Mahila Samman Bachat Patra Yojana 2025 Information In Marathi : शेवटची तारीख 31 मार्च 2025
Mahila Samman Bachat Patra Yojana Latest News In Marathi : 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी एक खास स्कीम या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. महिला सन्मान बचत पत्र केंद्र सरकारची एक बचत योजना आहे. या योजनेवर सरकार आकर्षक व्याजदर देते. 1 एप्रिल 2023 ला सुरू केलेली ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्या.
Mahila Samman Bachat Patra Yojana सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकाना ही योजना लागू आहे. महिला आणि मुलींना योजनेच्या माध्यमातून सक्षम करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच महिला सन्मान बचत पत्र योजना ही आता पोस्ट ऑफिस आणि पात्र असलेल्या शेड्युल बँक मध्ये सुरू करण्यात आली आहे. पोस्ट विभागाच्या माध्यमातून ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू केली आहे. आणि 31 मार्च 2025 पर्यंत 2 वर्षासाठी ही योजना सुरू राहणार आहे.
महिला सन्मान बचत पत्र योजनेची वैशिष्ट्ये
Mahila Samman Bachat Patra Features
- देशातील सर्व मुली आणि महिलांना आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय देते.
- या योजनेच्या माध्यमातून महिला आणि मुलींना 31 मार्च 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वी 2 वर्षाच्या कालावधीसाठी खाते उघडता येईल.
- MSSC च्या माध्यमातून ठेवलेल्या ठेवीवर 7.5 टक्के वार्षिक व्याज असेल जे तिमाही चक्रवाढ होईल.
- या योजनेच्या माध्यमातून किमान 1 हजार रुपये आणि 100 च्या पटीत कोणतीही रक्कम 2 लाखाच्या कमाल मर्यादेत जमा करता येते.
- या योजनेच्या माध्यमातून खाते उघडल्यावर योजनेतील गुंतवणुकीची परिपक्वता ही खाते उघडल्यापासून च्या तारखेपासून 2 वर्षा ची आहे.
- ही केवळ गुंतवणूकच नव्हे तर या योजनेच्या कालावधी दरम्यान अंशिक पैसे काढण्यासाठी देखील पर्याय दिला आहे. खातेदार व्यक्ती योजनेच्या खात्यातील पात्र शिल्लकीपैकी जास्तीत जास्त 40 टक्के रक्कम काढू शकतो.
महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत ठेवी
Mahila Samman Saving Certificate Scheme
या योजनेच्या माध्यमातून एखादी व्यक्ती रक्कम जमा करण्यासाठी अधिक खाते उघडू शकते. मात्र सध्याचे खाते आणि नवीन खाते उघडण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी असणे आवश्यक आहे.
या योजनेच्या माध्यमातून किमान 1000 रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम जमा केली जाऊ शकते. मात्र त्यानंतर इतर रक्कम जमा करण्याची परवानगी या खात्यात नाही.
या योजनेच्या माध्यमातून खात्यात 2 लाख रुपयांची जमा करण्याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खातेदार आपल्या खात्यावर 2 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा करू शकत नाही.
महिला बचत पत्र योजनेतून पैसे कसे काढावे
Mahila Samman Yojana
खातेदार मुलगी, महिला खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्ष झाल्यानंतर खात्यात पात्र शिल्लकीच्या जास्तीत जास्त 40% रक्कम काढू शकते.
Mahila Samman Yojana या योजनेच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीच्या वतीने पालकांनी खाते उघडले असेल तर त्यांना खात्यातून पैसे काढण्यासाठी पालक लेखा कार्यालयाचे पत्र सादर करून अल्पवयीन मुलीच्या खात्यातून अर्ज करून पैसे काढू शकतात.
Mahila Samman Yojana या खात्यातून पैसे काढण्याची गणना 1 रुपयाच्या अपूर्ण अंकातील रक्कम अपूर्णकांतील रक्कम जवळच्या रुपयांमध्ये पूर्ण केली जाईल आणि या उद्देशासाठी 50 पैसे किंवा त्याहून अधिक रक्कम 1 रुपया मानली जाईल 50 पैसे पेक्षा कमी रक्कम दुर्लक्षित करण्यात येईल.
उघडलेले खाते वेळेपूर्वी बंद करता येते का
Mahila Samman Yojana 2025
Mahila Samman Yojana या योजनेअंतर्गत उघडलेले खाते मॅच्युरिटी पूर्वी बंद केले जाणार नाही मात्र काही अपवाद वगळता ते खालील प्रमाणे
खातेदाराच्या मृत्यूनंतर खाते बंद केले जाऊ शकते.
खातेदाराच्या जीवघेणा आजारासाठी वैद्यकीय मदत किंवा पालकाचा मृत्यू यासारख्या अत्यंत सहानुभूतीच्या कारणामुळे खाते चालवण्यासाठी सक्षम असलेलं किंवा खाते चालू ठेवण्यासाठी त्रास होत असल्यास खातेदार पूर्ण कागदपत्रासह ऑर्डर द्वारे लिखित स्वरूपात नोंदवल्या जाणाऱ्या कारणासाठी खाते अकाली बंद करण्याची परवानगी दिली जाते.
हे खाते मुदतपूर्व बंद केल्यास मूळ रकमेवरील व्याज हे संबंधित खात्यामध्ये या योजनेच्या दरानुसार जमा केले जाईल.
खाते उघडल्याच्या तारखेपासून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर खाते बंद केले असेल तर शिल्लक राहिलेली रक्कम 2 टक्के व्याजदराने खातेदारास परत दिली जाते.
मॅच्युरिटी रकमेची गणना करताना 1 रुपयाच्या अपूर्ण अंकातील कोणती रक्कम रुपये मानली जाते किंवा 50 पैशा पेक्षा कमी असल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
योजनेची पात्रता
Mahila Samman Bachat Patra Eligibility
- अर्जदार महिला मुली भारताच्या नागरिक असणे आवश्यक आहे.
- पोस्ट ऑफिस ची ही योजना केवळ महिला आणि मुलींसाठीच आहे.
- पुरुष या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
- या योजनेसाठी देशातील कोणतीही मुलगी किंवा महिला अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- अल्पवयीन मुलीच्या नावे खाते उघडण्यासाठी पालक पुढाकार घेऊन खाते उघडे शकतात.
- या योजनेसाठी कुठलीही वयोमर्यादा नाही सर्व वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Mahila Samman Yojana Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
वयाचा पुरावा म्हणून जन्म पत्र किंवा शाळेची टीसी
पासपोर्ट आकाराचा फोटो
जमा रक्कम किंवा चेकसह पे इन स्लिप
महिलेची ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी खालील कागदपत्रे वैध मानले जातील
पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन
मतदान ओळखपत्र
नरेगा द्वारे दिलेले जॉब कार्ड
राज्य सरकारच्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी असलेले ही नाव आणि पत्त्याच्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी द्वारे जारी केलेले पत्र
महिला सन्मान बचत पत्र योजनेची अर्ज प्रक्रिया
Mahila Samman Saving Certificate Scheme Online Apply
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला जवळच्या पोस्ट ऑफिस निवड झालेल्या बँकेला भेट द्यावी.
पोस्ट ऑफिस कार्यालयातून तुम्ही या योजनेचा अर्ज घेऊ शकता. तसेच ऑनलाइन पद्धतीने ही अधिकृत वेबसाईटवरून या योजनेसाठीचा अर्ज डाऊनलोड करता येतो.
त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा आणि त्यासोबत मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडा.
त्यानंतर घोषणा आणि नामांकन तपशील अर्जावर भरा त्यानंतर तुम्ही गुंतवणूक/ ठेवीच्या सुरुवातीच्या रकमेसह अर्ज जमा करू शकता.
महिला सन्मान बचत पत्र योजनेतील गुंतवणुकीचा पुरावा म्हणून तुम्हाला एक पत्र देण्यात येईल.
महत्त्वाची सूचना : महिला सन्मान बचत पत्र योजनेच्या माध्यमातून खाते उघडण्यासाठी महिला स्वतःसाठी आणि अल्पवयीन मुलीच्या वतीने पालक या योजनेसाठी 31 मार्च 2025 पूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.