ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू?, ऑक्टोबर हप्ता कधी मिळणार?
Ladki Bahin Yojana eKYC 2026 : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. आजपासून ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ सुरू ठेवण्यासाठी ekyc प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
ladki-bahin-yojana-ekyc-1500-installment-update आता आजपासून केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. मात्र ओटीपी येत नसल्याने अनेक लाडक्या बहिणीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तर दुसरीकडे अद्याप आक्टोंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही. याची प्रतीक्षा पात्र लाभार्थी बहिणी करत आहेत. ऑक्टोबरचा हप्ता आता कधी मिळणार? यासंदर्भात कुठलेही अधिकृत तारीख किंवा माहिती समोर आलेली नाही.
राज्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत सरकारकडून करण्यात येते. मात्र या योजनेचा लाभ योग्य महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी ई- केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या महिलांनी अद्याप आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांचा लाभ थांबू शकतो.
ई-केवायसी प्रक्रिया करत असताना आवश्यक माहिती काळजीपूर्वक पाहून भरावी. ज्यामध्ये आधार कार्ड, आधार कार्ड नंबर बँक, डिटेल्स इत्यादी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा आणि अर्ज करत असताना आणि ई केवायसी करत असताना कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्या.
ई-केवायसी प्रक्रिया जरी सुरू करण्यात आली असली तरीही अधिकृत वेबसाईटवर काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे महिलांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे. ई- केवायसी करण्यासाठी अनेक महिला अधिकृत वेबसाईटवर जात आहेत. त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकत आहेत आणि नोंदणी करता मोबाईलवर ओटीपी पाठवला जात आहे. मात्र महिलांच्या मोबाईलवर ओटीपी मिळत नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यास महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पहिल्या दिवशी ई- केवायसी करण्यासाठी महिलांनी वेबसाईटवर गर्दी केल्यामुळे सर्वर डाऊन झाल्याचे प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. त्यामुळे वेबसाईट संथ गतीने सुरू असून काही वेळा ती व्यवस्थित उघडत नसल्याचे सांगितले जात आहे. या समस्येचा सर्वाधिक सामना ग्रामीण भागातील महिलांना करावा लागत आहे. कारण सीएससी केंद्रासाठी अनेक ग्रामीण महिलांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर शहराच्या ठिकाणी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया करावी लागते.
राज्यातील अनेक महिला केवायसी प्रक्रिया करण्यासाठी जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जात आहे. मात्र वेबसाईटवरून ओटीपी येत नसल्याने त्यांची केवायसी प्रक्रिया होत नाही. केंद्र चालकांना या समस्येमुळे महिलांना मदत करताना अडचणी येत आहे. महिलाही केवायसी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा समस्यांना त्यांना सामोरे जाव लागत आहे.
यामध्ये केवायसी प्रक्रिया तर होत नाही मात्र त्याच्यात त्यांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेबसाईटवरील समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी लाडक्या बहिणीकडून केली जात आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
e-KYC करताना काय करावे?
e-KYC प्रक्रियेसाठी साधारणपणे पुढील माहिती आवश्यक असते.
- लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक.
- आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक.
- OTP द्वारे आधार प्रमाणीकरण.
- आवश्यकतेनुसार पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी.
महिलांनी ही काळजी घ्यावी ; Ladki Bahin eKYC OTP problem
- OTP येत नसल्यास काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
- अनोळखी WhatsApp लिंकवर आधार क्रमांक देऊ नका.
- e-KYC पूर्ण झाल्याचा संदेश मिळाल्यास त्याची खात्री करा.
- नवीन मुदत किंवा प्रक्रियेबाबत शासनाची अधिकृत सूचना तपासा.
ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
Ladki Bahin October installment दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता. मात्र दिवाळी होऊन गेली तरी अजून ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? असा सवाल करत आहेत. मात्र सरकारकडून या संदर्भात अजून कुठलेही अधिकृत माहिती किंवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार हे सांगणे सध्यातरी कठीण आहे.
read about : One Nation One Ration Card in marathi : वन नेशन, वन रेशन कार्डचा मोठा फायदा!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
ABHA कार्ड म्हणजे काय?
website : yojanamazi.com
महत्त्वाच्या बाबी
अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.