PM Awas Yojana 2026 : नवीन यादीत नाव नाही?

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PM Awas Yojana 2026 : प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. चला जाणून घ्या या योजनेची संपूर्ण माहिती..

PM 2.0 Beneficiary List Check : केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच पीएमएवाय ही एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना केंद्र सरकारने 2015 मध्ये गरीब कुटुंबातील प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या मागास आणि बेघर कुटुंबांना पक्के मजबूत घर उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेचे दोन टप्पे करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G)
प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U / PMAY 2.0)

OnePlus N6x advertise

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजे काय?

PM Awas Yojana, PMAY 2026, PMAY Beneficiary List : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील कच्चे घर असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देणे आहे. या योजनेच्या अंतर्गत लोकांना1,20000 ते 1,30000 रुपये आर्थिक मदत तीन टप्प्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात करण्यात येते. याबरोबरच शौच्छालय बांधण्यासाठीही वेगळे 12000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात.

प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U / PMAY 2.0) काय आहे?

प्रधानमंत्री आवास योजना – शहरीचा मुख्य उद्देश शहरी गरीब, झोपडपट्टीत राहणारे आणि मध्यमवर्गीय (EWS, LIG, आणि MIG) यांना घरे उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत, सरकार गृहकर्जाच्या व्याजावर ₹1.80 लाख पर्यंत व्याज अनुदान देते.

https://link.amazon/B02iCR3Lo

प्रधानमंत्री आवास योजना शहरी यादी (PMAY-U) कशी तपासावी

  • सर्वप्रथम, pmaymis.gov.in या अधिकृत PMAY वेबसाइटला भेट द्या.
  • ‘लाभार्थी शोधा’ (Search Beneficiary) ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘नावाने शोधा’ (Search by Name) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या नावाची पहिली तीन अक्षरे टाईप करा आणि नंतर ‘दाखवा’ (Show) बटणावर क्लिक करा.
  • यामुळे तुम्ही यादीत समाविष्ट आहात की नाही हे कळेल.
  • तुमचे नाव आणि इतर माहिती शोधण्यासाठी PMAY शहरी यादी तपासा.
  • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी (PMAY-G) कशी तपासावी
    सर्वप्रथम, pmaymis.gov.in या अधिकृत PMAY-ग्रामीण वेबसाइटला भेट द्या.
  • तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसला तरीही, तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता.
  • नोंदणी क्रमांकाशिवाय तपासण्यासाठी, ‘ॲडव्हान्स्ड सर्च’ (Advanced Search) बटणावर क्लिक करा.
  • जर तुमचे नाव यादीत असेल, तर तुम्ही माहिती पाहू शकता.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम, PMAY-U 2.0 पोर्टलवर जा.
  • ‘Apply for PMAY-U 2.0’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला पात्र उमेदवारांची पात्रता यादी दाखवली जाईल.
  • सूचना काळजीपूर्वक वाचा आणि तुमची पात्रता तपासा.
  • जर तुम्ही पात्र असाल, तर तुमचे आधार कार्ड तपासा.
  • तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका आणि तुमच्या फोनवर आलेला OTP सबमिट करा.
  • फॉर्ममध्ये वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, घरखर्च आणि उत्पन्नाचा तपशील, बँक खात्याचा तपशील आणि कर्जाचा तपशील भरा.
  • सर्व माहिती तपासा आणि सबमिट करा.

Read About PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख जाहीर!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
website : yojanamazi.com