Sugarcane Harvester Yojana 2024 Information In Marathi : ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 मराठी माहिती
Sugarcane Harvester Yojana 2024 सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते त्यापैकी आज एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024.
Sugarcane Harvester Yojana 2024 राज्यातील शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या यंत्र खरेदी करण्यासाठी ऊस तोडणी यंत्र किमतीच्या 40% किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढ्या रकमेचे अनुदान सरकारमार्फत देण्यात येते.
Sugarcane Harvester Yojana उसाच्या उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होते. मनुष्यबळ कमी पडल्यामुळे साखर कारखान्यांना ऊस तोडणीची सतत अडचण निर्माण होत असते. त्यामुळे राज्यातील शेतकरी, उद्योजक, सहकारी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेती उत्पादक संस्था या समस्यांचा विचार करून राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना सुरू केली आहे.
Sugarcane Harvester Yojana 2024 In Marathi ऊस तोडणी ही जुन्या पद्धतीने केली जाते. यामुळे जुन्या पद्धतीने ऊस तोडणी करण्यासाठी अनेक मजुरांची आवश्यकता असते आणि त्यासाठी वेळही खूप जातो तसेच खर्च देखील भरपूर लागतो. त्याचबरोबर ऊस तोडणी ही वेळेवर झाली पाहिजे जर ऊस तोडणी साठी उशीर झाला तर साखरेच्या उताऱ्यावर याचा मोठा परिणाम होतो त्यामुळे ऊसाला कमी भाव मिळतो. एवढी मेहनत करूनही शेतकऱ्यांना ऊस तोडणी वेळेवर झाली नाही तर आर्थिक फटका बसतो यासाठी शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे आवश्यक आहे. खाजगी साखर कारखाने ऊस तोडणी साठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करतात. त्यामुळे त्यांना ऊस तोडणी करण्यासाठी वेळही कमी लागतो आणि मजूरही कमी लागतात. ऊस तोडणी यंत्राच्या किमती खूप महाग आहेत. शेतकऱ्यांना तो खर्च परवडत नाही त्यामुळे ऊस तोडणी सारखा मोठ्या समस्या निर्माण करण्यासाठी ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना राज्य सरकारने सुरू केली आहे.
ठळक मुद्दे
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 मराठी माहिती
Sugarcane Harvester Yojana 2024 Information In Marathi
ऊस तोडणी यंत्र योजनेची थोडक्यात माहिती
Sugarcane Harvester Yojana 2024 In Short
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचे उद्दिष्ट
Sugarcane Harvester Yojana Purpose
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची वैशिष्ट्ये
Sugarcane Harvester Yojana Features
ऊस तोडणी यंत्र योजनेचे फायदे
Sugarcane Harvester Yojana Benefits
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचे लाभार्थी
Sugarcane Harvester Yojana Benefisiors
ऊस तोडणी यंत्र योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
Sugarcane Harvester Yojana 2024
या ऊस तोडणी यंत्र योजनेअंतर्गत लागणारे अर्ज शुल्क
Sugarcane Harvester Yojana 2024 In Marathi
ऊस तोडणी यंत्र योजनेअंतर्गत या महत्त्वाच्या गोष्टी
Importance of Sugarcane Harvester Yojana 2024 In Marathi
ऊस तोडणी यंत्र योजनेसाठीची पात्रता
Sugarcane Harvester Yojana Eligibility
ऊस तोडणी यंत्र योजनेची कागदपत्रे
Sugarcane Harvester Yojana Documents
ऊस तोडणी योजने यंत्र अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया
Sugarcane Harvester Yojana Online Apply
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
ऊस तोडणी यंत्र योजनेची थोडक्यात माहिती
Sugarcane Harvester Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना |
कोणी सुरू केली | राज्य सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्रातील वैयक्तिक शेतकरी |
उद्देश | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत पोर्टल | https://mahadbt.maharashtra.gov.in/ |
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचे उद्दिष्ट
Sugarcane Harvester Yojana Purpose
- शेतकऱ्यांना ऊस तोडणी करण्यासाठी कमी वेळ लागणे या योजनेचा उद्देश आहे
- शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन करणे
- राज्यात महाराष्ट्रातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था शेती, शेतकरी उत्पादक संस्था यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
- शेती क्षेत्राचा औद्योगिक विकास करणे हा या योजनेचा उद्देश आहे
- शेतकऱ्यांचा शेती क्षेत्रात विकास व्हावा त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या योजनेचा उद्देश आहे
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची वैशिष्ट्ये
Sugarcane Harvester Yojana Features
- या योजनेचा लाभ ऊस पिकाशी संबंधित महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाईल हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे
- या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल
ऊस तोडणी यंत्र योजनेचे फायदे
Sugarcane Harvester Yojana Benefits
- या अंतर्गत ऊस तोडणी यंत्रणाच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, उत्पादक संस्था यांना अनुदान देण्यात येईल
- शेतकऱ्यांना शेतात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे या योजनेमुळे शक्य होईल
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी मजुरांची आवश्यकता नाही
- या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा औद्योगिक विकास होईल
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचे लाभार्थी
Sugarcane Harvester Yojana Benefisiors
राज्यातील शेतकरी
वैयक्तिक शेतकरी
सहकारी साखर कारखाने
खाजगी साखर कारखाने
समूह गट व सायंसहायता गट
ऊस तोडणी यंत्र योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
Sugarcane Harvester Yojana 2024
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्राच्या एकूण किमतीच्या 40% रक्कम अथवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतके अनुदान देण्यात येईल.
या ऊस तोडणी यंत्र योजनेअंतर्गत लागणारे अर्ज शुल्क
Sugarcane Harvester Yojana 2024 In Marathi
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येईल त्यासाठी अर्जदाराला 23 रुपये म्हणून भरावे लागतील.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट
महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
ऊस तोडणी यंत्र योजनेअंतर्गत या महत्त्वाच्या गोष्टी
Importance of Sugarcane Harvester Yojana 2024 In Marathi
- या योजनेचा लाभ हा उद्योजक, वैयक्तिक शेतकरी यांना एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच घेता येईल.
- शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना एका संस्थेसाठी एकाच ऊस तोडणी यंत्राचे अनुदान दिल्या जाईल
- सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त 3 ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र किमतीचे 40% रक्कम अथवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल एवढे अनुदान देण्यात येईल
- लाभार्थ्याला किमान 20 टक्के स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे
- उर्वरित रक्कम उभारण्याची संपूर्ण जबाबदारी लाभार्थ्याची असेल
- या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राची परिवहन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र योजनेचे नाव, लाभार्थीचे नाव, अनुदान वर्ष, अनुदान रक्कम इत्यादी तपशील कायमस्वरूपी राहील अशा स्वरूपात नोंदविणे आवश्यक आहे
- लाभार्थ्याने मंजूर झालेल्या ऊस तोडणी यंत्रासाठी महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेले कोटेशन व टेस्ट रिपोर्ट याप्रमाणे ऊस तोडणी यंत्र खरेदी करणे आवश्यक राहील
- अर्जाची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थ्यांची निवड ही ऑनलाईन संगणकीय सोडत पद्धतीने केली जाईल
- त्यानंतर लाभार्थ्याला आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात बाबत कळविण्यात येईल
- पूर्वसंमती पत्र मिळाल्या मिळालेल्या लाभार्थ्यांनी पूर्वसंमती पत्र दिलेल्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत ऊस तोडणी यंत्र खरेदी करणे आवश्यक आहे
- यंत्र खरेदी केल्यानंतर अनुदान मागणी करिता ऊस तोडणी यंत्र खरेदीचे बिल, नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी अर्ज केल्याची पावती ही कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी.
ऊस तोडणी यंत्र योजनेसाठीची पात्रता
Sugarcane Harvester Yojana Eligibility
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
- या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल
- महाराष्ट्र बाहेर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे काम केले जाणार आहे त्या कारखान्याचे संमती पत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
- ऊस तोडणी यंत्राचा वापर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी पर्यंत करणे आवश्यक आहे
- केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडून तपासणी झालेल्या ऊस तोडणी यंत्रासाठी या योजनेसाठी अंतर्गत अनुदान मिळेल
- ऊस तोडणी यंत्राची निवड करण्याची जबाबदारी लाभार्थ्याची अथवा संबंधित साखर कारखानदाराची असेल
- ऊस तोडणी यंत्राचा वापर फक्त महाराष्ट्र राज्यातच करणे आवश्यक आहे
- यंत्र खरेदीनंतर ऊस तोडणी यंत्रास काम मिळवण्याची संपूर्ण जबाबदारी यंत्र खरेदी दाराची असेल
- यंत्र चालविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी यंत्र पुरवठा दराची असेल
- अर्जदाराने यापूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या सुरू असलेल्या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीवर अनुदान मिळवले असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर किमान 6 वर्षे तरी विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही
ऊस तोडणी यंत्र योजनेची कागदपत्रे
Sugarcane Harvester Yojana Documents
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ उतारा
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रतिज्ञापत्र
ऊस तोडणी यंत्राचे कोटेशन
बंधपत्र
सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकार्य संस्था, शेती उत्पादक संस्था यांचे बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र व संस्थेचे नावाचे बँक खाते पासबुक झेरॉक्स
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया
Sugarcane Harvester Yojana Online Apply
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल
त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये स्वतःची नोंदणी करावी लागेल
त्यानंतर अर्जदाराला युजरनेम आणि पासवर्ड च्या मदतीने लॉगिन करावे लागेल
लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये शेतकरी योजना यावर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण च्या समोर बाबी निवड वर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल
त्यानंतर जतन करा या पर्यावरण क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर पहिले पेज उघडेल त्यामध्ये अर्ज करा या पर्यावर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये पहा या पर्यावर क्लिक करावे लागेल
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये प्राधान्य क्रम मध्ये 1 निवडून टीक करून अर्ज सादर करा या बटन वर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या बटनवर क्लिक करा
आता तुमच्या समोर पैसे भरण्यासाठी विविध पर्याय दिसतील त्यामधील तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला पैसे भरावे लागतील
त्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी लागेल
अशा प्रकारे तुम्ही ऊस तोडणी यंत्र योजनाची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?
उत्तर: ऊस तोडणी यंत्र खरेदी किमतीच्या 40% रक्कम अथवा 35 लाख रुपये रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तितके अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते.
प्रश्न: ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा कोणाला होतो लाभ?
उत्तर: राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
प्रश्न: ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर: ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA