Kisan Vikas Patra Yojana 2024 Information In Marathi : किसान विकास पत्र योजना 2024 मराठी माहिती
Kisan Vikas Patra Yojana 2024 केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध बचत योजना देशभरात चालल्या जातात. त्याच अनुषंगाने एक गुंतवणुकीची योजना पोस्ट ऑफिस कार्यालयाने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला जातो. या योजनेला किसान विकास पत्र योजना 2024 असे नाव दिले आहे. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याची हमी ही योजना देते. तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी किसान विकास पत्र योजना हा चांगला पर्याय आहे.
Kisan Vikas Patra Yojana 2024 KVP या योजनेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस तुम्हाला 7.5 टक्क्याहून अधिक व्याजदर तुमच्या गुंतवणुकीवर देत आहे. चला तर मग किसान विकास पत्र योजना म्हणजे काय? या योजनेत कोण गुंतवणूक करू शकते याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Kisan Vikas Patra Yojana 2024 कोरोना काळानंतर देशात गुंतवणुकीचे महत्त्व अधिक वाढले आहे. कारण भविष्यात येणाऱ्या अडचणीचा सामना करण्यासाठी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण वेळप्रसंगी अशी गुंतवणूक फायद्याची ठरते. पोस्ट ऑफिसकडून यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला चांगला नफाही दिला जातो. तसेच पोस्ट ऑफिसची ही गुंतवणूक योजना खात्रीची आणि जोखीम न घेता गुंतवणूक करता येते. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दुप्पट परतावा दिला जातो.
किसान विकास पत्र योजना 2024
Kisan Vikas Patra Yojana 2024
Kisan Vikas Patra Yojana KVP पोस्ट ऑफिसने सुरु केलेली किसान विकास पत्र ही एक लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून मोठा नफा गुंतवणूकदारांना दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यात दुप्पट होतात. या योजनेतून तुम्ही शंभरच्या पटीत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करावी लागते. विशेष बाब म्हणजे या योजनेमध्ये कमाल मर्यादा नाही. त्यामुळे तुम्हाला हवी असेल तेवढे पैसे तुम्ही या योजनेत गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता.
Kisan Vikas Patra Yojana KVP या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक किंवा त्यापेक्षा अधिक खाते उघडून गुंतवणूक करता येते. दहा वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलाच्या नावाने ही खाते उघडून गुंतवणूक करता येते. या योजनेच्या माध्यमातून व्यक्ती कितीही खाते उघडू शकत असल्यामुळे गुंतवणूक करण्यास मोठा वाव आहे.
ठळक मुद्दे
किसान विकास पत्र योजना 2024 मराठी
Kisan Vikas Patra Yojana 2024 Information In Marathi
किसान विकास पत्र योजना 2024
Kisan Vikas Patra Yojana 2024
किसान विकास पत्र योजनेतून व्याजदर किती मिळतो?
Kisan Vikas Patra Yojana Interest Rate
5 लाखाची गुंतवणूक 10 लाखाचा परतावा
Kisan Vikas Patra Scheme
सुरक्षित गुंतवणूक, अधिक परतावा
Kisan Vikas Patra Scheme
1000 रुपये पासून करू शकता गुंतवणूक
Kisan Vikas Patra Scheme
115 महिन्यात पैसे होतात दुप्पट
Kisan Vikas Patra Scheme
केव्हीपी खाते उघडण्याची प्रक्रिया
Kisan Vikas Patra Yojana KVP Account Opening Process
किसान विकास प्रमाणपत्र योजनेसाठीची कागदपत्रे
Kisan Vikas Patra Yojana Documents
किसान विकास पत्र योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Kisan Vikas Patra Yojana Apply
किसान विकास पत्र योजनेतून कर लाभ मिळेल की नाही?
किसान विकास पत्र योजनेतून व्याजदर किती मिळतो?
Kisan Vikas Patra Yojana Interest Rate
Kisan Vikas Patra Yojana पोस्ट ऑफिसने सुरु केलेल्या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून व्याजदर तिमाही आधारावर पोस्ट ऑफिस ठरवते. पोस्ट ऑफिसच्या सध्याच्या योजनेत 7.5% व्याज दिले जाते हे व्याजदर वार्षिक दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत पैसे दुप्पट होतात. त्यासाठी गुंतवणूक कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे.
5 लाखाची गुंतवणूक 10 लाखाचा परतावा
Kisan Vikas Patra Scheme
Kisan Vikas Patra Yojana जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटी पर्यंत म्हणजेच 115 महिने या योजनेत पैसे जर ठेवले तर तुम्हाला 7.5 टक्के व्याजाने 5 लाख रुपये मिळतील म्हणजेच गुंतवणूकदारांना मुदतपूर्ती नंतर 10 लाख रुपये एकूण रक्कम परतावा म्हणून मिळेल. त्यामुळे या योजनेतून केलेली गुंतवणूक दाम दुप्पट असेल आणि गुंतवणूकदाराला फायद्याचे ठरेल. ज्या नागरिकांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी किसान विकास पत्र योजना खूप फायद्याची योजना आहे आणि त्यांना चांगला परतावाही मिळेल. KVP या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि कमी वेळामध्ये अधिक फायदा या योजनेतून मिळतो.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
सुरक्षित गुंतवणूक, अधिक परतावा
Kisan Vikas Patra Scheme
Kisan Vikas Patra Scheme प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक आणि सुरक्षित गुंतवणूक करावी असे वाटते, त्या योजनेतून परतावा चांगला मिळावा हाही त्यांचा उद्देश असतो तर तुमच्या अशा गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी योजना म्हणजेच किसान विकास पत्र योजना होय. ही योजना पोस्ट ऑफिस कार्यालयाने छोट्या बचत योजना म्हणून गुंतवणुकीचा चांगला पर्याय नागरिकांना दिली आहे. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेच्या KVP माध्यमातून गुंतवणूकदारास 7.5 टक्के व्याजदर दिला जातो. या योजनेत तुम्ही एक हजारापासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.
1000 रुपये पासून करू शकता गुंतवणूक
Kisan Vikas Patra Scheme
Kisan Vikas Patra Scheme पोस्ट ऑफिस कार्यालयाने सुरू केलेल्या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता तसेच या योजनेत अधिकाधिक गुंतवणुकीचा पर्याय दिला आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम तुम्ही या योजनेत गुंतवू शकता. मात्र तुम्हालाही रक्कम गुंतवताना 100 च्या पटीत गुंतवावी लागेल. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडूनही गुंतवणूक करू शकता तसेच किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून नॉमिनीची सुविधाही देण्यात आली आहे. या योजनेत 10 वर्षापेक्षा अधिक वयाची मुले देखील स्वतःच्या नावाने केव्हीपी खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
115 महिन्यात पैसे होतात दुप्पट
Kisan Vikas Patra Scheme
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून तुमचे पैसे 115 महिन्यात दुप्पट होतात. समजा तुम्ही किसान विकास पत्र योजनेत 115 महिन्यासाठी 1 लाख रुपये गुंतवले तर या कालावधीत ही रक्कम 2 लाख रुपये होईल आणि जर तुम्ही यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10 लाख रुपये परतावा मिळेल म्हणजे तुमची रक्कम दुप्पट होईल. सध्याच्या पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर व्याज चक्रवाढ आधारावर दिले जाते. त्यामुळे तुम्हाला व्याजावरही व्याज पोस्ट ऑफिस देते आणि तुमची रक्कम दुप्पट होते.
Kisan Vikas Patra Yojana पोस्ट ऑफिसच्या या योजनेत यापूर्वी पैसे दुप्पट होण्यासाठी 123 महिने लागायचे मात्र आता सरकारने या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये याचा कालावधी कमी करून 120 महिने केला होता आणि काही महिन्यानंतर अधिक लाभ घेण्यासाठी सरकारने पुन्हा कालावधी कमी करून 115 महिने ठेवला आहे. त्यामुळे 115 महिन्यात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दुप्पट परतावा दिला जातो.
केव्हीपी खाते उघडण्याची प्रक्रिया
Kisan Vikas Patra Yojana KVP Account Opening Process
- पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि खाते उघडण्यासाठी सोपी पद्धत ठेवली आहे.
- पोस्ट ऑफिस मध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल.
- त्यानंतर गुंतवणुकीचे रक्कम चेक, रोख किंवा डिमांड ड्रॉप मध्ये जमा करावे लागते.
- अर्जदाराला अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागते.
- पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही एक छोटी बचत योजना आहे.
- प्रत्येक तीन महिन्यांनी सरकार व्याजदराचा आढावा घेते आणि आवश्यकतेनुसार बदल करत असते.
- किसान विकास पत्र योजनेत कोण गुंतवणूक करण्यास पात्र आहे
- पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- या योजनेत सिंगल अकाउंट व्यतिरिक्त जॉईंट अकाउंटची सुविधा देण्यात आली आहे.
- ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- पालक त्यांच्या नावाने ही खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- किसान विकास पत्र योजनेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक
- पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून 1000 रुपये, 5000 रुपये 10000 रुपये आणि 50 हजार रुपयाची प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत, जी तुम्ही खरेदी करू शकता.
किसान विकास प्रमाणपत्र योजनेसाठीची कागदपत्रे
Kisan Vikas Patra Yojana Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान ओळखपत्र
लायसन
पासपोर्ट आकाराचा फोटो
केव्हीपी अर्ज फॉर्म
रहिवासी प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र
किसान विकास पत्र योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Kisan Vikas Patra Yojana Apply
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म घेऊन खाते उघडू शकता.
तुम्ही या योजनेचा अर्ज ऑनलाईन डाऊनलोड करून संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येतो.
हा अर्ज भरताना तुम्ही नॉमिनीचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता लिहिणे आवश्यक आहे.
अर्जावर खरेदीची रक्कम स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
तुम्ही जर चेक द्वारे पैसे भरत असल्यास तुम्हाला अर्जावर चेक नंबर लिहावा लागेल.
या योजनेच्या माध्यमातून एकल खाते किंवा संयुक्त खाते ही उघडून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
लाभार्थी अर्जदार अल्पवयीन असल्यास त्याची तिची जन्मतारीख, पालकाचे नाव, पालकाचा पत्ता आणि मुलाशी असलेले नाते लिहिणे आवश्यक आहे.
त्यानंतर तुम्ही अर्ज जमा करू शकता.
किसान विकास पत्र योजनेतून कर लाभ मिळेल की नाही?
या योजनेच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफ्याच्या रकमेवर कर भरावा लागेल.
इतर योजना जसे की राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पीपीएफ खात्यावर मिळणारे व्याजदर मुक्त असते. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत दिलेली सुट या योजनेला लागू होत नाही. त्यामुळे तुम्ही केलेली गुंतवणूक आयकाराच्या कक्षेत असेल. मात्र पीपीएफ खाते व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक कलम 80 सी अंतर्गत प्रमुख आहे तसेच बँकेमध्ये 5 वर्षासाठी मुदत ठेवी मध्ये केलेल्या गुंतवणुकीला कलम 80 सी माध्यमातून कर सुट दिली जाते.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA