Agri-Voltaics Policy India 2026 in marathi : शेतकरी होणार मालामाल

What Is the Agri-Voltaics Policy? : शेतकऱ्यांना शेतीसोबत वीज निर्मितीतूनही कमाईची संधी

Agri-Voltaics Policy India 2026 in marathi : आता शेतकऱ्यांना शेतातून अन्नधान्याबरोबरच विज निर्मितीही करता येणार आहे. यासाठी केंद्र सरकाने ॲग्रीव्होल्टेईक्स धोरण आणले आहे. देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. यादृष्टीने शेतकऱ्यांना उर्जा क्षेत्रात सक्षक करण्यासाठी ॲग्रीव्होल्टेईक्स म्हणजेच कृषी सौरऊर्जा धोरणाचा मसुदा सरकारकडून तयार करण्यात येत आहे. अशी माहिती नवी दिल्लीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्र्रल्हाद जोशी यांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, देशभरातील १६ कोटी हेक्टर शेतजमिनीपैकी ३० टक्के जमीन अशा सौर प्रकल्पांसाठी योग्य असून शेतकऱ्यांच्या शेतात उंच खांबांवर सौर पॅनेल बसवून खाली पिके घेतली जातील. यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनासोबतच सौरऊर्जा निर्मितीही करता येईल. तसेच यामुळे सौर ऊर्जासाठी जमिनीचा तुटवडा जाणवणार नाही. केंद्र सरकारच्या ॲग्रीव्होल्टेईक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन्ही बाजूने उत्पन्न मिळेल. पिकांच्या उत्पादनासोबतच विजेच्या विक्रीतूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळेल.

ॲग्रीव्होल्टेईक्सची या राज्यात ५० टक्के क्षमता

What Is the Agri-Voltaics Policy? : कृषी सौर उर्जामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या सहा राज्यात ॲग्रीव्होल्टेईक्सची ५० टक्के क्षमता आहे. जगभरत या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. आता भारतानेही हे तंत्रज्ञान वापरास वेगाने सुरूवात केली आहे. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. हा सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी पारंपारिक प्रकल्पांपेक्षा ३० टक्के खर्च अधिक येतो.

Agri-Voltaics Policy India 2026 in marathi : ॲग्रीव्होल्टेईक्स अर्थात कृषी सौरऊर्जा धोरणाच्या माध्यमातून शेती आणि सौर वीज निर्मिती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो. या तंत्रज्ञानात शेतजमिनीवर उंचावर सौर पॅनेल बसवून त्याच जमिनीवर शेतीही करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

या धोरणाच्या मसुद्यात सौर ऊर्जा निर्मिती वाढवणे, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे यांसारख्या बाबींवर भर दिला जाण्याची शक्यता आहे.

काय आहे सरकारचे नियोजन?

५ गिगावॅटचे लक्ष्य : सुरुवातीच्या टप्प्यात देशात ५ गिगावॅट सौर वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

पीएम कुसुम २.० योजना : या नव्या योजनेअंतर्गत १० गिगावॅट क्षमतेचे विशेष कृषी सौर घटक समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. यामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदानाचा लाभ मिळण्यास मदत होऊ शकते.

जर्मनीचे सहकार्य : या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि संयुक्त संशोधनासाठी जर्मनी भारताला सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित होण्याची शक्यता आहे.

या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा

Key Benefits of Solar Farming for Farmers

१. पिकांचे संरक्षण आणि पाण्याची बचत : उंचावर बसवलेले सौर पॅनेल काही पिकांना तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण देऊ शकतात. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यास मदत होऊ शकते.

२. सौर ऊर्जेतून अतिरिक्त उत्पन्न : शेतकरी सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती करून, संबंधित नियम आणि उपलब्ध वीज खरेदी व्यवस्थेनुसार अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.

३. शेती आणि सौर ऊर्जा एकत्र : सौर पॅनेलच्या सावलीत योग्य नियोजन करून काही भाजीपाला, औषधी वनस्पती तसेच हळद आणि आले यांसारखी पिके घेण्याची संधी मिळू शकते. मात्र, कोणते पीक योग्य ठरेल हे पिकाची सूर्यप्रकाशाची गरज, पॅनेलमधील अंतर आणि स्थानिक हवामान यांवर अवलंबून असेल.

अशा प्रकारे, कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा आणि पारंपरिक शेती यांची सांगड घातल्यास शेतकऱ्यांना वीज निर्मितीबरोबरच शेतीतून उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

ॲग्रीव्होल्टेईक्स धोरणाच्या मसुद्यातील मुख्य फायदे

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : शेती आणि वीज निर्मिती यांचा समन्वय साधून जमिनीचा अधिक कार्यक्षम वापर करता येईल.

शेतीसोबत वीज निर्मिती : एकाच शेतजमिनीवर शेती आणि सौर ऊर्जा निर्मिती करता येईल.

शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्न : शेतीतील उत्पादनासोबत सौर वीज विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी.

पाण्याची बचत : योग्य अंतरावर बसवलेल्या सौर पॅनेलमुळे काही पिकांमधील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होऊ शकते.

पिकांचे संरक्षण : उंच सौर पॅनेलमुळे काही पिकांना तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून संरक्षण मिळू शकते.

सावलीत येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन : योग्य नियोजनातून काही भाजीपाला, औषधी वनस्पती, हळद आणि आले यांसारखी पिके घेण्याची संधी.

सौर ऊर्जेला चालना : कृषी क्षेत्रात स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत.

अनुदानाची शक्यता : प्रस्तावित योजनेच्या अंतिम नियमांनुसार पात्र शेतकऱ्यांना सौर प्रकल्पांसाठी आर्थिक मदत मिळू शकते.

Read About : Meri Panchayat App : मेरी पंचायत ॲप कसे डाउनलोड करावे?
Read About : Kisan Vikas Patra Yojana : 1 लाख गुंतवा 2 लाख रुपये मिळवा
Read About : PMFME Scheme In Marathi : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात संभाजीनगर देशात दुसरे
website : yojanamazi.com