Sheli Palan Yojana 2024 Information In Marathi : शेळी पालन योजना 2024 मराठी माहिती
Sheli Palan Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये बहुतांश नागरिक पारंपरिक पद्धतीने पशुपालन शेतीला एक जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात.
Sheli Mendhi Palan Yojana पशुपालनामध्ये हे नागरिक शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यासारखे पशु सांभाळून त्यांच्या निघणाऱ्या दुधावरती त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी मध्यमवर्गीय असल्यामुळे अनेकांकडे गाय, म्हैस खरेदीसाठी आवश्यक पैसा नसतो. त्यामुळे ते एक दोन शेळी पाळतात शेळीच्या माध्यमातून ते त्यांच्या दुधाच्या गरजा पूर्ण करतात, तसेच त्यांना शेतीपालन व्यवसायातून लाभ होतो.
महाराष्ट्र राज्यामध्ये शेळी आणि मेंढीपालनामध्ये प्रामुख्याने धनगर समाज अग्रेसर आहे, त्यांच्या तुलनेत इतर समाजातील नागरिक हे तेवढ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्याची पालन करत नाहीत.
Sheli Mendhi Palan Yojana काही शेतकरी मोजक्याच शेळ्या पाळतात, तर काही शेतकरी शेळीपालनाचा व्यवसाय करतात. सध्याच्या आधुनिक काळामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेळी व मेंढी पालनासाठी आर्थिक अनुदान देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत.
Sheli Mendhi Palan Yojana योजनेच्या माध्यमातून शेतकरी व व्यावसायिक आपला शेळी पालनाचा व्यवसाय वाढवू शकतात. शिवाय त्यांना यामध्ये भरपूर अनुदान मिळत असल्यामुळे कमी भांडवलात अधिक पशु त्यांना खरेदी करता येतात. शेळीपालन योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी किंवा इतर नागरिक शेळीपालनाचा व्यवसाय करू इच्छिता त्यांना सरकारद्वारे 75 टक्के अनुदान दिले जाते.
Sheli Palan Yojana Maharashtra महाराष्ट्र सरकारच्या शेळीपालन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 75 टक्के अनुदान रक्कम दिली जाते आणि उर्वरित 25 टक्के रक्कम शेतकऱ्याने भरून शेळ्या विकत घेता येतात. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
राज्यात होणाऱ्या पशुपालनाच्या व्यवसायाला बळकटी देऊन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वयंरोजगारीत करणे हा सरकारचा या पाठीमागील उद्देश आहे किंवा जे नागरिक नवीन आहेत किंवा तरुण वर्ग या व्यवसायामध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ते या योजनेचा माध्यमातून आपला स्वतःचा शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करून भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात.
Sheli Palan Yojana Maharashtra महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून राज्यात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. यासाठी सरकार प्रयत्नशील असते. अशा योजना वर सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदानही दिले जाते. जेणेकरून अनेक तरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आज आपण राज्य सरकारने राज्यात स्वयंरोजगार सुरू करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या अशाच एका योजनेचा संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Sheli Palan Yojana Maharashtra राज्यातील नागरिकांना शेळी, मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेळी व मेंढ्यांची खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये 10 ते 50 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Shelya Mendya Yojana राज्यातील जे तरुण नागरिक स्वतःचा शेळी पालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत आशा सर्व नागरिकांना सरकार कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत आहे. जेणेकरून या माध्यमातून तरुणांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करता येईल. या योजनेच्या माध्यमातून ते लघुउद्योग करून स्वतःचा आर्थिक विकास करतील व राज्यात इतर नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देतील.
Shelya Mendya Yojana आजही राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीसोबतच जोड व्यवसाय म्हणून ते गाय, म्हैस, शेळी पालन करतात परंतु शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध नसतो त्यामुळे ते शेळीपालनाकडे वळत नाहीत किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेळी, मेंढी पालन योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय इच्छुक तरुणांना सरकारच्या वतीने 50 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून तुम्ही तुमचा स्वतःचा शेतीपालनाचा व्यवसाय सुरू करू शकता.
ठळक मुद्दे
शेळी पालन योजना 2024 मराठी माहिती
Sheli Palan Yojana 2024 Information In Marathi
शेळी पालन योजनेची थोडक्यात माहिती
Sheli Mendhi Palan Yojana In Short
शेळी पालन योजनेची वैशिष्ट्ये
Sheli Palan Yojana 2024 Features
शेळी पालन योजनेचा फायदा
Sheli Palan Yojana Benefits
शेळीपालन योजनेचे उद्दिष्ट
Sheli Mendhi Palan Yojana Purpose
शेळीपालन योजना अंतर्गत दिले जाणारे प्राधान्य
Sheli Mendhi Palan Yojana
शेळीपालन कर्ज योजनेचे लाभार्थी
Sheli Palan Yojana 2024 Benefisior
शेळीपालन योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
Sheli Palan Yojana 2024
शेळीपालन योजनेसाठीची पात्रता
Sheli Palan Yojana Eligibility
शेळी पालन कर्ज योजनेच्या अटी व शर्ती
Sheli Palan Yojana Terms And Conditions
शेळी पालन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
Sheli Palan Yojana Documents
शेळी पालन योजनेसाठीची अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
Sheli Mendhi Palan Yojana Online Application
शेळी पालन योजनेसाठीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Sheli Mendhi Palan Yojana Offline Application
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
शेळीपालन योजनेची थोडक्यात माहिती
Sheli Mendhi Palan Yojana In Short
योजनेचे नाव | शेळी मेंढी पालन योजना |
कधी सुरू झाली | 25 मे 2019 |
लाभ काय | 10 ते 50 लाख रुपयांचे कर्ज |
उद्देश | पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी, पशुपालक व अन्य नागरिक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://ahd.maharashtra.gov.in/ |
शेळीपालन योजनेची वैशिष्ट्ये
Sheli Palan Yojana 2024 Features
- महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळीपालन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यामुळे अर्जदार आपल्या घरी बसूनही मोबाईलच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
- अर्जदाराने अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व माहिती वेळोवेळी त्याला प्राप्त होईल. त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.
- या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खाते मध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल.
शेळीपालन योजनेचा फायदा
Sheli Palan Yojana Benefits
- Sheli Palan Yojana योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, पशुपालक नागरिक यांना शेळी, मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- बेरोजगार तरुणांना यामधून स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करता येईल आणि अन्य नागरिकांना रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध होतील.
- राज्यातील बेरोजगारी कमी करण्यास या योजनेचा मोठा फायदा होत आहे.
- राज्याच्या औद्योगिक विकासात शेळी पालन योजना महत्त्वाची ठरत आहे.
- राज्यातील पशुपालकांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील पशुपालकांचा सामाजिक आर्थिक विकास करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा उद्देश आहे.
- या व्यवसायामुळे शेळीचे दूध व लोकर उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत होईल.
- शेतीला जोडधंदा म्हणून जरी शेळी पालन केले तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात यामुळे मोठी वाढ होणार आहे.
शेळी पालन योजनेचे उद्दिष्ट
Sheli Mendhi Palan Yojana Purpose
- राज्यात पशुपालनासाठी प्रोत्साहन देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे.
- पंचायत समिती शेळीपालन योजना समाध्यातूनही तुम्ही शेळी पालन योजना सुरू करू शकता.
- राज्यातील पशुपालकांचे जीवनमान सुधारणे.
- पशुपालकांचा सामाजिक आर्थिक विकास करून त्यांना सक्षम बनवणे.
- पशुपालकांना शेळ्या व मेंढ्यांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या पैशासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत करणे.
- राज्यात दूध आणि मास यांच्या उत्पादनात वाढ करणे.
- बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभा करणे आणि त्यांना आर्थिक विकास करणे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थिती सुधारणे.
- शेळीपालन या पारंपरिकतेला चालना देणे.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
शेळीपालन योजना अंतर्गत दिले जाणारे प्राधान्य
Sheli Mendhi Palan Yojana
- राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पशुपालन प्रशिक्षण घेतले आहे.
- अशा नागरिकांना शेळीपालन अनुदान योजने मध्ये प्राधान्य दिले जाईल.
- राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासही या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येत आहे.
- अल्प व अत्यल्प भूधारक एक हेक्टर पर्यंतचे शेतकरी यांनाही या योजनेत प्राधान्य दिल्या जात आहे.
- अल्पभूधारक एक ते दोन हेक्टर पर्यंत शेतकरी यांनाही या योजनेमध्ये प्राधान्य दिले आहे.
- याबरोबरच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव नोंदणी केलेले) अशा तरुणांना ही या योजनेतून लाभ दिला जातो.
- तसेच राज्यातील महिला बचत गटातील लाभार्थ्यालाही या योजनेत प्राधान्य दिले जाते.
शेळीपालन कर्ज योजनेचे लाभार्थी
Sheli Palan Yojana 2024 Benefisior
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, पशुपालक व सामान्य नागरिक शेळीपालन कर्ज योजनेसाठी पात्र आहेत.
शेळीपालन योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
Sheli Palan Yojana 2024
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शेळी पालन कर्ज योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75 टक्के तर खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी 50% अनुदान देण्यात येत आहे.
शेळीपालन योजनेसाठीची पात्रता
Sheli Palan Yojana Eligibility
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शेळीपालन योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
शेळी पालन कर्ज योजनेच्या अटी व शर्ती
Sheli Palan Yojana Terms And Conditions
- केवळ महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच शेळी पालन योजनेचा लाभ घेता येईल.
- राज्य बाहेरील नागरिकांनी अर्ज केल्यास तो रद्द केला जाईल.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही शेळीपालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- ज्या व्यक्तीला पशुपालन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याकडे स्वतःच्या मालकीची किमान 9000 वर्ग मीटर जमीन असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये 100 शेळ्या व पाच मेंढ्या राहू शकते.
- या योजनेसाठी 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- पशुपालकाकडे शेळ्या, मेंढ्याचे देखभाल व त्याच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी सुविधा असाव्यात.
- शेळ्या, मेंढ्यासाठी लागणारा चारा उगवण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला शेळी किंवा मेंढी पालनाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाते.
- अर्जदार अनुसूचित जाती, जमातीचा असल्यास त्याला अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.
- अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सिलिंग असणे ही गरजेचे आहे.
- अर्जदाराला अर्जासोबत राशन कार्ड वर जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची नावे व त्यांचा आधार नंबर इत्यादी संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
- या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला मिळू शकतो.
शेळी पालन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
Sheli Palan Yojana Documents
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट साईज फोटो
जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
जमिनीचा सातबारा व 8 अ
पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
बँक खात्याची माहिती
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
अर्जदार दिवंगत असेल तर त्या संदर्भाचे प्रमाणपत्र
हमीपत्र
शेळीपालन योजनेसाठीची अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
Sheli Mendhi Palan Yojana Online Application
सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारच्या शेळी पालन योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल यावर शेळी मेंढी पालन योजना अर्ज या पर्यायावर क्लिक करा
आता तुमच्यासमोर या योजनेचा संपूर्ण अर्ज उघडेल
या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा
तसेच या अर्जासोबत मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा
सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज एकदा संपूर्ण तपासून घ्या
अर्ज बरोबर असेल तर तुम्ही तुमच्या समोर असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करू शकता
अशाप्रकारे तुम्ही शेळीपालन योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता
शेळीपालन योजनेसाठीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Sheli Mendhi Palan Yojana Offline Application
महाराष्ट्र सरकारच्या शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जावे लागेल
पशुसंवर्धन विभागात गेल्यानंतर कृषी विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
त्यानंतर अर्ज विचारली संपूर्ण माहिती भरून देत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागतील
त्यानंतर अर्ज पशुसंवर्धन विभागात जमा करावा लागेल
अशा प्रकारे तुमची शेळीपालन योजनेच्या माध्यमातून ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार किती देते अनुदान?
उत्तर: शेळीपालन योजनेसाठी राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीसाठी 75 टक्के तर खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान देते.
प्रश्न: शेळीपालन योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?
उत्तर: शेळीपालन योजनेसाठी महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिक अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रश्न: कोणामार्फत शेळीपालन योजना राबवली जाते?
उत्तर: महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागात अंतर्गत शेळी पालन योजना राबवली जाते.
शेतकरी आपल्या शेतीसोबतही जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करू शकतात
प्रश्न: शेळीपालन योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
उत्तर: शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईनही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊनही किंवा जिल्ह्याच्या कृषी विभागात जाऊनही तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि लाभ घेऊ शकता.
प्रश्न: शेळीपालन योजना सुरू करण्याचा उद्देश काय?
उत्तर: राज्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय सुरू करता येतो. तसेच राज्यातील बेरोजगार तरुणांनाही या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यास करता येतो.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA