Actress Shobitha Shivanna : शोभिता शिवण्णाने कमी वयात संपवले आयुष्य

Actress Shobitha Shivanna : अभिनेत्री शोभिता शिवणाने केली आत्महत्या

Actress Shobitha Shivanna : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शोभिता शिवण्णा चे निधन झाले आहे. मनोरंजन सृष्टी पुन्हा एकदा हादरली आहे. शोभिताने मंगला गौरी आणि कृष्ण रुक्मिणी सारख्या टीव्ही मालिकेमध्ये काम केले होते. टीव्ही व्यतिरिक्त शोभिताने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Actress Shobitha शोभिता रविवारी हैदराबाद मध्ये राहत्या घरी मृता व्यवस्थेत आढळली. तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. शोभिता च्या निधनाने मनोरंजन सृष्टीला आणि सर्वांनाच धक्का बसला आहे. शोभिता शिवण्णाचे वय 30 वर्ष होते. तिने वयाच्या तिसाव्या वर्षी तिचे आयुष्य संपवले. शोभिताच्या मृत्यूनंतर तिची शेवटची पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. Actress Shobitha

Actress Shobitha शोभिताने 16 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्राम वर शेवटची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने बॉलीवूडमधील प्रसिद्ध गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये एक गायक “इंतेहा हो गई इंतजार की…” हे गाणं गात होता. या व्हिडिओ सोबत अभिनेत्रीने गिटार आणि म्युझिक चे इमोजी शेअर केले आहेत. Actress Shobitha

Actress Shobitha हैदराबाद मधील गाचीबावली येथील श्रीराम नगर कॉलनीतील अपार्टमेंट मध्ये शोभिता शिवण्णा राहत होती. तिने राहत्या घरीच आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर शोभिता च्या मृत्यूची माहिती समोर आली. शेजाऱ्यांनी पोलिसांना शोभिताच्या आत्महत्येचा संशय व्यक्त केला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. पोलिसांना हा मृतदेह संशयास्पद बाबींचा वाटत असल्यामुळे याचा तपास सुरू आहे. Actress Shobitha Shivanna