PMJDY : जनधन अंतर्गत 59.09 कोटी खाते उघडली
PM Jan Dhan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला आज बारा वर्षे पूर्ण झाली. PMJDY च्या बारा वर्षाच्या प्रवासात देशात आर्थिक परिवर्तन दिसून आले. या योजनेच्या अंतर्गत देशभरात 59.09 कोटी खाते उघडण्यात आली तर या खात्यामध्ये 3.17 कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेमध्ये 56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निमशहरी भागातील आहेत.
देशभरातील डिजिटल पेमेंट आणि आर्थिक सुरक्षिततेपर्यंत पोहोच विस्तारली आहे. या योजनेअंतर्गत 41 कोटीहून अधिक रुपये कार्ड जारी करण्यात आले आहेत. जनधन – आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीमुळे वंचित घटकापर्यंत कल्याणकारी योजनांचे लाभ थेट पारदर्शक आणि तत्काळ पोहोचण्यात मदत झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली.
या योजनेला आज बघता बघता बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे आज प्रत्येकाचे बँक खाते उपलब्ध आहे. आणि त्याच्या खात्यामध्ये काही ना काही रक्कम जमा झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक गरीब बँकेची जोडला गेला आहे. यापूर्वी अनेक नागरिकांचे बँकेत खाते नव्हते किंवा त्यांचा बँकेशी संबंधही नव्हता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनधन योजनेमुळे अनेकांची बँक खाते उघडली आणि ते थेट बँकेची जोडले गेले. यामुळे सरकारला त्यांना मदत करताना कुठलीही अडचण आली नाही ते थेट त्या नागरिकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करत आहेत. यामुळे नागरिकांनाही सरकारी योजनेचा थेट लाभ मिळत आहे आणि यामुळे पारदर्शकता वाढली आहे.
देशभरातील आर्थिक दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना महत्त्वाची ठरली आहे. या योजनेतून बँकिंग सेवा पासून वंचित असलेल्या व्यक्तींना खाते उघडण्यास मदत झाली आहे. प्रत्येक खात्यासोबत मोफत रुपये कार्ड दिले गेले ज्यामुळे 2 लाख रुपयापर्यंत अपघात विमा संरक्षण मिळाले.
यामुळे डिजिटल व्यवहार आर्थिक सुरक्षितेला प्रोत्साहन मिळत गेले. त्याबरोबरच या खातेधारक दहा हजार रुपयांच्या कर्ज सुविधासाठी ही पात्र झाले. ज्यामुळे आणीबाणीच्या काळात त्यांना आर्थिक संरक्षण सरकारकडून देण्यात आले.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यासारख्या जन सुरक्षा योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारापर्यंत जीवन विमा आणि अपघात विमा पोहोचण्यासाठी पीएमजेडीवाय खात्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जनधन योजनेअंतर्गत 59 कोटीहून अधिक बँक खाते उघडण्यात आली 3.17 लाख कोटी रुपये या खात्यामध्ये जमा रक्कम आहे तसेच 41.29 कोटी मोफत रुपये कार्ड जारी करण्यात आले. यामुळे आर्थिक क्षेत्रातील परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून या योजनेकडे पाहिले जात आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत बँकिंग सेवेचा लाभ या योजनेमुळे मिळाला.
PMJDY अंतर्गत 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागामध्ये उघडण्यात आली आहे तर सुमारे 56% खाते महिलांची आहेत. यावरून या योजनेचे प्राधान्य स्पष्ट दिसते. देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या वंचितांना आर्थिक व्यवस्थेची जोडण्याचे काम जनधन योजनेने केले आहे. पीएमजेडीवायने लाखो लोकांना समाजातील उपेक्षित घटकांना बँकिंग आणि आर्थिक सेवेचा लाभ मिळवून देण्यास मदत केली आहे.
आता बँक खाते असल्यामुळे सामान्य नागरिकांना विमा पेन्शन सुरक्षा मिळणे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या व्यापक मोहिमांमुळे बँकांची व्याप्ती वाढली आहे. ज्यांना आर्थिक गरज आहे अशा लोकांपर्यंत विमा पेन्शन सरकारच्या विविध योजनांचा लाभ या जनधन खात्या द्वारे देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री जनधन योजना केंद्रस्थानी असल्याने जनधन- आधार- मोबाईल ही त्रिसूत्री आर्थिक मदत कोणत्याही गळतीशिवाय थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी ठरली आहे. या माध्यमातून सरकारने मध्यस्थ विलंब दूर करून वंचित व्यक्तीला बँक खात्याशी जोडले आहे.
PMJDY अंतर्गत 59.9 कोटी खाते उघडले.
19 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार PMJDY खात्यांची एकूण संख्या 59.9 कोटी इतकी आहे. जनधन खात्यापैकी 55.60%(32.92 कोटी) महिला आहेत आणि 77.8%(45.95कोटी) जनधन खाती ग्रामीण व निम-शहरी भागातील आहेत.
जनधन खात्यामधील जमा रक्कम 3.17 कोटी रुपये आहे.
पीएमजेडीवाय खात्यांमधील एकूण जमा रक्कम 3,16,514 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये (ऑगस्ट 2015 ते ऑगस्ट 2026) जमा रकमेत सुमारे 12.8 पट वाढ झाली आहे, तर खात्यांच्या संख्येत 2.3 पट वाढ झाली आहे.
प्रति पीएमजेडीवाय खाते सरासरी जमा रक्कम – 5,356 (19 ऑगस्ट 2026 रोजी)
19 ऑगस्ट 2026 रोजी रोजी प्रति खाते सरासरी जमा रक्कम ₹5,356 इतकी आहे. गेल्या 12 वर्षांत (ऑगस्ट 2015 ते ऑगस्ट 2026) प्रति खाते सरासरी जमा रकमेत 3.4 पट वाढ झाली आहे. सरासरी रकमेतील ही वाढ खात्यांचा वाढलेला वापर आणि खातेधारकांमध्ये रुजलेली बचतीची सवय यांचे आणखी एक निदर्शक आहे.
पीएमजेडीवाय खातेधारकांना जारी केलेली रूपे (RuPay) कार्डे: 41.29 कोटी (19 ऑगस्ट 2026 पर्यंत)
पीएमजेडीवाय खातेधारकांना 41.29 कोटी रूपे कार्डे जारी करण्यात आली आहेत. कालौघात रूपे कार्डांची संख्या आणि त्यांचा वापर यात वाढ झाली आहे.