Ayushman Bharat Card yojana 2024 in Marathi : आता मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार

Table of Contents

Ayushman Bharat Card yojana 2024 information : प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड योजना 2024 मराठी माहिती

Ayushman Bharat Card yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड ही योजना 2018 ला सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. देशभरातील गरीब नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नव्हते मात्र या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 5 लाख रुपयांचे उपचार मोफत देण्याची घोषणा केली आहे. याचा लाभ देशातील कोट्यावधी नागरिकांना होत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन Budget 2024 यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात आयुष्मान भारत योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. आता या योजनेची व्याप्ती वाढवून त्यांनी त्याचा लाभ गरीब कुटुंब तसेच आशा आणि अंगणवाडी सेविकांनाही देणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वस्तात उपचाराचा लाभ मिळणार आहे. असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत उपचार मोफत मिळणार आहे. आयुष्मान भारत योजना अंतर्गत आता सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहेत. त्याचा लवकरच या योजनेत समावेश केला जाईल. असेही निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात सांगितले. Ayushman Bharat Card yojana

Ayushman Bharat Card yojana

सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात सध्या 55 कोटी नागरिकांचा या योजनेत समावेश झाला आहे. ही योजना अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारित करण्यात आली असून 20 डिसेंबर 2023 पर्यंत या योजनेअंतर्गत जवळपास 28.45 कोटी आयुष्मान कार्ड Ayushman Card जारी करण्यात आले आहेत. केवळ 2023 या वर्षात 9.38 कोटी आयुष्मान भारत कार्ड जारी करण्यात आले आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्य सरकार द्वारे राबवली जाणारी एक आरोग्य विमा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि खाजगी रुग्णालयात निश्चित केलेल्या आजारावर मोफत उपचार केले जातात.

महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने सह आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY एकत्रितपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सरकारी आणि खाजगी रुग्णालया मार्फत पात्र शिधापत्रिका धारक आणि लाभार्थी गटात निश्चित केलेल्या आजारावर मोफत उपचार पुरवले जात आहेत. 01 एप्रिल 2020 रोजी राज्यात एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना pradhan mantri jan arogya yojana PMJAY एकत्रित सुरू केली आहे. राज्य आरोग्य विमा संस्थेतर्फे पात्र लाभार्थी कुटुंबाच्या वतीने दरवर्षी विमा कंपनीला प्रत्येक कुटुंब 797 रुपये रक्कम प्रेमासिक विमा हप्ता म्हणून दिली जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी राज्य सरकारकडून संपूर्ण निधी दिला जातो, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजने PMJAY वर होणाऱ्या खर्चाची विभागणी केंद्र आणि राज्य शासन यांच्यामध्ये 60.40 या प्रमाणात करणे आली आहे.

आयुष्मान भारत कार्ड म्हणजे काय?

What is Ayushman Bharat Card yojana

PM Ayushman Bharat Card yojana आजच्या धकाधकीच्या आणि अनिश्चित जीवनशैली मुळे सर्वांनी विमा काढणे आवश्यक झाला आहे.  मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जणांना सुरक्षा विमा काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे देशातील अनेक जण विमा संरक्षण घेत नाहीत. यात प्रमुख कारण म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती हे आहे. अनेकांची इच्छा असूनही कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकजण विमा कवच किंवा संरक्षण घेत नाहीत. मात्र केंद्र सरकारकडून आर्थिक दुर्बल कुटुंबातील परिवारांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवल्या जातात. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या परिस्थिती नसल्यामुळे देशातील कोणताही व्यक्ती आरोग्य सुविधा पासून वंचित राहू नये, हा सरकारचा उद्देश असतो. यासाठीच केंद्र सरकारने देशातील नागरिकांना आरोग्य विमा चा लाभ मिळावा यासाठी आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे देशातील नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो आणि याद्वारे त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून आयुष्मान भारत कार्ड Ayushman Bharat Card योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आयुष्मान कार्ड कसे काढावे, योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत, फायदे काय आहेत, यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेसाठी कोण पात्र आहेत. आदीची संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून आज पाहणार आहोत.

PM Ayushman Bharat Card yojana केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे आयुष्मान भारत कार्ड अंतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे कार्ड शिधापत्रिका असणाऱ्या सर्व व्यक्तींना काढता येते आणि याद्वारे अनेक हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेता येतात. आतापर्यंत देशातील कोट्यावधी लोकांनी आयुष्मान भारत कार्ड Ayushman Card काढून त्याद्वारे मोफत उपचार घेतले आहेत. त्यामुळे ही योजना प्रभावी ठरत आहे. गरिबातील गरीब व्यक्तीलाही यामुळे चांगले उपचार मिळत आहेत.

तुम्हालाही हे कार्ड काढायचे असल्यास तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करून हे कार्ड मिळू शकतात.

यापूर्वी देशातील आर्थिक दृष्ट्या मागास आणि दारिद्र्यरेषेखालील लोकांनाच या योजनेचा लाभ दिला जात होता. मात्र आता देशातील सर्व शिधापत्रिका धारक यांना या योजनेद्वारे आयुष्मान भारत काढता येते आणि या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे तुम्ही ही या द्वारे कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावा.

आयुष्मानकार्ड Ayushman Card द्वारे देशातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे PMJAY काम चालते. ही योजना देशातील नागरिकांना मोफत उपचार देण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत उपचार आणि पाच लाख रुपयांचे उपचार मोफत दिले जात आहेत.

काही मिनिटात तयार होते कुटुंबाचे तयार होते आयुष्मान भारत कार्ड

PM Ayushman Bharat Card हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला मोबाईल ॲप चा देखील वापर करता येतो. यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड ही दोन महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. याद्वारे तुमचे आयुष्मान भारत कार्ड Ayushman Bharat Card काही मिनिटात तुम्ही घरबसल्याही मोबाईलच्या माध्यमातून काढून तयार करू शकता आणि डाऊनलोड करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड या योजनेअंतर्गत देशातील शिधापत्रिकाधारकांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कव्हर दिले जाते. याद्वारे पाच लाखापर्यंत तुम्ही सरकारने निश्चित केलेल्या रुग्णालयात जाऊन मोफत उपचार घेऊ शकता. देशातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. याचा अनेकांना लाभ होत आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू केली आहे. देशातील अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या वतीने विविध शिबिरे राबवून नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे Ayushman Bharat Card वाटप करण्यात येत आहे. यामध्ये महानगरपालिका मध्ये ग्रामपंचायत आरोग्य विभाग आदि ठिकाणी तुम्ही हे कार्ड काढू शकता.

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. देशातील एकही नागरिक आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य सुविधे पासून वंचित राहू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शिवाय या योजनेमुळे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यातही मोठी मदत होत आहे.

ठळक मुद्दे :

आयुष्मान भारत कार्ड म्हणजे काय?

काही मिनिटात तयार होते कुटुंबाचे तयार होते आयुष्मान भारत कार्ड

प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड योजनेची थोडक्यात माहिती

आयुष्मान भारत कार्ड योजनेची उद्दिष्टे

आयुष्मान भारत कार्ड योजना अंतर्गत असलेल्या सुविधा

आयुष्मान भारत कार्डयोजनेअंतर्गत येणारे आजार

आयुष्मान भारत कार्ड योजनेचे फायदे

आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठीची पात्रता

आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा

आयुष्मान भारत कार्ड योजनेचा अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत

ॲपद्वारे करा नोंदणी

FAQ’s

प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड योजनेची थोडक्यात माहिती

PM Ayushman Bharat yojana in Short

योजनेचे नावप्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरू झाली14 एप्रिल 2018
लाभार्थीभारताचे नागरिक
उद्दिष्टपाच लाख रुपयांचा  आरोग्य विमा
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://pmjay.gov.in
Ayushman Bharat Card yojana

आयुष्मान भारत कार्ड योजनेची उद्दिष्टे

Purpose of Ayushman Bharat yojana

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजातील कुटुंबातील व्यक्तीला जर दुर्धर आजार झाल्यास आर्थिक अडचणीमुळे त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नाहीत. सामान्य जनतेला ही याच अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे.

Ayushman Bharat Card yojana आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवणे हा सरकारचा या योजनेमागील महत्त्वाचा उद्देश आहे. यामुळे सामान्य जनतेला मोफत आणि चांगल्या प्रकारच्या रुग्णालयात उपचार घेता येत आहेत.

आयुष्मान भारत कार्ड योजना अंतर्गत असलेल्या सुविधा

Ayushman Card yojana वैद्यकीय तपासणी आणि उपचार या योजनेतून मिळतात.

रुग्णालयात दाखल होणे औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णाची देखभाल प्रयोगशाळेतील विविध चाचण्या वैद्यकीय उपचार आदी.

उपचार दरम्यान उद्भवलेल्या कॉम्प्लिकेशनचे उपचारही यातून केले जातात.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसापर्यंत पाठपुरावा केला जातो.

तुम्हाला असलेल्या रोगावर उपचार केला जातात.

आयुष्मान भारत कार्ड योजनेअंतर्गत येणारे आजार

Ayushman Bharat Card Yojana आयुष्मान भारत कार्ड योजनेअंतर्गत काहलील आजार येतात

1     जळते

2             हृदयरोग

3             हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया

4             क्रिटिकल केअर

५      त्वचाविज्ञान

6             एंडोक्राइनोलॉजी

७      ईएनटी शस्त्रक्रिया

8             सामान्य औषध

९      सामान्य शस्त्रक्रिया

10           रक्तविज्ञान

11           संसर्गजन्य रोग

12           इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी

13           वैद्यकीय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी

14           मेडिकल ऑन्कोलॉजी

१५     नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन

16           नेफ्रोलॉजी

१७     न्यूरोलॉजी

१८     न्यूरोसर्जरी

19          प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग

20          नेत्ररोग

२१     ऑर्थोपेडिक्स

22          बालरोग शस्त्रक्रिया

23          बालरोग कर्करोग

२४     प्लास्टिक सर्जरी

२५     पॉलीट्रॉमा

२६     प्रोस्थेसिस आणि ऑर्थोसिस

२७     पल्मोनोलॉजी

२८      रेडिएशन ऑन्कोलॉजी

29          संधिवातशास्त्र

30          सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी

३१     सर्जिकल ऑन्कोलॉजी

32          मूत्रविज्ञान (जेनिटोरिनरी शस्त्रक्रिया)

३३     मानसिक विकार

३४     तोंडी आणि मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया

या सह 1209 पॅकेजेसमध्ये जनरल वॉर्डमधील बेडचे शुल्क, नर्सिंग आणि बोर्डिंग शुल्क, सर्जन आणि ऍनेस्थेटिस्टचे शुल्क, मेडिकल प्रॅक्टिशनर आणि सल्लागार शुल्क, ऑक्सिजन, ओटी आणि आयसीयू शुल्क, सर्जिकल उपकरणांची किंमत, औषधांची किंमत, डिस्पोजेबल, उपभोग्य वस्तू, प्रत्यारोपण, प्रत्यारोपणाचे शुल्क इत्यादि समाविष्ट आहे.

आयुष्मान भारत कार्ड योजनेचे फायदे

Benefits of Ayushman Bharat Card yojana

आयुष्मान भारत योजना Ayushman Bharat yojana अंतर्गत दहा कोटीहून अधिक बीपीएल कुटुंबाचा समावेश करण्यात आलेला आहे.

या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा या योजनेच्या माध्यमातून दिला जातो.

2011 च्या जनगणनेमध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांचा PMJAY  योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.

योजनेअंतर्गत मिळणारे उपचार पूर्णपणे मोफत दिले जातात त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण येणार नाही.

आयुष्मान भारत Ayushman Bharat Yojana योजनेला जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखले जाते.

महाराष्ट्रात आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे काम करत आहेत.

ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा सर्वांना आयुष्मान भारत कार्ड काढून या योजनेचा लाभ घेता येतो.

बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी

मागेल त्याला सौर कृषि पंप

आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठीची पात्रता

Eligibility of Ayushman Bharat Card yojana

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.

अर्जदाराचे वय 16 वर्ष पूर्ण असावे.

अर्जदार ही दरीदररेषेखालील असावा.

पात्रता प्रामुख्याने सामाजिक-आर्थिक जात जनगणना (SECC) डेटाबेसवर आधारित आहे.

आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Documents of Ayushman Bharat Card yojana

कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड

शिधापत्रिका (रेशन कार्ड)

रहिवासी प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा

Ayushman Bharat Card yojana Online Ragistration  

आयुष्यभान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर लोगिन करा.

लॉगिन केल्यानंतर होम पेजवर आल्यावर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाका.

नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल तो तुम्हाला PMJAY लॉगिन स्क्रीनवर घेऊन जाईल.

आता तुम्ही ज्या राज्यातुन योजनेसाठी अर्ज करत आहात त्या राज्याची निवड करा.

त्यानंतर मोबाईल नंबर तुमचे नाव राशन कार्ड नंबर आदी माहिती भरा.

त्यानंतर कौटुंबिक सदस्य या पर्यावर क्लिक करा आणि आपल्याला भारताची माहिती तपासता येईल.

आयुष्मान भारत कार्ड योजनेचा अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत

Ayushman Bharat Card yojana Offline Apply

PM Ayushman Bharat Card yojana प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी एस सी केंद्रावर जावे लागेल. आणि तुमच्या सर्व कागदपत्राच्या झेरॉक्स प्रति तिथं सबमिट करावे लागतील. त्यानंतर सीएसटी चा एजंट तुम्ही सबमिट केलेल्या सर्व प्रती आणि योजनेअंतर्गत तुम्हाला नोंदणी करून देईल.  त्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला लोकसेवा केंद्राद्वारे आयुष्मान भारतचे कार्ड प्रदान करण्यात येईल.

Ayushman Bharat Card yojana

ॲपद्वारे करा नोंदणी

आयुष्मान भारत योजना अंतर्गत कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला आता कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्याही तुमच्या कुटुंबातील सर्वांचे आयुष्मान भारत कार्ड काही मिनिटात डाऊनलोड करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला सर्व कुटुंबातील सदस्यांची आधार कार्ड आणि त्यांची रेशन कार्ड वर असलेली नावे हे महत्त्वाची आहेत. या दोन कागदपत्राच्या आधारे ही तुम्ही ऑनलाईन आयुष्मान भारत ॲपच्या माध्यमातून काही मिनिटात सर्वांची आयुष्मान कार्ड तयार करू शकतात.

हेल्पलाइन नंबर 14555 / 1800111565

FAQ’s

आयुष्मान भारत योजनेला Ayushman Card Yojana कोण आहेत पात्र?

देशातील आर्थिक दुर्बल घटकातील सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे असा प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.

आयुष्मान भारत कार्डचे Ayushman Card Yojana फायदे काय?

आयुष्मान भारत कार्डच्या माध्यमातून तुम्हाला पाच लाख पर्यंतचे उपचार मोफत घेता येतात

आयुष्मान भारत योजना Ayushman Card Yojana कोणी सुरू केली?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे या योजनेचा देशातील कोट्यावधी लोकांना लाभ होत आहे. याद्वारे दर्जेदार आरोग्य सुविधा ही नागरिकांना मिळत आहेत.

आयुष्मान भारत योजनेचे कार्ड Ayushman Card Yojana कसे तयार करावे?

तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन किंवा आयुष्मान भारत या मोबाईल ॲप द्वारे ही आपले आयुष्मान भारत कार्ड तयार करू शकता.

आमचा हा तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA