PM Kisan Status : लाभार्थी स्टेटस असे चेक करा
PM Kisan 24th Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 24 व्या हप्त्याची देशभरातील शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. आतापर्यंत पुढील हप्त्याचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांचा खाता मध्ये कधी जमा होणार हे निश्चित झालेले नाही. मात्र यापूर्वी लाभार्थ्यांनी त्यांचे नाव, बेनिफिशियल लिस्ट मध्ये आहे का हे चेक करायला हवे. ते कसे करायचं चला जाणून घेऊया..
PM Kisan 24th Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. आता शेतकऱ्यांना 24व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पुढील हप्त्याचे 2 हजार रुपये त्यांच्या खात्यात कधी जमा होणार या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेले नाही. यासंदर्भात सरकारकडून नोटिफिकेशन समोर आलेले नाही. मात्र पीएम किसान योजनेचा पुढील हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यानी काही गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यामध्ये लाभार्थ्याची लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे का नाही? का तुमचे नाव कट झाले आहे? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्याची यादी कशी करावी चेक?
- तुम्ही या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे ऑनलाइन तपासू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.
- यासाठी तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा, तिथे तुम्हाला बेनिफिशर लिस्ट हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला संपूर्ण पत्ता म्हणजे राज्य, जिल्हा, तालुका, गाव आदीची माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर गेट रिपोर्ट हा पर्याय उघडेल.
- जसे तुम्ही त्यावर क्लिक कराल तसे तुमच्या समोर तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी तुम्हाला दिसेल.
- या यादीमध्ये तुम्ही तपासू शकता की लाभार्थ्याच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही.
लाभार्थ्याच्या यादीत नाव नसेल तर काय करावे?
PM Kisan beneficiary status
- लाभार्थ्याच्या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर सर्वात प्रथम तुम्ही तुमचे नाव का कमी करण्यात आले आहे याचे कारण शोधा. तुम्ही चेक करा की तुमची e-KYC झाली आहे का? आधार बँक लिंकिंग सारखे आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा नाही. याव्यतिरिक्त तुम्ही बँक अकाउंट आणि बँकेत जाऊनही माहिती मिळू शकता.
- PM Kisan 24th Installment : नावाची स्पेलिंग किंवा जन्मतारीख यामध्ये काही चूक झाली आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सर्व आवश्यक माहिती योग्य भरली आहे तर तुम्ही पीएम किसानच्या हेल्पलाइन नंबर 155261 यावर फोन करू शकता किंवा ग्रामपंचायत किंवा जवळच्या कृषी विभागातील अधिकाऱ्याकडे याची तक्रार करू शकता.
- आता पुढील हप्ता कधी जमा होणार याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही प्रक्रिया करून घ्या जेणेकरून पुढील हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात कुठल्याही अडचणी विना जमा होऊ शकतील.
हे ही वाचा
Read About : Meri Panchayat App : मेरी पंचायत ॲप कसे डाउनलोड करावे?
Read About : Kisan Vikas Patra Yojana : 1 लाख गुंतवा 2 लाख रुपये मिळवा
website : yojanamazi.com