगिनी योजनेसाठीची कागदपत्रे
पासपोर्ट आकाराचा फोटो.
आधार कार्ड.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
प्रोजेक्ट रिपोर्ट.
जातीचे प्रमाणपत्र.
प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र.
असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळच्या बँक मध्ये जाऊन किंवा myscheme.gov.in पोर्टल वर जाऊनही अर्ज करू शकता. यापूर्वी ही योजना केवळ कर्नाटक राज्यातील महिलांसाठीच सुरू करण्यात आली होती. मात्र आता देशभरातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
जर तुम्हीही महिला आहात आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू किंवा वाढू इच्छित असाल तर या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला विना गॅरंटी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. याबरोबरच तुम्हाला अनुदानाचा लाभही मिळू शकतो.