KCC : 4 टक्के व्याजदराने मिळते शेतकऱ्याला कर्ज
Kisan Credit Card Scheme : शेती आणि शेतकऱ्यांना कधी कुठल्या गोष्टीची आवश्यकता पडेल हे सांगता येत नाही. कधी बी-बियाणे, कधी खते खरेदीसाठी अचानक पैसा लागतो तर कधी ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी किंवा सिंचन उपकरणे दुरुस्तीसाठी किंवा नवीन घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असते.
अशावेळी शेतकऱ्यांना महागडे कर्ज घ्यावे लागते ते सावकारी जाचामध्ये अडकतात, तिथे त्यांना मोठ्या प्रमाणात व्याजदर द्यावे लागते, ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे. ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
या कार्डच्याद्वारे शेतकरी अल्प व्याजदरात असलेले कर्ज घेऊ शकतो. या पैशातून तो आपल्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू उपकरणे खरेदी करू शकतो. मात्र केसीसी कार्ड बनवण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी तुम्हाला माहीत असणे खूप आवश्यक आहेत. त्यानंतरच तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा. जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही आणि बँकेत वारंवार चकरा मारण्याची गरज पडणार नाही.
चेक करा पात्रता
किसान क्रेडिट कार्ड बनवण्यात पूर्वी तुम्हाला तुमची पात्रता आणि कागदपत्र तपासून घ्यावे लागतील. हे कार्ड केवळ अशाच लोकांना मिळते ज्यांच्या नावावर शेती योग्य जमीन आहे? जर तुम्ही भाडेतत्त्वावर शेती करत असाल किंवा बटईदार असाल तरीही तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. मात्र यासाठी तुमच्याकडे शेती भाडेतत्त्वावर किंवा बटाईदार असल्याचे एग्रीमेंट केलेले असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी तपासा आवश्यक कागदपत्रे
कागदपत्रांमध्ये तुमच्याकडे तुमच्या जमिनीची सातबारा, तुमचे ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र त्याबरोबरच तुमच्याकडे नुकताच काढलेला एक पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही एखाद्या दुसऱ्या बँकेतून कर्ज घेतले आणि ते तुम्ही फेडले नाही म्हणून डिफॉल्ट असाल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही. तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये डिफॉल्ट असता कामा नये. जर डिफॉल्ट असाल तर कुठल्याही बँकेचा मॅनेजर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड देणार नाही.
एवढा असतो व्याजदर
किसान क्रेडिट कार्डची विशेष बाब म्हणजे या योजनेअंतर्गत स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र या योजनेचे गणित समजून घेणे खूप आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत कर्ज घेतले तर व्याजदर जवळपास नऊ टक्के असतो. मात्र सरकार यावर दोन टक्के अनुदान देते त्यामुळे हे व्याजदर सात टक्क्यावर येते.
4 टक्के व्याजदराने मिळते कर्ज
जर तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर आणि ठरलेल्या तारखेपूर्वी बँकेत परत केले तर सरकार तुम्हाला 3 टक्के अतिरिक्त (एक्स्ट्रा) व्याजदरामध्ये सूट देते. म्हणजेच तुम्हाला केवळ 4 टक्के व्याजदराने किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज मिळते. वेळेवर पैसा परत करण्याचा मोठा फायदा हा आहे की बँक तुमच्या कार्डची क्रेडिट लिमिट पुढील वर्षासाठी वाढवते. जेणेकरून तुम्हाला अधिक कर्ज घेता येते. त्यामुळे या योजनेअंतर्गत तुम्ही वेळेवर कर्ज भरणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला केवळ 4 टक्के व्याजदराने शेतीसाठी कर्ज मिळेल.
किती मिळते कर्ज?
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत Kisan Credit Card Scheme शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेत कर्ज किती द्यायचे हे वित्त पुरवठ्याचे प्रमाण, जमीन लागवड खर्च आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चावर अवलंबून असते.
यावर्षीच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कर्जाच्या कमाल मर्यादा वाढवून 3 लाखांवरून 5 लाखापर्यंत केली आहे. हे दोन लाखांचे कर्ज तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळते.