what is the difference between ayushman Arogya mandir vs mohalla clinic in delhi : दिल्लीमध्ये 33 आयुष्मान आरोग्य मंदिर सुरू
what is the difference between ayushman Arogya mandir vs mohalla clinic in delhi : राजधानी दिल्लीमध्ये 33 नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिर उघडले गेले आहेत. जे मोहल्ला क्लिनिक ची जागा घेत आहेत. हे आरोग्य मंदिर केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा एक भाग आहेत. जिथे मोफत आणि कमी किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा दिल्या जातात.
what is the difference between ayushman Arogya mandir vs mohalla clinic in delhi रंगीत भिंती, स्वच्छ चमकणाऱ्या खोल्या, औषधाने भरलेल्या अलमाऱ्या आणि रुग्णांना बसण्यासाठी चांगली सुविधा. आम्ही तुम्हाला कुठल्याही खाजगी हॉस्पिटल बद्दल माहिती देत नाहीत बर ! तर दिल्लीमध्ये सुरू झालेल्या नवीन 33 आयुष्यमान आरोग्य मंदिर बद्दल माहिती देत आहोत.
आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीमध्ये सत्ता असताना मोहल्ला क्लिनिक सुरू केले होते. आता त्याची जागा आयुष्मान आरोग्य मंदिर घेत आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी 30 हजार भागामध्ये आयुष्मान भारत योजना अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राचे उद्घाटन केले. याबरोबरच वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अशाच प्रकारचे 33 आरोग्य मंदिर सुरू करण्यात आले आहेत.
आम आदमी पक्षाचे मोहल्ला क्लिनिक आणि भाजप सरकारने सुरू केलेले आयुष्यमान आरोग्य मंदिर मध्ये काय फरक आहे? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल.
जर यापूर्वीच सामान्य नागरिकांसाठी मोफत उपचार सुविधा देण्यासाठी 500 पेक्षा अधिक मोहल्ला क्लिनिक उपलब्ध असताना ते बंद करून आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू करण्याची का आवश्यकता पडली?
चला आम्ही तुम्हाला सांगतो. या दोन्ही मध्ये काय फरक आहे. दरम्यान मोहल्ला केवळ दिल्ली आणि पंजाब मध्ये सुरू झाले होते. मात्र आयुष्यमान योजना संपूर्ण देशांमध्ये लागू आहे.
आयुष्मान आरोग्य मंदिर ची वैशिष्ट्ये
ayushman Arogya mandir Benefits
ayushman Arogya mandir आयुष्यमान आरोग्य मंदिर मोदी सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा भाग आहे. आयुष्मान कार्ड द्वारे रुग्णालयात भरती झाल्यावर कॅशलेस उपचार मिळतात.
तर आयुष्यमान आरोग्य मंदिर मध्ये ओपीडी द्वारे येणाऱ्या प्राथमिक आरोग्य सुविधा दिल्या जातात. ही योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमाच्या आधारावर तयार करण्यात आली आहे.
ayushman Arogya mandir या योजनेचा उद्देश देशातील सामान्य नागरिकांना मोफत किंवा कमी किमतीमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यासाठी देशभरामध्ये 1.77 लाख आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू झाले आहेत.
या आरोग्य मंदिरामध्ये केवळ सर्दी, खोकला याचे औषधी मिळत नाही तर, या व्यतिरिक्त विविध सुविधाही दिल्या जातात.
ayushman Arogya mandir Benefits
गर्भवती महिला आणि शिशु ची देखभाल साठी हेल सर्विस
कुटुंब नियोजन आणि प्रजनन आरोग्य सेवा
डायबिटीज हाय बीपी कॅन्सर सारख्या आजारा वर उपचार आणि मार्गदर्शन
टीबी, कुष्ठरोग सारख्या संसर्गजन्य आजारावरील सुविधा
14 प्रकारच्या लॅब टेस्ट या आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये होतात.
LFTKFT lipid सारख्या 79 टेस्ट मोफत करण्याची सुविधा
आठवड्यातील सोमवार आणि गुरुवारी योगाचे वर्ग
लहान मुलांसाठी लसीकरण सुविधा
मोहल्ला क्लिनिक
mohalla clinic in delhi
mohalla clinic in delhi आम आदमी पक्षाने 2015 मध्ये मोहल्ला क्लिनिक ची सुरुवात केली होती. विशेषतः गरीब भागामध्ये छोटे पोर्टेबल किंवा किरायाच्या खोलीमध्ये मध्ये सुरू केले होते. याचा मुख्य उद्देश दिल्लीतील गरीब नागरिकांना सामान्य आजारापासून मोफत उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.
10 ते 15 हजार लोकसंख्येच्या परिसरामध्ये 1 मोहल्ला क्लिनिक उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र या मोहल्ला क्लिनिकमध्ये सर्दी, खोकला सारख्या सामान्य आजारावरच उपचार होत होते किंवा गंभीर आजारासाठी इतर ठिकाणच्या रुग्णालयात जावे लागत असत.
मात्र आयुष्मान आरोग्य मंदिर मध्ये एक प्राथमिक उपचार केंद्र सारखे आहे तर मोहल्ला क्लिनिक एक छोटी डिस्पेंसरी सारखे होते.