KVP Scheme : केंद्र सरकारची पैसे दुप्पट करणारी भन्नाट योजना
Kisan Vikas Patra Yojana : पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत एकरकमी गुंतवणूक करून ठराविक कालावधीनंतर रक्कम दुप्पट मिळवण्याची संधी; व्याजदर, पात्रता आणि नियम जाणून घ्या.
आपण विविध चित्रपटामध्ये ‘एकचे डबल’ करून देणारे योजना पाहिल्या आहेत. मात्र आता केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अशा प्रकारची एक योजना सुरू केली आहे. तिच्या मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला दुप्पट परतावा मिळतो. चला तर जाणून घेऊया केंद्र सरकारने अशी कुठली योजना सुरू केली आहे ज्यातून तुम्ही 1 लाख रुपये गुंतवून 2 लाख रुपये परतावा मिळवू शकता.
किसान विकास पत्र योजना शेतकऱ्यांसाठी आपली बचत सुरक्षित पद्धतीने वाढवण्यासाठी एक भन्नाट योजना आहे. या योजनेमध्ये 1000 रुपयापासून गुंतवणूक सुरू करता येते आणि 115 महिन्यांमध्ये ही रक्कम दुप्पट होते म्हणजे समजा जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 2 लाख रुपये परत मिळतील. किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्हाला दुप्पट परतावा मिळतो.
जर तुम्हालाही शेतीतून मिळणारे उत्पन्न सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची आहे तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना खूप महत्त्वाची आहे. या योजनेमध्ये शेतकरी 1000 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकतात. विशेष बाब म्हणजे ही योजनेची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम दिली जाते. सध्या किसान विकास पत्र योजनेवर 7.5% वर्षाला व्याज मिळत आहे. विशेष बाब म्हणजे तुम्हाला गरज पडल्यास कर्जासाठीही सिक्युरिटी म्हणून या योजनेचा वापर केला जाऊ शकतो.
किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्ही केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवणूक करता येते. या संदर्भात कुठलीही मर्यादा नाही, तुम्ही कितीही रक्कम या योजनेत जमा करू शकता. दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणारा देशातील प्रत्येक नागरिकच्या नावावर किसान विकास पत्र योजना सुरू करता येते. अल्पवयीन मुलाच्या नावावर त्याचे पालक ही योजना सुरू करू शकतात. या योजनेमध्ये एकदाच पैसे जमा करावे लागतात. निश्चित वेळेसाठी पैसा जमा केल्यावर गुंतवणूकीची रक्कम दुप्पट होते.
1 लाख गुंतवून मिळवा 2 लाख
KVP Scheme : जर तुम्ही किसान विकास पत्र योजनेमध्ये 1 लाख रुपये गुंतवले आणि 115 महिने पर्यंत ही रक्कम खात्यात ठेवली तर मॅच्युरिटी वर तुम्हाला ती रक्कम दुप्पट म्हणजेच 2 लाख रुपये मिळतील म्हणजे 1 लाख गुंतवणूकी व्यतिरिक्त तुम्हाला एक लाख रुपये रक्कम मिळेल. या पद्धतीने तुम्ही जर दोन लाख गुंतवले तर तुम्हाला 115 महिन्यानंतर चार लाख मिळतील. मात्र हा हिशोब सध्याच्या 7.5% व्याजदरावर आणि मॅच्युरिटी नियमाच्या आधारावर निश्चित करण्यात आला आहे. वेळेपूर्वी जर खाते बंद केले तर रक्कम कमी होऊ शकते.
टॅक्स मध्ये नाही मिळणार 80c ची सूट
किसान विकास पत्र योजनेवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लागू असतो. याबरोबरच यामध्ये केलेली गुंतवणूक आयकरच्या कलम 80c अंतर्गत आयकर सूट मिळत नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
किसान विकास पत्र योजना केवळ मॅच्युरिटी पर्यंत ठेवणे आवश्यक नाही जर तुम्हाला अचानक पैशाची गरज पडली तर तुम्ही काही नियमांतर्गत किसान विकास पत्र बँकच्या अधिकृत संस्थेकडे जमा करून कर्ज घेऊ शकता. यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये आवश्यक अर्ज जमा करणे आवश्यक आहे आणि संबंधित बँक किंवा संस्थाची मंजुरी घेणे ही आवश्यक आहे.
या स्थितीमध्ये बंद होऊ शकते खाते
किसान विकास पत्र योजना मॅच्युरिटी पर्यंत बंद करता येत नाही. मात्र खातेधारकाचा मृत्यू न्यायालयाचे आदेश किंवा काही वेगळ्या परिस्थितीमुळे बंद करण्याची परवानगी मिळू शकते. जर किसान विकास पत्र योजनेला अडीच वर्षे झाली असतील तर नियमानुसार बंद केल्यास व्याजासह रक्कम मिळू शकते. यापूर्वी बंद केल्यास परताव्याचे नियम वेगळे असू शकतात.
दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होऊ शकते ट्रान्सफर
काही विशेष परिस्थितीमध्ये किसान विकास पत्र योजना दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरही ट्रान्सफर होऊ शकते. जर किसान विकास पत्र संयुक्त खाते असेल तर यामध्ये अधिक तर तीन लोक खातेधारक असू शकतात. गुंतवणूक करतेवेळी नॉमिनीचे नाव नोंदणी करणे आहे. यामुळे खातेधारकाचा मृत्यू झाल्यास रक्कम घेण्यासाठीची प्रक्रिया सोपी होऊ शकते.
किसान विकास पत्र योजनेचे फायदे
- ही योजना गुंतवणुकीवर वार्षिक 7.5 टक्के चक्रवाढ व्याज दर देते.
- 115 महिन्यांत (9 वर्षे आणि 7 महिने) गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होते.
- ठेवीची कमाल मर्यादा नाही.
- टपाल कार्यालये आणि अधिकृत बँकांमध्ये खाती उघडता येतात.
- के. व्ही. पी. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका टपाल कार्यालयातून दुसऱ्या टपाल कार्यालयात हस्तांतरित केले जाऊ शकते.
- के. व्ही. पी. ला गुंतवणुकीच्या तारखेपासून अडीच वर्षांनंतर निर्दिष्ट दरांवर रोख केले जाऊ शकते.
किसान विकास पत्र योजनेची पात्रता
- भारतातील रहिवासी असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक/पालक गुंतवणूक करू शकतात.
- अल्पवयीन मुलांचे किमान वय 10 वर्षे असावे
किसान विकास पत्र योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
- पारपत्र आकाराचे छायाचित्र
- आधार कार्ड
- पॅन कार्डची प्रत
- वयाचा पुरावा म्हणजे जन्म प्रमाणपत्र
- ओळख आणि पत्त्याच्या पुराव्याच्या उद्देशाने खालील कागदपत्रे अधिकृतपणे वैध कागदपत्रे म्हणून स्वीकारली जातातः
- पारपत्र
- वाहन चालवण्याचा परवाना
- मतदार ओळखपत्र
Read About : PM Kaushal Vikas Yojana 2024 in Marathi : बेरोजगार तरुणांसाठी व्यवसायाची सुवर्णसंधी
website : yojanamazi.com