Subhadra Yojana 2024 Information In Marathi : सुभद्रा योजना 2024 मराठी माहिती
Subhadra Yojana : राज्य आणि केंद्र सरकार मिळून देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असतात. या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब वर्गासाठी, महिलांसाठी, मुलींसाठी अशा विविध योजना राबवल्या जातात. अनेक योजनांच्या माध्यमातून नागरिकांना अनुदान आणि आर्थिक मदत केली जाते. अशाच प्रकारची योग्य योजना सरकारने सुभद्रा योजना नावाने सुरू केली आहे.
Subhadra Yojana चला तर मग आज आपण या लेखाच्या माध्यमातून सुभद्रा योजना म्हणजे काय?, या योजनेचा कोणाला लाभ होतो?, ही योजना कोणासाठी सुरू केली आहे? याची संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहू.
Subhadra Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर 2024 रोजी ओडीसा राज्य सरकारने सुभद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ओडिसा राज्यातील सर्व महिला नागरिक 17 सप्टेंबर 2024 पासून सुभद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या अर्जदारांना 50 हजार रुपये पर्यंत कॅश व्हाउचर देण्यात येणार आहे. ते पुढील दोन वर्षाहून अधिक काळासाठी कॅश करून त्याचा वापर करू शकतात. ओडीसा सरकारने सुरू केलेल्या सुभद्रा योजनेचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. ओडीसा राज्यातील केवळ महिला सुभद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.
Subhadra Yojana 2024 In Marathi ओडिसा सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना सुरू केली आहे. ओडिसा मध्ये भाजप सरकारने महिलांसाठी सुभद्र योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 60 वर्ष वय असणाऱ्या 1 कोटी पेक्षा अधिक महिलांना पुढील 5 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षाला 10 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
Subhadra Yojana ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी विधानसभेमध्ये या योजनेची घोषणा केली आहे आणि ही योजना 17 सप्टेंबर 2024 म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवशी सुरू करण्यात येणार आहे.
Subhadra Yojana या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एकूण 50 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. 2024 -25 ते 2028 -29 पर्यंत ही मदत केली जाईल. म्हणजेच प्रत्येक वर्षाला 10 हजार रुपये 2 टप्प्यात 5-5 हजार रुपये महिलेला दिले जातील. रक्षाबंधन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस या दिवशी ही रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी ओडिसा सरकारने 55 हजार 825 कोटी रुपये चा निधी मंजूर केला आहे.
सुभद्रा योजना म्हणजे काय
What Is Subhadra Yojana 2024 In Marathi
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ओडिसा सरकारने सुभद्रा योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेचा लाभ ओडीसा राज्यातील 1 कोटी अधिक महिलांना होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अर्जदार महिलांना 50 हजार रुपये पर्यंतचे कॅश व्हाउचर दिले जाणार आहेत. हे कॅश व्हाउचर या महिला दोन वर्षाहून अधिक काळासाठी कॅश करू शकतात.
ठळक मुद्दे
सुभद्रा योजना 2024 मराठी माहिती
Subhadra Yojana 2024 Information In Marathi
सुभद्रा योजना म्हणजे काय
What Is Subhadra Yojana 2024 In Marathi
सुभद्रा योजना 2024 ची थोडक्यात माहिती
Subhadra Yojana 2024 In Short
सुभद्रा योजनेची उद्दिष्टे
Subhadra Yojana Purpose
सुभद्रा योजना 2024 ची वैशिष्ट्ये
Subhadra Yojana 2024 Features
सुभद्रा डेबिट कार्ड
Subhadra Yojana Debit Card
सुभद्रा योजनेची पात्रता
Subhadra Yojana Eligibility
सुभद्रा योजनेसाठीची कागदपत्रे
Subhadra Yojana Documents
सुभद्रा योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Subhadra Yojana Online Apply 2024
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सुभद्रा योजना 2024 ची थोडक्यात माहिती
Subhadra Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | सुभद्रा योजना |
कोणी सुरू केली | ओडिसा सरकार |
कधी सुरू केली | 17 सप्टेंबर 2024 |
लाभ | आर्थिक मदत 50000 पर्यंत |
लाभार्थी | ओडिसातील महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://subhadra.odisha.gov.in/ |
सुभद्रा योजनेची उद्दिष्टे
Subhadra Yojana Purpose
- ओडिसा राज्यातील महिलांना सक्षम बनवणे.
- राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
- ओडिसा राज्यातील महिलांना पुढील पाच वर्ष प्रत्येकी वर्षाला 10 हजार रुपये याप्रमाणे 50 हजार रुपयांचे आर्थिक मदत देणे हे सरकारचे मुख्य उद्देश आहे.
- योजनेच्या माध्यमातून महिलांना मदत करून त्या महिलांचे सक्षमीकरण करणे हेही मुख्य उद्दिष्टे आहे.
सुभद्रा योजना 2024 ची वैशिष्ट्ये
Subhadra Yojana 2024 Features
- 17 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ओडीसा सरकारने सुभद्रा योजना सुरू केली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना वार्षिक 10 हजार रुपये दिले जाणार आहेत.
- ही रक्कम महिलांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे दोन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.
- ही योजना ओडीसा सरकार 2024 -25 ते 2028 -29 पर्यंत चालणार आहे.
- या एकूण पाच वर्षाच्या कार्यकाळात महिलांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
- हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातील.
- याबरोबरच महिलांना डेबिट कार्ड देण्यात येणार आहे.
- प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरी संस्था सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणाऱ्या 100 महिलांना 500 रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत.
सुभद्रा डेबिट कार्ड
Subhadra Yojana Debit Card
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना सुभद्रा डेबिट कार्ड ही देण्यात येणार आहे.
- याद्वारे त्या डिजिटल व्यवहार करू शकतील.
- याव्यतिरिक्त सर्वाधिक डिजिटल ट्रांजेक्शन करणाऱ्या 100 महिलांना प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरी भागासाठी 500 रुपये अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे.
- या योजनेचा लाभ महिलांना आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
सुभद्रा योजनेची पात्रता
Subhadra Yojana Eligibility
- ओडिसा राज्यातील 21 ते 60 वर्षा दरम्यानच्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- अर्जदार महिला ओडिशाची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- सरकारी कर्मचारी असलेली महिला या योजनेसाठी पात्र नाही.
- आयकर भरणाऱ्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
- ज्या महिला यापूर्वीपासूनच राज्य सरकारच्या 1500 रुपयांच्या इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
सुभद्रा योजनेसाठीची कागदपत्रे
Subhadra Yojana Documents
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- विज बिल
- ईमेल आयडी
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
सुभद्रा योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Subhadra Yojana Online Apply 2024
- अर्जदार महिलांनी सर्वात प्रथम सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- त्यानंतर अर्जदार महिलेसमोर या योजनेचे होम पेज उघडेल.
- त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमच्या डेस्कटॉप वर एक नवीन पृष्ठ उघडेल त्या त्यावर तुम्हाला अर्ज दिसेल.
- या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर त्यासोबतचे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- हे संपूर्ण झाल्यानंतर एकदा अर्ज तपासून पहा.
- अर्ज तपासून झाल्यावर सर्व माहिती अचूक असल्यास सबमिट या पर्यायाचा क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही सुभद्रा योजनेचा लाभ घेऊ शकता.
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न:- सुभद्रा योजना 2024 साठी कोण आहे पात्र?
उत्तर:- ओडिसा राज्यातील सर्व महिला सुभद्रा योजना 2024 साठी पात्र आहेत.
प्रश्न:- सुभद्रा योजनेद्वारे किती रुपये मदत मिळते?
उत्तर:- सुभद्रा योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या महिलांना 50 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
प्रश्न:- सुभद्रा योजना कोणी सुरू केली?
उत्तर:- ओडिसा सरकारने राज्यातील महिलांसाठी सुभद्रा योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेतून महिला सक्षम करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना
वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजना
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना