किसान विकास पत्र योजनेत 1 कोटी रुपये गुंतवता येतात का? 115 महिन्यांत पैसा डबल, जाणून घ्या नियम
Kisan Vikas Patra Scheme in marathi : पोस्ट ऑफिसची सर्वात भन्नाट योजना म्हणजे KVP किसान विकास पत्र योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करून पैसा डबल करू शकता. या योजनेमध्ये 1 कोटी रुपये गुंतवणूक करता येते का? याचे काय नियम आहेत? पैसा डबल कसा करावा? याची संपूर्ण माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.. यासाठी माहिती संपूर्ण वाचा..
पैसे गुंतवणूक करण्यासाठी लोक सुरक्षित पर्याय निवडतात. जर तुम्हीही अशाच एखाद्या योजनेचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही दीर्घकाळ पैसा गुंतवणूक करून पैसा डबल करू शकता. या सरकारी योजनेमध्ये पैसा गुंतवण्यावर तुम्हाला निश्चित व्याजदर मिळत राहील. एवढेच नाही तर या योजनेत किती रक्कम गुंतवता येईल याचीही कुठलीही मर्यादा नाही. तुम्ही कितीही रक्कम योजनेत गुंतवू शकता.
किसान विकास पत्र पोस्ट ऑफिसची सरकारी बचत योजना आहे. यामध्ये आक्टोंबर ते डिसेंबर 2026 या तिमाही मध्ये वर्षाला 7.5% व्याजदर दिला जात आहे. या योजनेमध्ये व्याज वर्षाला चक्रवर्ती आधारावर आहे म्हणजेच प्रत्येक वर्षी मिळणारे व्याज कमी अधिक होत असते.
या व्याजाच्या दृष्टिकोनातून किसान विकास पत्र गुंतवणुकीची रक्कम 115 महिने म्हणजेच जवळपास 9 वर्ष आणि 7 महिन्यामध्ये दुप्पट होणार आहे म्हणजे जर तुम्ही 115 महिन्यासाठी गुंतवणूक केली आहे तर तुमचा पैसा डबल होणार आहे. कुठल्याही रिक्स शिवाय सुरक्षित पैसा तुम्हाला मिळणार आहे.
KVP मध्ये 1 कोटी रुपये गुंतवणूक करता येते?
अशा स्थितीमध्ये तुम्हाला 1 कोटी रुपये गुंतवणूक करता येते का? आणि मॅच्युरिटी वर 2 कोटी रुपये मिळतात का? आज आपण ही गोष्ट ही पाहणार आहोत. होय… किसान विकास पत्र योजनेमध्ये किती रुपये गुंतवणूक करता येते याची कुठलीही मर्यादा नाही. तुम्हाला वाटेल तेवढी रक्कम तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता आणि ती डबल करू शकता.
मात्र या योजनेमध्ये 9 वर्ष 7 महिने तुमची रक्कम अडकून पडणार आहे. त्यामुळे तुम्ही इतर आर्थिक नियोजन करूनच तुम्ही या योजनेत रक्कम जमा करा. कारण दीर्घ काळापर्यंत तुमची रक्कम अडकून राहणार आहे. भविष्यातील खर्चाचा विचार करूनच तुम्ही यामध्ये गुंतवणूक करा जेणेकरून तुमचा पैसा डबल होईल आणि तुम्हाला आधी पैसे काढण्याची आवश्यकता पडणार नाही.
KVP योजनेत टॅक्स नियम
किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला टॅक्स नियमाची माहिती असणे आवश्यक आहे. या योजनेतून मिळणारे व्याज टॅक्सच्या नियमांमध्ये येते आणि मॅच्युरिटी वर मिळणारे पूर्ण रक्कम वर टॅक्स फ्री मानले जात नाही. पण तुमचे उत्पन्न आणि लागू टॅक्स स्लॅबच्या हिशोबाने व्याजावर टॅक्स द्यावा लागू शकतो. त्यामुळे 1 करोड गुंतवणूक वर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल.
kisan vikas patra government scheme पैसा गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारच्या योजना आणि पर्याय उपलब्ध असतात. काही लोक आपला पैसा FD सारख्या योजनेमध्ये गुंतवणूक करतात तर काही लोक रिक्स घेऊन आपला पैसा पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करतात.
kisan vikas patra government scheme doubles your money तसेच पोस्ट ऑफिस द्वारेही अनेक प्रकारच्या सरकारी योजना चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये लोक सुरक्षित गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवत आहेत. पोस्ट ऑफिसच्या ह्या योजना सरकारी योजना असतात. त्यामुळे सर्व योजना सुरक्षित असतात इथे कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही.
हमखास रिटर्न मिळतो
kisan vikas patra आज आम्ही तुम्हाला अशाच पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमचा पैसा डबल करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. आम्ही सांगत आहोत पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र म्हणजे KVP योजनेबद्दल. किसान विकास पत्र ही एक सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केलेली रक्कम 115 महिन्यांमध्ये डबल होते.
किसान विकास पत्र योजना
kisan vikas patra Yojana किसान विकास पत्र योजनेमध्ये लोक गुंतवणूक करून आपला पैसा डबल करू शकतात. या योजनेमध्ये केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते. तर यामध्ये अधिक कर रक्कम किती असावी याची कुठलीही मर्यादा नाही. या योजनेमध्ये 7.5% वर्षाला चक्रवर्ती व्याज मिळते. या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड 115 महिने असतो. मॅच्युरिटी पर्यंत तुम्ही केलेली गुंतवणुकीवर तुम्हाला डबल परतावा मिळतो.
किसान विकास पत्र योजनेमध्ये अर्ज कसा करावा?
kisan vikas patra Yojana Apply किसान विकास पत्र योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. यासाठी तुमच्याकडे ओळख म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो अशा प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. याबरोबरच तुमच्याकडे ऍड्रेस प्रूफ (लाईट बिल रहिवासी प्रमाणपत्र) किंवा पासपोर्ट साईजचा फोटो असणे ही आवश्यक आहे.
read about : One Nation One Ration Card in marathi : वन नेशन, वन रेशन कार्डचा मोठा फायदा!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
ABHA कार्ड म्हणजे काय?
website : yojanamazi.com
अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.