Vehicle Transfer Without NOC Rule : कार, दुचाकी ट्रान्सफर करायची आहे मग NOC ची गरज नाही

Vehicle Transfer Without NOC Rule In Marathi : सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

Vehicle Transfer Without NOC Rule : आपण पाहतो की, जवळपास प्रत्येक नागरिकाजवळ कार किंवा दुचाकी आहे. पण असे काही नागरिक आहेत ज्यांना कार किंवा दुचाकी ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करायची आहे. त्यासाठी NOC ची गरज आहे. दुसऱ्या राज्यात वाहन ट्रान्सफर करायचे असल्यास NOC लागते. आता एनओसी ची गरज लागणार नाही असं सांगण्यात येत आहे.

आधी तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागायचे म्हणजेच एनओसी लागायची यासाठी आरटीओ ऑफिसला जावं लागायचं आणि तिथून एनओसी काढावी लागायची यामध्ये खूप वेळ जायचा. त्यासाठी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Government May Remove NOC Rule आयोगाच्या कमिटीने याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. दोन राज्यांमध्ये वाहन ट्रान्सफर करण्यासाठी NOC ची गरज नाही लागली पाहिजे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय या प्रस्तावावर विचार करत आहेत. जर ही योजना लागू केली तर लाखो वाहनधारकांना फायदा होणार आहे.

वाहन मालकांना जुन्या आरटीओ कडुन एनओसी घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वाहन ट्रान्सफर ची प्रोसेस अगदी सोप्या पद्धतीने होईल.

कार ट्रान्स्फरची प्रोसेस होणार सोपी सध्या जर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतात. सर्वात आधी तुम्हाला राज्याकडून एनओसी मिळवावी लागते. त्यामुळे वाहनावर कोणतेही चलन नाही असे समजते. त्यानंतरच नवीन राज्यात नोंदणी केली जाते. याची गरज नाही आता तुम्हाला एनओसी लागणार नाही.

पोर्टल द्वारे ट्रान्सफर प्रक्रिया सोपी

Vehicle Transfer Without NOC Rule In Marathi

समितीने सुचवले आहे की, वाहनाशी संबंधित सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे. त्यामुळे देशभरातील सर्व वाहनांचा डेटा मिळतो. जर कार वर कोणतेही चलन असेल तर ते तपासण्यास सोपे होईल. यामुळे स्वयंचलित ऑनलाइन क्लियर एनओसी ची जागा घेऊ शकेल.