Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार सातत्याने विविध योजना राबवत असते. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 55 रुपये भरून वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला 3 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील.
केंद्र सरकारने सुरू केलेली Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana किसान मानधन योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली योजना ठरताना दिसत आहे. वयाची 60 वर्षे झाल्यानंतर अनेक शेतकरी शेतात काम करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र त्यांचे वय झाल्यानंतर त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागू नये म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 हजार रुपये महिना पेन्शन देण्यात येते. जसे की सरकारी कर्मचाऱ्याला रिटायर झाल्यानंतर सरकारी पेन्शन मिळते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही पेन्शन मिळावे या हेतूने ही योजना सरकारने सुरू केली आहे.
आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण किसान मानधन योजना म्हणजे काय किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया काय आहे?, किसान मानधन योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये उद्दिष्टे फायदा, या योजनेसाठी कोण पात्र आहेत? याची संपूर्ण माहिती आपण या योजनेच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.
Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana केंद्र सरकारने देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील सर्व शेतकरी पात्र आहेत. वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यानुसार तुम्हाला या योजनेत प्रीमियम भरावा लागतो. तो प्रीमियम 55 रुपयापासून 200 रुपयापर्यंत आहे. त्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन दिली जाते. मात्र या दरम्यान एखाद्या कारणामुळे संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला निम्मी पेन्शन म्हणजेच पंधराशे रुपये दिले जातात.
देशातील शेतकऱ्यांसाठी PMKMY ही योजना 18 ते 40 वर्ष असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी द्वारे व्यवस्थापित पेन्शन फंड अंतर्गत नोंदणी करून लाभार्थी PMKMY या या योजनेचा सदस्य होत आहे. या योजनेचा सभासद झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सन्मान योगदानाच्या तरतुदीसह त्यांच्या वयानुसार पेन्शन मध्ये 55 रुपये ते 200 रुपये पर्यंत मासिक योगदान देणे आवश्यक आहे.
14 नोव्हेंबर 2019 च्या अहवालानुसार देशातील एकूण 18 लाख 29 हजार 469 शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana योजना देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लागू आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या योगदानाचे गुणोत्तर 1:1 आहे. PMKMY योजनेच्या माध्यमातून सरकारचे योगदान हे शेतकऱ्याने केलेल्या मासिक योगदानाच्या बरोबरीचे आहे.
ठळक मुद्दे
प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana 2024 Information In Marathi
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची थोडक्यात माहिती
Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana In Short
प्रधानमंत्री मानधन योजनेचे फायदे
Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana Benefits
प्रधानमंत्री मानधन योजनेचे वैशिष्ट्ये
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Features
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत असा भरावा लागतो प्रीमियम
PM Kisan Maandhan Yojana
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी पात्रता
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Eligibility
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी कोण पात्र नाही
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Documents
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अर्ज प्रक्रिया
PM Kisan Maandhan Yojana Apply
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा ऑनलाइन अर्ज
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Online Apply
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana Application
FAQ’s वारंवार विचारले जाणार प्रश्न
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची थोडक्यात माहिती
Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana In Short
योजनेचे नाव | प्रधानमंत्री किसान मानधन योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू केली | 2019 |
उद्देश | शेतकऱ्यांना वृद्धपकाळात पेन्शन सुरू |
लाभार्थी | देशातील शेतकरी |
पेन्शन रक्कम | 3000 रुपये |
कधी मिळणार लाभ | वयाच्या 60 वर्षानंतर |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://labour.gov.in/pmsym |
प्रधानमंत्री मानधन योजनेचे फायदे
Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana Benefits
- 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतो आणि त्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडत नाही.
- शेतकऱ्यांचा उज्वल भविष्यासाठी नियोजन करून त्यांना सक्षम बनवणे आणि त्यांचे त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा योजनेचा उद्देश आहे.
- मासिक पेन्शन मुळे शेतकऱ्यांचा सामाजिक आर्थिक दर्जा सुधारेल.
- वृद्धकाळात त्यांना उत्पन्नाचा एक हक्काचा सोर्स निर्माण होईल.
- ही योजना शेतकरी वर्गातील असुरक्षित घटकांना लक्ष करते. त्यांचा समान विकास करण्यास मदत करत आहे.
प्रधानमंत्री मानधन योजनेचे वैशिष्ट्ये
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Features
प्रधानमंत्री मानधन योजना Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana ही स्वयंसेवी सहभागाच्या तत्त्वावर आधारित एक योजना आहे.
या योजनेत 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना स्वईच्छेने नाव नोंदणी करता येते.
या योजनेत नोंदणी केल्यानंतर शेतकरी भविष्यासाठी गुंतवणूक करू शकतो. कारण 60 वर्षानंतर त्यांना या योजनेच्या माध्यमातून पेन्शन सुरू होते.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना 60 वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवत आहे.
कृषी शेतकरी मासिक पेन्शन साठी पात्र आहेत. निधीचा हा नियमित प्रवाह सुमित करतो की शेतकरी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतात.
PMKMY या योजनेसाठी शेतकरी आणि सरकार या दोघांकडून समान योगदान देणे आवश्यक आहे. नोंदणी केलेले शेतकरी त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वचनबद्ध आहेत.
अल्पशे योगदान देऊन ते साठवल्यानंतर पेन्शन मिळवू शकतात.
या योजनेत दरम्यान शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला ही पेन्शन रक्कम 50 टक्के मिळवण्याचा अधिकार आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना Pradhan Mantri Kisan Maandhan Yojanaनॉमिनी बेनिफिट संकल्पना मांडली आहे. जेणेकरून शेतकरी 60 वर्षाचा झाल्यानंतर पेन्शन अखंडपणे चालू राहते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबास आर्थिक स्थिरता लाभेल.
या योजनेसाठी नाव नोंदणी ही सोप्या पद्धतीने करता येते.
PMKMY चा प्रीमियमही सुलभ आहे.
नाव नोंदणी प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये ठराविक रक्कम भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत असा भरावा लागतो प्रीमियम
PM Kisan Maandhan Yojana
वय | प्रीमियम |
18 | 55 |
19 | 58 |
20 | 61 |
21 | 64 |
22 | 68 |
23 | 72 |
24 | 76 |
25 | 80 |
26 | 85 |
27 | 90 |
28 | 95 |
29 | 100 |
30 | 105 |
31 | 110 |
32 | 120 |
33 | 130 |
34 | 140 |
35 | 150 |
36 | 160 |
37 | 170 |
38 | 180 |
39 | 190 |
40 | 200 |
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी पात्रता
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Eligibility
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 व्या दरवाजांचे सर्व शेतकरी यासाठी पात्र आहेत.
शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याचे नाव 1 ऑगस्ट 2019 पर्यंत सातबारा उताऱ्यावर असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी कोण पात्र नाही
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana
दोन हेक्टर पेक्षा अधिक जमीन असणारा शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही.
अन्य सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणारा शेतकरीही या योजनेसाठी पात्र नाही.
उच्चार्तिक स्थिती म्हणजे श्रीमंत शेतकरी ही या योजनेसाठी पात्र नाही.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Documents
आधार कार्ड
मतदान कार्ड
जन्म प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
शेतीचे खासरा पत्र
बँक खाते पासबूक
मोबाइल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अर्ज प्रक्रिया
PM Kisan Maandhan Yojana Apply
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो. सर्वप्रथम आपण ऑनलाइन पद्धत बघू
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा ऑनलाइन अर्ज
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana Online Apply
सर्वात प्रथम प्रधानमंत्री मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या https://labour.gov.in/pmsym या वेबसाईटवर जावे लागेल
या वेबसाईटवर तुम्हाला एक अर्ज दिसेल त्यावर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती त्या अर्जावर भरायची आहे
त्यानंतर एक ओटीपी जनरेट करावा लागेल
तो OTP टाकावा त्यानंतर अर्ज सबमिट हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करावे
त्यानंतर तुमची संपूर्ण अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana Application
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदारला सर्वप्रथम जवळील सीएससी केंद्रावर जावे लागेल.
त्यांच्या जवळून प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा फॉर्म घ्या
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा
अर्ज त्यांना परत करा.
आशा पद्धतीने तुम्ही ऑफलाइन अर्ज पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: चाळीस वर्षावरील शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नाव नोंदणी करू शकतात का?
उत्तर: PMKMY योजनेसाठी वयाची 18 ते 40 वर्ष असल्यामुळे चाळीस वर्षावरील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
प्रश्न: योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्याचे साठ वर्षे पूर्ण होण्याआधीच निधन झाल्यास?
उत्तर: PMKMY योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत पेन्शन दिली जाईल.
प्रश्न: पेन्शनची रक्कम कालांतराने वाढते का?
उत्तर: पेन्शनची रक्कम ही निश्चित राहते मात्र सरकारी धोरणात काही बदल झाल्यास यामध्ये वाढ होऊ शकते.
प्रश्न: PMKMY योजनेत नाव नोंदनी केल्यानंतर शेतकरी काम करू शकतात का?
उत्तर: प्रधानमंत्री किसान मानधन योजना नोंदणी केल्यानंतरही शेतकरी शेती विषयक सर्व कामे करू शकतात कारण या योजनेचे उद्दिष्ट त्यांच्या वृद्ध काळामध्ये उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे हा आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA