PPF Scheme marathi : करोडपती बनायचंय.. करा या योजनेत गुंतवणूक

Post office Scheme : करोडपती बनण्यासाठी काय करावे?

Post office Scheme : ही योजना पंधरा वर्षानंतर मॅच्युअर होते जर गुंतवणूकदाराला वाटले की ही योजना पाच -पाच वर्षासाठी वाढवायची आहे तर तो वाढवू शकतो. पब्लिक प्रॉविडेंट फंड योजनेमध्ये आयकर कलम 80c अंतर्गत सूट ही मिळते आणि जेव्हा ही योजना मॅच्युअर होते तेव्हा गॅरंटीने परतावा मिळतो.

Public Provident Fund, PPF Scheme : PPF योजना सामान्य माणसाला गुंतवणुकीद्वारे करोडपती बनण्याची संधी देते. ते कसे त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन समजून घेणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या योजनेअंतर्गत गुंतवणूक करत असतो. तो आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक योजना बनवतो.

अशा स्थितीमध्ये अनेक लोक सुरक्षित गुंतवणूक योजनेच्या शोधात असतात. जर तुम्हीही अशा भविष्यातील योजनेसाठी विचार करत असाल तर तुम्हीही सुरक्षित गुंतवणूक केली पाहिजे. त्यासाठी पीपीएफ योजना तुमच्यासाठी खास आहे.

PPF Scheme marathi : तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवून पब्लिक प्रॉविडेंट फंड योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. ही एक सरकारी योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपये रक्कम जमा करू शकता. पीपीएफ एक सरकारी योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही केवळ 25 वर्षांमध्ये करोडपती बनू शकता.

ही योजना मॅच्युअर व्हायला 15 वर्षे लागतात. जर गुंतवणूकदाराने ठरवले तर तो हा कार्यकाल पाच-पाच वर्षासाठी पुढे वाढू शकतो. पब्लिक प्रॉविडेंट फंड मध्ये आयकर कलम 80 अंतर्गत आयकर सूट ही दिली जाते. आणि जेव्हा ही योजना मॅच्युअर होते तेव्हा गॅरंटीने परतावा तुम्हाला मिळतो. सरकार ही योजना पोस्ट ऑफिस कार्यालय अंतर्गत चालवते. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल…

पब्लिक प्रॉविडेंट फंडचा व्याजदर

पब्लिक प्रॉविडेंट फंड योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या योजनेअंतर्गत व्याजदर किती मिळतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. सध्या पीपीएफ योजनेअंतर्गत वर्षाला 7.10% व्याजदर दिले जाते. हा व्याजदर गेल्या काही वर्षापासून चालू आहे. पब्लिक प्रॉविडेंट फंड योजनेमध्ये खाते उघडून तुम्ही एका वर्षामध्ये कमीत कमी 500 रुपये आणि अधिकाधिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.

PPF गुंतवणुकीवर परतावा किती?

उदाहरणार्थ- एका व्यक्तीने या योजनेअंतर्गत खाते उघडले आहे आणि 15 वर्ष या योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे आणि प्रत्येक महिन्याला साडेसात हजार रुपये गुंतवणूक केली. तर एक वर्षांमध्ये 90 हजार रुपये गुंतवणूक तो करू शकतो. या रकमेवर गुंतवणूकदाराला 7.10% प्रतिवर्ष वार्षिक व्याज मिळते. 15 वर्षे गुंतवणुकीची रक्कम 13500000 होते.

पब्लिक प्रॉविडेंट फंड योजना 15 वर्षामध्ये 10 लाख 90 हजार 926 रुपये व्याज मिळते. अशा स्थितीमध्ये पब्लिक प्रॉविडेंट फंड योजना मॅच्युअर झाल्यावर गुंतवणूकदाराला 24 लाख 40 हजार 936 मिळतील.

करोडपती बनण्यासाठी काय करावे?

PPF Scheme marathi : जर एखादा कमवणारा व्यक्ती वयाच्या 30 व्या वर्षी पीपीएफ खाते उघडतो तसेच हे खाते तीनदा वाढवतो अशा स्थितीमध्ये पीएफ खातेदारक 30 वर्षापर्यंत पीपीएफ खात्यामध्ये गुंतवणूक करू शकतो.

PPF Scheme marathi : समजा गुंतवणूकदाराने आपले पीपीएफ खात्यामध्ये प्रति वर्ष दीड लाख रुपये गुंतवणूक केली तर 30 वर्ष गुंतवणुकीनंतर त्याला पीपीएफ खाते मॅच्युअर झाल्यावरची रक्कम 1,54,50,911 म्हणजेच 1.54 कोटी रुपये मिळते. अशा पद्धतीने तुम्ही पीपीएफ योजनेतून करोडपती होऊ शकता आणि ही योजना सरकारी असल्यामुळे तुम्हाला कोणी फसवण्याची ही शक्यता नाही. तुमचा पैसाही बुडणार नाही, ग्यारंटीने तुम्हाला परतावा मिळेल.