Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat : भाऊबीज 2024 संपूर्ण माहिती
Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat : हिंदू सणांमध्ये दिवाळीला विशेष महत्त्व असते. संपूर्ण देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळीतील भाऊबीज ही बहिण भावातील नात्यांसाठी ओळखली जाते या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून साडी किंवा वस्तू देत असतो चला तर मग आपण आज दिवाळीतील भाऊबीज याचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊ आजच्या लेखातून..
Bhau Beej 2024 Celebration दिवाळी हा सण पाच दिवसांचा असतो. यामध्ये भाऊबीज हा शेवटचा दिवस असतो म्हणजेच दिवाळीतील पाचव्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीज या शब्दातच या सणाचा अर्थ दडलेला आहे. भाऊबीज म्हणजे बहीण भावाचे अतूट नाते. बहिण भावाला ओवाळते दिवाळीत लक्ष्मीपूजन, वसुबारस, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाते. पाडवा संपला की विजेच्या चंद्रकलासारखी हसत हसत भाऊबीज येते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आल्यावर भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
Bhau Beej 2024 Celebration यावर्षी भाऊबीज आहे ही 3 नोव्हेंबरला रविवारी आहे. भारतात हा सण अतिउत्साहाने साजरा केला जातो. बहिण भावाला ओवाळते. त्याला मंगल स्नान घालते. छान जेवायला करते. संध्याकाळी ओवाळते आणि भाऊ तिला ओवाळणी म्हणून काही भेटवस्तू देतो. भाऊ परगावी, परदेशी गेला असेल किंवा ज्या बहिणींना भाऊ नसेल त्या स्त्रिया चंद्राला आपला भाऊ मानून ओवाळतात. या प्रत्येकाकडे पाहिले की प्राचीन काळापासून चालत असलेल्या बहिण भावाच्या या पवित्र हा पवित्र बंधन आपल्याला दिसून येईल.
Bhau Beej 2024 Celebration भाऊबीज हा भाऊ बहिणीचा मुख्य सण आहे. हा सण साजरा केल्यामुळे बहीण भावामध्ये प्रेम टिकून राहते आणि अकाली मृत्यूपासून त्यांचे संरक्षण होते. अत्यंत उत्साहाने भाऊबीज हा सन साजरा केला जातो.
भाऊबीजला यमद्वितीया का म्हणतात
Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat
Bhau Beej Shubha Muhurat या दिवशी मृत्यू देव यम हे आपल्या बहिणीकडे यमुना कडे गेले. तिला वस्त्रालंकार दिले. तिचा पाहुणचार घेतला. यमुनेने त्यांना ओवाळले आणि यम देवाने तिला ओवाळणी घातली. तेव्हापासून या दिवशी बहिणीने भावास ओवाळण्याची प्रथा पडली. हा दिवस बहिण भावाच्या भेटीचा दिवस असतो म्हणून या दिवसाला भाऊबीज हे नाव पडले.
भाऊबीजेची कथा
Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat
Bhau Beej Shubha Muhurat पौराणिक कथेनुसार या दिवशी मृत्यू देवता यमराज आपली बहीण यमुनेकडे तिने अनेक वेळा बोलवल्यानंतर तिच्या भेटीला गेला होता. यमुनेने यम राजास भोजन दिले, त्याचे औक्षण केले, त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली, मग यमराजाने प्रसन्न होऊन बहिण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षवन करील ती तुला घाबरणार नाही. यमराजाने यमुनेला तसे वरदान दिले म्हणून त्या दिवसापासून आपण भाऊबीज हा सण साजरा करतो.
भाऊबीजेचे शुभमुहूर्त
Bhau Beej Shubha Muhurat
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 4:11 पासून ते सकाळी 5:43 पर्यंत
विजय मुहूर्त – दुपारी 1:54 मिनिटापासून ते 2:38 मिनिटापर्यंत
गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 5:34 मिनिटापासून ते 6:00 वाजेपर्यंत