Akshaya tritiya full information in marathi : का साजरी केली जाते अक्षय तृतीया
akshaya tritiya in marathi आपणा सर्वांनाच माहिती आहे की, दरवर्षी अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया येते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. अक्षय तृतीया यालाच आखिती असे देखील म्हणले जाते.
akshaya tritiya 2025 in marathi या दिवशी शुभ कामाची सुरुवात केली जाते अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्यामुळे कोणतेही शुभ कार्य शुभकाम करण्याची सुरुवात करायची असेल तर हा दिवस शुभ मानला जातो.
या दिवशी सोने, चांदी, वाहन, प्रॉपर्टी खरेदी केली जाते चला तर मग आज आपण अक्षय तृतीये बद्दलची संपूर्ण माहिती, कथा, शुभ मुहूर्त जाणून घेऊ…
यंदाची म्हणजेच 2025 मधील अक्षय तृतीयाचे मुहूर्त हे 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी अक्षय तृतीयेची तिथी सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी समाप्त होईल म्हणजेच यावर्षी तिथीनुसार 30 एप्रिल बुधवार रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल.

पूजेचा शुभ मुहूर्त
akshaya tritiya shubh muhurat 2025
akshaya tritiya 2025 date and time बुधवार 30 एप्रिल रोजी 5 वाजून ३१ मिनिटांपासून अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभमुहूर्त सुरू होईल तो दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत आहे.
सोने खरेदीसाठीचा शुभमुहूर्त
akshaya tritiya shubh muhurat 2025
akshaya tritiya 2025 date and time : 30 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजून 41 मिनिटापासून ते दुपारी 2 वाजून 12 मिनिटांपर्यंत अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे. तसेच तुम्ही जर सोने चांदीची खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही माती, पितळीच भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता.
अक्षय तृतीया पूजा विधि
Akshaya Tritiya 2025 Date
Akshaya Tritiya 2025 Date अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केले जाते. पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानासह नैवेद्य अर्पण केला जातो. हा सर्व विधी पूर्ण केल्यानंतर आरती केली जाते.
उन्हाळ्यात येणारे आंबे व चिंच देवाला अर्पण केले जातात वर्षभर पीक चांगले यावे आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरून कच्चा आंबा, चिंच आणि गुळ पाण्यात मिसळून ते देवाला अर्पण केले जाते.
अक्षय तृतीयेची कथा
akshaya tritiya katha in marathi
akshaya tritiya katha in marathi अनेक वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे एका छोट्या गावात कुटुंबासह धरमदास राहत होते. धरमदास हे खूप गरीब होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची, त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते.
धरमदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते, एकदा धरमदास यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले, नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूची पूजा केली त्यानंतर आरती केली.
या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, जव, सत्व, तांदूळ, मीठ, गहू, गुळ, तूप, दही, सोने, कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. ही सर्व देणगी पाहून धरमदास यांच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले जर धरमदास हे सर्व दानधर्मासाठी देतील तर कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा होणार? तरीही धरमदास आपल्या दान धर्माने आणि पुण्य कर्माने विचलित झाले नाही आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान केले.
आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ ही आली या पवित्र सणाला प्रत्येक वेळी धरमदास यांनी या दिवशी पूजा केली आणि त्यांना जसे घडेल तसे दान केले. म्हातारेपणाचा आजार, कुटुंबाचा त्रासही त्यांना त्यांच्या उपवासात पासून दूर करू शकला नाही.
या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धरमदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला. कुशावती राजा अतिशय प्रतापी होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती होती आणि त्याच्या राज्यात सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. त्याच्या राज्यात जनता खूप सुखी होती.
अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव मिळाले. कीर्ती प्राप्त झाली परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाहीत. सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका त्यांना अक्षय तृतीयाचे पुण्य नेहमीच लाभले. ज्याप्रमाणे भगवंताने धरमदासांवर कृपा केली त्याचप्रमाणे जो कोणी अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान धर्म करेल त्याला अक्षय पुण्य व कीर्ती प्राप्त होईल.