Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana 2024 Information In Marathi : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना मराठी माहिती
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana 2024 : महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंबेआजही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. त्यांना त्यांचे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही खूप हलाखीची असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येत नाहीत, त्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याची इच्छा असतानाही आर्थिक अडचणीमुळे त्यांना मुलांना शिक्षण देण्यासाठी अडचणी येतात.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने बँकेकडून कर्ज मिळत नाही. सावकाराकडून कर्ज घेण्यासाठी जास्त व्याजदर लागतो, अशा अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो.
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana समाजात आज देखील काही प्रमाणात मुलींना ओझे मानले जाते. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. मुलांप्रमाणे मुलींना महत्त्व दिले जात नाही. मुलींना शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली जात नाही.
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana त्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास होत नाही. त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा विचार करून राज्य सरकारने मुलींना योग्य शिक्षण मिळावे व त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते.
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana राज्यातील मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचीत राहू नयेत. यासाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत असते. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही केंद्र सरकरची योजना मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते.
यातीलच एक योजना म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनोच्या माध्यमातून मुलींना शिक्षण घेण्यासाठी 5 हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. जेणे करून मुली उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील आणि आपल्या पायावर उभ्या राहू शकतील.
ठळक मुद्दे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थ सहाय्य योजना मराठी माहिती
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana 2024 Information In Marathi
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेची थोडक्यात माहिती
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana In Short
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेची उद्दिष्टे
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Purpose
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचे फायदे
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana 2024 In Marathi Benefits
या योजनेचे लाभार्थी
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana 2024 In Marathi
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनअंतर्गत विद्यार्थिनींसाठी महत्त्वाच्या सूचना
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana 2024 In Marathi
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठीची पात्रता
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Eligibility
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठीची कागदपत्रे
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Documents
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेची अर्ज प्रक्रिया
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Apply
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेची थोडक्यात माहिती
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana In Short
योजनेचे नाव | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना |
कोणी सुरू केली | राज्य सरकार |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
लाभार्थी | गरीब कुटुंबातील मुली |
लाभ | मुलींना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत |
शिष्यवृत्ती रक्कम | 5000 रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://bcud.unipune.ac.in/ |

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेची उद्दिष्टे
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Purpose
- आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- या योजनेमुळे मुलींचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होत आहे.
- या योजनेमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
- या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल.
- शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढणे हाही या योजनाचा मुख्य उद्देश आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचे फायदे
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana 2024 In Marathi Benefits
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.
- या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलींना स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होते.
- या योजनेमुळे राज्यातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे.
- या योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्वल होईल.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
या योजनेचे लाभार्थी
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana 2024 In Marathi
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाह्य योजनेत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना होणार आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनअंतर्गत विद्यार्थिनींसाठी महत्त्वाच्या सूचना
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana 2024 In Marathi
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाह्य योजनेसाठी दिलेल्या नियम व अटींची पूर्तता करूनच विद्यार्थ्यांनी अर्ज करावा.
- सरकारच्या अन्य शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ज्या विद्यार्थिनी घेत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत शैक्षणिक गुणांच्या टक्केवारी पेक्षा कमी गुण व एटीकेटी असलेल्या विद्यार्थिनींनी अर्ज करू नये.
- या योजनेसाठी फक्त मुलीच अर्ज करू शकतात.
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा विद्यार्थिनींना संपूर्ण पदवी दरम्यान एकदाच आणि पदव्युत्तर पदवी दरम्यान एकदा असा दिला जातो.
- त्यामुळे ज्या विद्यार्थिनींनी अर्ज करण्यापूर्वी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला असेल अशांनी पुन्हा अर्ज करू नये.
- अर्ज करताना विद्यार्थिनींनी त्यांना मिळालेले गुण हे ग्रेड पॉईंट मध्ये न लिहिता टक्केवारी मध्ये लिहिणे आवश्यक आहे.
- विद्यार्थिनीचे बँक खाते हे राष्ट्रीयकृत बँकेतच असणे आवश्यक आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठीची पात्रता
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Eligibility
- अर्जदार विद्यार्थिनी ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
- केवळ महाराष्ट्रातील मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
- या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच घेता येईल.
- एटीकेटी असलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ हा एकावेळी फक्त एकदाच पदवीयुक्त अभ्यासक्रमासाठी दिला जाईल.
- केंद्र किंवा राज्य सरकारच्या एखाद्या शिष्यवृत्तीचा लाभ जर अर्जदार विद्यार्थिनी घेतला असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार विद्यार्थिनीने जर खोटी माहिती अर्जात भरून देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर तिला या योजनेमधून रद्द करून तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अर्जदार विद्यार्थिनींच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठीची कागदपत्रे
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Documents
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
ईमेल आयडी
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
विद्यार्थिनीचे मागील अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची प्रत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेची अर्ज प्रक्रिया
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Apply
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार विद्यार्थिनी सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज उघडेल. त्यावर New User यावर क्लिक करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
त्यामध्ये Apply For Scholarship यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेचा अर्ज दिसेल.
या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर संपूर्ण अर्ज एकदा तपासून घ्या आणि नंतर सबमिट या बटनवर क्लिक करा.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
प्रश्न : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
उत्तर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना दिला जातो.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना